Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
श्रीराम सेनेच्या नोकरी महोत्सवात युवकांनी दिल्या मुलाखती

व्हीएस न्यूज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विश्व श्रीराम सेना या सामाजिक संस्थेच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डी येथील मनपाच्या उर्दू माध्यमिक हायस्कूलमध्ये नोकरी महोत्सव पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या.

पिंपरी चिंचवड उद्योगनगरीतील अनेक मान्यवर कंपन्या, आयलेटल ग्लोबल सर्व्हिस, जेनियम कन्सस्टंट लि., यशस्वी ग्रुप, चिंचवड, ऍबसोर्स बायोलॉजिक, रिलायन्स एच आर सर्व्हिस, युवा शक्ती फाऊंडेशन, युरेका फोर्ब्स, फ्लॉश विंग मायक्रोनिक्‍स इंडिया, टीम प्लेस सर्व्हिस, ऐक्‍य ह्युमन कॅपिटल, एएसपी ऑल सर्व्हिस, ऍडिको इंडिया, अर्स मॅनेजमेंट यासारख्या कंपन्यांचे अधिकारी यावेळी उमेदवारांच्या मुलाखतींसाठी उपस्थित होते. पात्रतेच्या निकषांवर बेरोजगार तरूण तरूणींच्या मुलाखती घेण्यात आल्या. बऱ्याच तरुणांना नोकरी मिळल्याने गुढी पाडव्याचा दिवस सोन्याचा दिवस ठरला. विश्व श्रीराम सेनेने सामाजिक बांधिलकी जोपासत तरूणांसाठी आयोजित केलेल्या या मेळाव्याबद्यल समाधान व्यक्त केले. यावेळी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींना श्रीरामाची फोटो फ्रेम भेट म्हणून देण्यात आली. यावेळी विश्व श्रीराम सेनेचे प्रवक्ते प्रमोद गुप्ता, अक्रम शेख, दिलीप गोसावी, तुकाराम बिराजदार व विश्‍व श्रीराम सेनचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. सतोष पाचपुते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

...Read More

V. S. News
भोसरीतील प्रितम प्रकाश महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ

व्हीएस न्यूज पदवी ही शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे फलित असून पदवीधारकांनी व्यापक नीतीमूल्यांच्या भानाने सतत जागरुक राहावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयाच्या पदवीग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. उत्तमराव जाधव, शाहू शिक्षण संस्थेच्या विश्‍वस्त कोमल साळुंखे, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलासकुमार पगारिया, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे केंद्रप्रमुख प्रा. पांडुरंग भास्कर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.हनुमंत शिंदे, डॉ. ललितकुमार धोका, डॉ.प्रशांत गदिया, कल्पेश पगारिया आदी उपस्थित होते.

राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी स्वागत, डॉ. अशोककुमार पगारिया यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख डॉ.विजय निकम यांनी ध्वजसंचलन केले. प्रा. प्रवीण म्हस्के यांनी सूत्रसंचलन केले, डॉ. स्वाती वाघ यांनी आभार मानले.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे ‘घर चलो अभियान’

व्हीएस न्यूज - २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी घर चलो अभियानराबविणार आहे. या कालावधीत घरोघरी जाऊन केंद्र, राज्य व मनपा यांच्या विकासभिमुख योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत.

याकरिता प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांचे गट तयार केले जाणार आहेत. असे गट घरोघरी जाऊनविकासभिमुख योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत. अभियना दरम्यान मिळालेल्या प्रतिक्रिया व फोटो पक्ष कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. तसेच सप्ताहातून एका दिवशी स्वच्छता कार्यक्रम अभिनव पध्द्तीने राबवून जाहिर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. घर चलो अभियनाचे माध्यमातून शहरामधील १३०० बूथचे मजबूतीकरण करण्याचा निर्धार शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. त्याप्रकारची जबाबदारी सर्व पक्ष पदाधिकारी व नगरसेवक यांना दिली आहे.

चलो अभियनाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख समन्वक म्हणून जबाबदारी अमोल थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच मंडलाध्यक्ष अमोल थोरात प्राधिकरण चिंचवड, संजय मंगोडेकर चिंचवड स्टे. दापोडी, बाबू नायर किवळे थेरगाव, माऊली थोरात सांगवी काळेवाडी, प्रमोद निसळ निगडी चिखली, सारंग कामतेकर भोसरी चर्होली, राजेश पिल्ले युवा मोर्चा, उमा खापरे महिला मोर्चा, सदाशिव खाडे अनूसूचित, अल्पसंख्याक, व्यापार व कामगार, सचिन पटवर्धन उर्वरित आघाड्या अशाप्रकारे विभागांचे समन्वक असणार आहेत. घर चलो घर अभियनामध्ये खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, उमा खापरे, महेश कुलकर्णी, वसंत वाणी, अमर मुलचंदानी,यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिकारी व नगरसेवक सामिल होणार आहेत.

भाजपचा येत्या ६ एप्रिलला वर्धापनदिन होणार आहे. तसेच भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन ६ एप्रिल रोजी मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्स (बीकेसी) येथे होणार आहे. पिंपरी चिंचवड मधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन जाण्याचे शहर पदाधिका-यांना उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती भाजप पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.

...Read More

V. S. News
चिंचवड रेल्वे थांब्यावर लातुर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस  थांबा करा 

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात उद्योगधंदा, नोकरी, शिक्षणानिमित्त मराठवाड्यातील अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. तथापि, लातुर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस व बिदर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज र्टमिनस सुपर एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा चिंचवड स्टेशनला करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांच्यामार्फत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेचे शहराध्यक्ष युवराज दाखले यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
दाखले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी म्हणुन ओळखले जाते. या शहरात उद्योग, नोकरी, शिक्षण, रोजगारासाठी मराठवाड्यातील उदगीर, लातुर, नांदेड, बिदर, अमरावती, धाराशिव येथील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. हे नागरिक लातुर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस व बिदर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज र्टमिनस सुपर एक्सप्रेस या रेल्वेने आल्यानंतर त्यांना पुणे रेल्वे स्टेशन अथवा लोणावळा रेल्वे स्टेशनवर उतरावे लागते. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी या दोन्हीही सुपर एक्सप्रेस गाड्यांना चिंचवड स्टेशन येथे थांबा करण्यात यावा अशी मागणी दाखले यांनी केली आहे.

...Read More

V. S. News
शिवसेना महिला आघाडी विधानसभा संघटकाला मारहाण 

व्हीएस न्यूज - जमिनीच्या वादातून शिवसेना महिला आघाडीच्या पिंपरी विधानसभा संघटकाला चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत सिमेंटचा गट्टू फेकून मारला. ही घटना बोपखेल येथे घडली.
मंगला सदाशिव घुले (वय 43, रा. मारूती मंदीराजवळ, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषभ ज्ञानेश्वर घुले (वय 20), सविता पांडुरंग घुले (वय 41), पांडुरंग घुले (वय 45), मंदार ज्ञानेश्वर घुले (वय 19, सर्व रा. बोपखेल) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगला घुले या शिवसेना महिला आघाडीच्या पिंपरी विधानसभा संघटक आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून मंगला घुले यांनी 2008 साली न्यायालयात दावा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घुले या घरासमोर थांबल्या होत्या. यावेळी आरोपींनी मंगला घुले यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली. ऋषभ याने त्यांना 'तु केस मागे घे, अन्यथा तुला खलास करून टाकू', अशी धमकी दिली. तसेच सिमेंटचा गट्टू मंगला घुले यांना फेकून मारला.
फौजदार प्रमोद कठोरे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
प्रतिकुल परिस्थितीवर मात करणारा नेता म्हणजे डॉ. पतंगराव कदम

व्हीएस न्यूज - प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत पुढे जाण्याचा ध्यास आणि हितचिंतकांसह विरोधकांनाही मदत करण्यात कायम पुढे असणारा नेता म्हणजे डॉ. पतंगराव कदम होय. त्यांच्या आकस्मित निधनाने राज्यातील राजकारण, सहकार, शिक्षण क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहिली.
माजी मंत्री कै.पंतगराव कदम यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गुरुवारी पिंपरीतील कामगार भवन, नारायण मेघाजी लोखंडे सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस शहरातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, एमआयएम, मनसे आदी पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापुर, सांगली भागातील नागरिक उपस्थित होते. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, नगरसेवक बाबू नायर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, एमआयएमचे शहराध्यक्ष अकिल मुजावर, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजाभाऊ गोलांडे, अख्तर चौधरी, गिरीजा कुदळे, विद्या नवले, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फझल शेख, शाम आगरवाल, लक्ष्मण रुपनर, प्रदिप गायकवाड, तसेच राजेंद्रसिंह वालिया, बिंदू तिवारी, बाबा कांबळे, संग्राम तावडे, रामदास मोरे, नरेंद्र बनसोडे, मयुर जैयस्वाल, शहाबुद्दीन शेख, विशाल कसबे, सज्जी वर्की, संभाजी मुळीक आदी उपस्थित होते.
सचिन साठे म्हणाले की, तरुण पणात पिंपरीत शिक्षकाची नोकरी करताना विद्यापीठाचे स्वप्न पाहुण ते पुर्णत्वाला नेऊण त्यांनी अविरत लोकसेवा केली. भारती विद्यापीठाच्या रुग्णालयात लाखों नागरिकांना वैद्यकीय सेवा सुविधा व हजारों युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. मला निवडणुकीत अपयश आल्यानंतर सर्वप्रथम फोन करुन समाजसेवा सुरु ठेवण्यासाठी मानसिक पाठबळ डॉ. कदम यांनी दिली.
श्रध्दांजली वाहताना बाबू नायर म्हणाले की, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात शैक्षणिक सुविधा व विस्तार वाढविण्यासाठी डॉ. पतंगराव कदम आणि डॉ. डी.वाय. पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. डॉ. कदम हे राजकारणात सक्रीय असताना देखील मंत्री पदावर असताना समाजकारणाला महत्व देणारे नेते होते.
मारुती भापकर म्हणाले की, सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी केलेल्या आंदोलन प्रसंगी शिष्टमंडळासह डॉ. कदम यांना भेटण्याचा योग आला. त्वेषाने बैठकीला जाणारे शिष्टमंडळ डॉ. कदम यांची ते प्रश्न सोडविण्याबाबतची भुमिका पाहुण हसत खेळत आनंदाने बाहेर पडत असत.

...Read More

V. S. News
सांगवीत पाणपोईचे उद्‌घाटन

व्हीएस न्यूज - येथील एसटी कॉलनी शेजारील मुख्य बस स्थानकात सुरु करण्यात असलेल्या पाणपोईचे उद्‌घाटन नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
उन्हाच्या झळा वाढल्या असून बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने परिसरातील संतोष कांबळे, राकेश कांबळे यांच्या प्रयत्नातून पाणपोई उभारण्यात आली. बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे वाहक-चालक, प्रवासी व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यावेळी रामभाऊ देशपांडे, प्रकाश दिवार, आप्पा कांबळे, राकेश कांबळे, देवराम माकर, विलास वाघ, मुरली देवरे, बाळू कांबळे, शिवलिंग सरोदे, मुकुंद शिनगारी, गणेश गायकवाड, असलम शेख आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
दापोडीत श्री विठ्ठल-रूक्मिणी मुर्ती स्थापनेचा 94 वा वर्धापन दिन साजरा 

व्हीएस न्यूज - दापोडी येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मुर्ती स्थापनेचा 94 वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
तीन दिवस विविध कार्यक्रम झाले. यावेळी दिपक कुदळे यांच्या हस्ते महापुजा झाली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. सोपान भाडळे, भंडारी, सुभाष बोधे, सुधाकर कणसे आदी उपस्थित होते.
यामध्ये दैनंदिन कार्यक्रम काकड आरती, महिला भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर तसेच ह.भ. प. राजेंद्र जोशी यांच्या हस्ते कलशपुजन, डॉ. धनंजय पाटील, ह. भ. प. सुरेश महाराज किंडरे यांच्या हस्ते विणापुजन आदी कार्यक्रम पार पडले. ह. भ. प. गणेश महाराज कार्ले यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद झाला. या सर्व कार्यक्रमासाठी विजय काटे, ह. भ. प. बाळासाहेब शितोळे यांचे सहकार्य लाभले.

...Read More

V. S. News
शिक्षणाची गुणवत्ता समाजातील सर्व घटकांवर अवलंबून 

व्हीएस न्यूज - शिक्षणाची गुणवत्ता समाजातील सर्व घटकांवर अवलंबून असते. संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी व पालक हे चार घटक एकत्रितपणे काम करून शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेऊ शकतात, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. आर.एस. माळी यांनी केले.
इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित पदवीग्रहण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माळी बोलत होते. विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्याना डॉ. माळी यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी.डी. बाळसराफ हे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे, डॉ. विजयकुमार खंदारे, डॉ. सत्यम सानप, डॉ. सदाशिव मेंगाळ, डॉ. संदीप कांबळे, प्रा. सुरेश थरकुडे, स्वप्नाली सोनवणे, प्रा.योगिता शिंदे, श्रीकांत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. माळी म्हणाले, शिक्षणाची इमारत ही चार खांबावर उभी असते, त्यातील विद्यार्थी हा एक प्रमुख घटक आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करताना जिद्द, चिकाटी आणि अविरत परिश्रम घेणे गरजेचे असून, त्याशिवाय पर्याय नाही. आज नोकरी व व्यवसायिक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्यासाठी आवश्यक ती पात्रता धारण करून आपले ध्येय गाठले पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वर्तमानातील ज्ञान ग्रहण केले पाहिजे. स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून आपण प्राप्त केलेल्या पदवीचा जीवन जगण्यासाठी उपयोग करून घ्यावा, असेही डॉ. माळी यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. बाळसराफ म्हणाले, प्रत्येक विध्यार्थ्यांमध्ये एक राजहंस दडलेला असतो, त्याचा शोध घेऊन आपण भविष्याचा वेध घेतला पाहिजे. प्रत्येकजण आयुष्यभर विद्यार्थीच असतो. पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आपल्या जबाबदारीची जाणीव होणार आहे. शिक्षण आणि रक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांना एकवेळ चांगली गोष्ट करता आली नाही, तरी चालेल; परंतु त्यांनी वाईट गोष्ट करू नये, असे आवाहनही डॉ. बाळसराफ यांनी केले.
दरम्यान, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष गोरख काळोखे, मुकुंद खळदे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर यांनी विद्यार्थ्यांना करिअरमध्ये उत्तम प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी, तर आभार डॉ. सत्यम सानप यांनी मानले.

...Read More

V. S. News
थिसेनक्रुप मधील मशीनशॉप विभाग शून्य अपघात पारितोषिक विजेता

व्हीएस न्यूज - पिंपरीतील थिसेनक्रुप इंडस्ट्रीजमध्ये 4 ते 11 मार्च या काळात सुरक्षा सप्ताह पार पडला. या सप्ताहात मशिनशॉप विभागास अपघात विरहीत काम केल्याबद्दल शून्य अपघात पारितोषिक कंपनीचे जर्मनी येथील व्यवस्थापकीय संचालक डॉ. पीटर फेल्डस यांच्या हस्ते आणि थिसेनक्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलई दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात देण्यात आले. यावेळी कंपनीचे तांत्रिक उत्पादन संचालक सुहास तलाठी, राजेंद्र नागेशकर, रामचंद्र वाईंगडे यांच्या उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिष गावडे यांनी केले. आभार उदय शिंदे यांनी मानले.

...Read More

V. S. News
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने रविवारी नोकरी महोत्सव

व्हीएस न्यूज -हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त विश्व श्रीराम सेना पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने रविवारी आकुर्डी येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा आकुर्डी फोर्स मोटर्स कंपनीसमोरील मनपा उर्दू हायस्कूलच्या पटांगणावर भरणार असून या रोजगार मेळाव्यात 8वी, 10 वी पास नापास, पदवीधर, पदव्युत्तर उमेदवारांनी आपला बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी सकाळी 9 वाजता याठिकाणी उपस्थित रहावे.
उत्पादन, फार्मसी, फायनान्स, बीपीओ, कॉलसेंटर, आयटी, रिटेल, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, बॅकिंग, ग्रीकल्चर, सिक्युरीटी क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार आहेत. या बेरोजगार मेळाव्याचा जास्तीतजास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी केले आहे.

...Read More

V. S. News
थेरगाव दरोड्यातील आरोपींच्या 24 तासांच्या आत आवळल्या मुसक्या

व्हीएस न्यूज - जे. के. ऑनलाईन सेंटरमध्ये सहाजणांनी कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकला. हा प्रकार मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला. या प्रकरणातील सर्व आरोपींना हत्यारांसह पकडण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.
करण धरमसिंग वाल्मिकी (वय-19, रा. निगडी), प्रशांत नंदकुमार बहुले (वय 19, रा. निगडी), मंगेश सुरेश जाधव (वय 19, रा. निगडी), चंद्रकांत अनंत माने (वय-24, रा. चिंचवडगाव), निखील रामदास साळवे (वय 21, रा. निगडी), प्रतिक आनंद जाधव (वय 23, रा. निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल बालाजी वंगवाड (वय 23, रा. थेरगांव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत मंगळवारी रात्री आठच्या सुमारास थेरगाव येथील जे. के. ऑनलाईन सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करत सेंटरची तोडफोड करून वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. बुधवारी सांगवी पोलीस ठाण्याचे तपास पथक सांगवी परिसरात गस्त घालत असताना पिंपळे सौदागर मध्ये पवना नदीच्या शेजारी काशिदपार्क जवळ आर्मीच्या मोकळ्या मैदानात सर्व आरोपी बसल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाने वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करत सापळा रचून लोखंडी कोयत्यासह सहा आरोपींना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे, तपासी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे, पोलीस हवालदार सुरेश खांडेकर, गिरीश राऊत, रोहिदास बोऱ्हाडे, नितीन दांगडे, अरुण नरळे, शशिकांत देवकांत, हेमंत गुत्तीकोंडा, दीपक पिसे, शिमोन चांदेकर यांनी केली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!