थिसेनक्रुप मधील मशीनशॉप विभाग शून्य अपघात पारितोषिक विजेता
पिंपरी चिंचवड
2018-03-16
व्हीएस न्यूज - पिंपरीतील थिसेनक्रुप इंडस्ट्रीजमध्ये 4 ते 11 मार्च या काळात सुरक्षा सप्ताह पार पडला. या सप्ताहात मशिनशॉप विभागास अपघात विरहीत काम केल्याबद्दल शून्य अपघात पारितोषिक कंपनीचे जर्मनी येथील व्यवस्थापकीय संचालक डॉ. पीटर फेल्डस यांच्या हस्ते आणि थिसेनक्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलई दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात देण्यात आले. यावेळी कंपनीचे तांत्रिक उत्पादन संचालक सुहास तलाठी, राजेंद्र नागेशकर, रामचंद्र वाईंगडे यांच्या उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिष गावडे यांनी केले. आभार उदय शिंदे यांनी मानले.