व्हीएस न्यूज - जे. के. ऑनलाईन सेंटरमध्ये सहाजणांनी कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकला. हा प्रकार मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला. या प्रकरणातील सर्व आरोपींना हत्यारांसह पकडण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.
करण धरमसिंग वाल्मिकी (वय-19, रा. निगडी), प्रशांत नंदकुमार बहुले (वय 19, रा. निगडी), मंगेश सुरेश जाधव (वय 19, रा. निगडी), चंद्रकांत अनंत माने (वय-24, रा. चिंचवडगाव), निखील रामदास साळवे (वय 21, रा. निगडी), प्रतिक आनंद जाधव (वय 23, रा. निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल बालाजी वंगवाड (वय 23, रा. थेरगांव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत मंगळवारी रात्री आठच्या सुमारास थेरगाव येथील जे. के. ऑनलाईन सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करत सेंटरची तोडफोड करून वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. बुधवारी सांगवी पोलीस ठाण्याचे तपास पथक सांगवी परिसरात गस्त घालत असताना पिंपळे सौदागर मध्ये पवना नदीच्या शेजारी काशिदपार्क जवळ आर्मीच्या मोकळ्या मैदानात सर्व आरोपी बसल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाने वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करत सापळा रचून लोखंडी कोयत्यासह सहा आरोपींना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे, तपासी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे, पोलीस हवालदार सुरेश खांडेकर, गिरीश राऊत, रोहिदास बोऱ्हाडे, नितीन दांगडे, अरुण नरळे, शशिकांत देवकांत, हेमंत गुत्तीकोंडा, दीपक पिसे, शिमोन चांदेकर यांनी केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002