जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्काराचे वितरण
तळेगाव दाभाडे
2018-03-06
व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्कार, खेळ पैठणीचा, एकांकिका तसेच गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सभापती संध्या भेगडे यांनी दिली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, राजमाता जिजाऊ महिला मंचच्या अध्यक्षा सारीका भेगडे या उपस्थित राहणार आहे. शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
यावेळी महिलासाठी खेळ पैठणीचा तसेच एकांकिकेची आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन सभापती संध्या भेगडे आणि उपसभापती प्राची हेंद्रे यांनी केलेले आहे. तसेच शहरातील विविध भागातून महिलांची दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे.