व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात उद्योगधंदा, नोकरी, शिक्षणानिमित्त मराठवाड्यातील अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. तथापि, लातुर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस व बिदर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज र्टमिनस सुपर एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा चिंचवड स्टेशनला करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांच्यामार्फत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेचे शहराध्यक्ष युवराज दाखले यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
दाखले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी म्हणुन ओळखले जाते. या शहरात उद्योग, नोकरी, शिक्षण, रोजगारासाठी मराठवाड्यातील उदगीर, लातुर, नांदेड, बिदर, अमरावती, धाराशिव येथील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. हे नागरिक लातुर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस व बिदर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज र्टमिनस सुपर एक्सप्रेस या रेल्वेने आल्यानंतर त्यांना पुणे रेल्वे स्टेशन अथवा लोणावळा रेल्वे स्टेशनवर उतरावे लागते. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी या दोन्हीही सुपर एक्सप्रेस गाड्यांना चिंचवड स्टेशन येथे थांबा करण्यात यावा अशी मागणी दाखले यांनी केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002