व्हीएस न्यूज - येथील एसटी कॉलनी शेजारील मुख्य बस स्थानकात सुरु करण्यात असलेल्या पाणपोईचे उद्घाटन नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
उन्हाच्या झळा वाढल्या असून बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने परिसरातील संतोष कांबळे, राकेश कांबळे यांच्या प्रयत्नातून पाणपोई उभारण्यात आली. बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे वाहक-चालक, प्रवासी व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यावेळी रामभाऊ देशपांडे, प्रकाश दिवार, आप्पा कांबळे, राकेश कांबळे, देवराम माकर, विलास वाघ, मुरली देवरे, बाळू कांबळे, शिवलिंग सरोदे, मुकुंद शिनगारी, गणेश गायकवाड, असलम शेख आदी उपस्थित होते.