Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
पादचारी तरूणाला अज्ञात वाहनाने उडविले

व्हिएस न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी तरूणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. तरूणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता बेंगलोर-मुंबई महामार्गावर घडला.
रूपेश कुमार तिवारी (वय-20, रा. भुमकर चौक,लेबर कॅम्प) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी मुमताज मनसुरी (वय-20) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश हा बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता बेंगलोर-मुंबई महामार्ग ओलांडत होता. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने रूपेशला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी होऊन रूपेशचा मृत्यू झाला. अपघातस्थळी न थांबता वाहन चालकाने पोबारा केला.
फौजदार पगारे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
प्रभात फेरीला गेलेला मुलगा बसच्या धडकेत ठार

व्हिएस न्यूज - प्रभात फेरीसाठी गेलेल्या बारा वर्षांच्या मुलाला भरधाव वेगातील मिनी बसने जोरदार धडक दिली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी सकाळी सव्वा सहा वाजता नाशिक फाटा येथील पुलावर घडला.

प्रतिक परमेश्वर सावंत (वय-12) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सुरज चंदनशिवे (वय-22, रा. आनंदनगर, पिंपळे-गुरव) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रतिकचे आई-वडील दोघेही अपंग असल्यामुळे त्याचा आधारवड गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरजबरोबर प्रतिक हा दररोज प्रभात फेरीसाठी जात असे. गुरूवारी सव्वासहाच्या सुमारास नाशिक फाटा येथील पुलावर प्रतिकला भरधाव वेगाने आलेल्या मिनी बसने जोरदार धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या प्रतिकचा जागीच मृत्यू झाला. तर घटनास्थळी न थांबता मिनी बस चालक पसार झाला. फौजदार एन. ए. डावरे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
पिंपरी महापालिकेच्या लिफ्टमधून पडून कर्मचारी जखमी

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या लिफ्ट मधून पडून एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. शरद भोंडवे असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव असूनभोंडवे यांच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.

पिंपरी महापालिकेतील उपमहापौर कार्यालयात शरद भोंडवे हे कार्यरत आहेत. दररोज प्रमाणे आज सकाळी ते कामावर आल्यानंतर तळमजल्यावरून ४ नंबरच्या लिफ्टने तिसर्या मजल्यावर येण्यास निघाले होते. यावेळी लिफ्टची लाईट अचानकपणे गेली आणि ते लिफ्ट मध्येच अडकली. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा अचानक उघडला. शरद भोंडवे यांनी लिफ्ट मधून बाहेर पाय टाकला, पण लिफ्ट अर्ध्यातच असल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यात त्यांच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर खाजगी रुग्णलयात उपचार सुरू असून गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

महापालिकेतील मुख्यालयात एकूण ४ लिफ्ट आहेत. त्यातील एक महापौर,आयुक्त, नगरसेवक, पदाधिकारी तसेच पत्रकार यांच्या वापरासाठी आहे. अन्य तीन लिफ्टचा वापर कर्मचारी तसेच नागरिक करतात. परंतू अनेकदा या लिफ्ट दुरूस्तीच्या कारणास्तव बंद असतात. तसेच या लिफ्टमधे लिफ्टमन जागेवर नसल्याच्या तक्रारीही महापालिकेत येणार्या नागरिकांकडून होत आहे. आज झालेल्या अपघातामुळे या लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित रहात आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी- चिंचवड महापालिका प्रभाग क्र. १७ मध्ये विकासकामांना वेग

व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रभागातील विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. प्रभागातील वारंवार उद्‌भवणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तसेच सांडपाण्याच्या समस्या नियोजनासंदर्भातील विकासकामांनी वेग धरला आहे. भाजपाचे नगरसेवक नामदेवराव ढाके यांच्या वारंवार सुरु असलेल्या पाठपुराव्याने आगामी काळातील अडचणींचा विचार करून विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत.

गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून तत्कालीन नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षांमुळे प्रभागातील विकास खालावला होता. त्यामुळे पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येवून स्थानिकांच्या घरात शिरत होते. याबाबत तत्कालीन नगरसेवकांकडे वारंवार मागणी करून देखील नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते.

परंतु, ढाके यांनी निवडणुकीच्या पहिल्याच वर्षी विकासकामांचा पाठपुरावा सुरु केला आहे. त्यांनी पहिल्याच वर्षी प्रभागात कमी दाबाचा होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष देवून पाण्याची समस्या सोडविली. यासह रस्ते डांबरीकरणावर भर दिला. इतकेच नव्हे तर बिजलीनगर, चिंचवडे नगर, समर्थ कॉलनी, चिंतामणी चौक, दगडोबा चौक आदी भागातील ड्रेनेजचे काम मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे.

...Read More

V. S. News
वाल्हेकरवाडी परिसरात शटल सेवा सुरु करावी – नगरसेवक नामदेव ढाके

व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड शहरातील बिजलीनगर या परिसरात प्रवाशांच्या वाहतुकीसाठी शटल सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक नामदेव ढाके यांनी केली आहे. याबाबत मागणीचे निवेदन पुणे महानगर परिवहन महामंडळाचे वाहतुक व्यवस्थापक, स्वारगेट यांना देण्यात आले आहे.

नगरसेवक ढाके यांनी निवेदनात म्हटले आहे की, बिजलीनगर, गुरुद्वारा, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज, रावेत परिसर, वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर या भागात बहुतांशी मध्यमवर्गीय कामगार वर्ग, शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थी वास्तव्यास आहेत. येथील बहुतांश नागरीक पिंपरी- चिंचवड, पुणे भागात कामानिमीत्त आकुर्डी रेल्वे स्टेशन, डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज, पिंपरी- चिंचवड पॉलीटेक्निक, चिंचवडगाव या ठिकाणी जातात. तथापि या भागातून प्रवाशांना प्रवासासाठी कुठलीही सार्वजनिक सुविधा नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा पर्याय शोधावा लागतो. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी चिंचवडगाव- बिजलीनगर गुरुद्वारा आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज रावेत परिसर, वाल्हेकरवाडी चिंचवडेनगर चिंचवडगाव अशी शटल सुविधा सुरु केल्यास मध्यमवर्गीय नागरिक, विद्यार्थी यांना जाणे- येणे सोयीस्करहोईल. तसेच, वाहतुक सुरळीत होवून वाहतुक कोंडीही लगाम बसेल. तरी, या परिसरात शटल सेवा सुरु करावी, असेही नामदेव ढाके यांनी निवेदनात नमूद केले आहे.

...Read More

V. S. News
‘कलारंग’ संस्थेतर्फे रविवारी कलासंगम सोहळ्याचे आयोजन

व्हीएस न्यूज - कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त कलारंग कला संस्था व संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि.१५) कलासंगम सोहळा २०१८चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरातील कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील १५० हून अधिक कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती कलासंस्था व संस्कार भारतीचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोरवाडी, येथे झालेल्या पत्रकार परिषदेला केतन लोंढे, दिनेश मारणे, सुमित काटकर, आशा नेगी, सुप्रिया धाईंजे, सरोज राव आदी उपस्थित होते.

चिंचवड, येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी सायंकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, प्रसिद्ध कथक नृतक डॉ. नंदकिशोर कपोते, तेजश्री अडिगे, पालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे, रविंद्र गांगुर्डे, गीता शर्मा, संदीप जाधव, संस्कार भारतीचे सतीश कुलकर्णी उपस्थित असणार आहेत.

अमित गोरखे म्हणाले, ”पिंपरी चिंचवड शहरातील सांस्कृतिक, साहित्य आणि कला क्षेत्रातील सर्वांना, ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शहराच्या नावलौकीकात भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. अशा सर्वांचा सन्मान कलासंगम २०१८या कार्यक्रमात केला जाणार आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य, गायन, नृत्य,अभिनय, दिग्दर्शन, संगीत, चित्रकला, शिल्पकला, रांगोळी, निवेदन, छायाचित्रकार यासारख्या विविध क्षेत्रातील मंडळीचा सन्मान केला जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहर केवळ औद्योगिक नसून कला, साहित्य व संस्कृतीने सज्ज असलेले शहर आहे, हे सिद्ध करण्यासाठी सर्वांना एकत्र जाणार आहे”. साहित्य, कला आणि संस्कृती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे कलासंगम कलासंगम कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील कलाकार आणि त्यांच्यासाठी काम करणा-या संस्थांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सांस्कृतिक मेजवानीसह विविध क्षेत्रातील तब्बल १५० पेक्षा जास्त कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या १५ कलाकारांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील कलाकार एकाच मंचावर आल्याने पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिक लौकिक वाढणार आहे.

भाऊसाहेब भोईर, नंदकिशोर कपोते, प्रवीण तुपे, डॉ. सतिश गोरे, बाळ जुआटकर, राजन लाखे, सतिश वर्तक, किरण एवलेकर, तेजश्री अडिगे, संजय कांबळे, राज आहेरराव, वैशाली पळसुले, दत्तोबा पाचंगे, देवदत्त कशाळीकर आणि नाना शिवले यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रभा एंटरप्रायझेस निर्मित पिंपरी चिंचवड मधील स्थानिक कलाकारांचा मराठी व गाणी, नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.

...Read More

V. S. News
…तर राजकारण सोडेन – लक्ष्मण जगताप

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमध्ये झालेल्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पिंपरी चिंचवड मधल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे पलटवार केला आहेकचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेची निविदा मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीने त्यात भ्रष्टाचार सिद्ध झाल्याची टीका केली होती. दादा-भाऊ मिळून खाऊ अशा शब्दात अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्योत्तर देताना मी जर कचरा निविदा प्रक्रियेत एक रुपयांचा मिंदा असेल तर राजकारण सोडेल अशा शब्दात लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले.राष्ट्रवादीचा हल्लाबोल म्हणजे मनोरंजनाचा आर्केस्ट्रा असल्याची टीका त्यांनी केलीय…!

...Read More

V. S. News
माझ्या नादाला लागू नका; अजित पवारांचा बापटांना दम

Turn off for: Marathi

व्हीएस न्यूज - माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अप्रत्यक्षपणे बापटांना दम भरला. मी शांत आहे, तोपर्यंत आहे, माझ्या नादाला लागू नका, असा इशारा अजित पवारांनी दिला.

पुण्यात नारळ फोडण्याशिवाय अजित पवारांनी काहीच कामे केली नाहीत, अशी टीका बापटांनी केली होती. अजित पवारांनी या टीकेला उत्तर देताना हा इशारा दिला. अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात बोलताना भाजपवर निशाणा साधला.

बापटांना मी सांगत आहे, मी शांत आहे तो पर्यंत शांत आहे, नाद करायचा नाय बापट. माझ्या बरोबर तुम्ही दहा वर्ष काम केलेले आहे. प्रत्येकाचा आदर आम्हीपण करतो, तशी पवार साहेबांची शिकवण आहे, तुम्ही काय-काय वक्तव्य केली ते येथे महिला असल्याने काढू इच्छित नाही आणि ते सर्वांना माहित आहे आपला आवाका काय आपली कुवत काय, आपण करता काय? असे म्हणत अजित पवारांनी बापटांचा खरपूस समाचार घेतला.

...Read More

V. S. News
पिंपरी – चिंचवड शहरातील विकासकामांसाठी २६ कोटींचा निधी मंजूर

व्हीएस न्यूज - पिंपरी – चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २६ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. स्थायी समिती सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. देहू आळंदी रस्त्यावरील विविध सेवा वाहिन्यांसाठी खोदलेला रस्ता व पदपथ यांचे चर पुर्ववत करण्यासाठी सुमारे ७७ लाख २४ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मंजूरी दिली.

मनपा मुख्यालयात उर्वरित सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उभारण्यासाठी येणाऱ्या सुमारे २८ लाख रुपये, प्रभाग क्र. १० तुळजाईवस्ती व विवेकनगर मध्ये पेव्हींग ब्लॉक, गटर्स, रस्ते दुभाजक फुटपाथ व मनपा इमारतीची किरकोळ दुरूस्तीच्या कामासाठी सुमारे ४१ लाख ०७ हजार रुपये, ड क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील कचरा उचलणे व वाहतुक करण्यासाठी ४९ लाख ६६ हजार रुपये, शेवाळेवाडी ग्रामपंचायतीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दहा हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरव्दारे दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ४० लाख रुपयेखर्च, पिंपरी चिंचवड मनपाचे सर्व्हर, फायरवॉल व आवश्यक संगणक यंत्रणा देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ४८ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार उपक्रमांतर्गत प्रबोधनपर्वाचे आयोजनासाठी २४ लाख ९८ हजार रुपये खर्चास मान्यता, विविध कंपन्याच्या / मनपाच्या सेवावाहिन्या टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, मनपा क्षेत्रातील डांबरी रस्त्यावरील खड्डे जेट पॅचर पॉटहोल मशिन व्दारे भरण्यासाठी येणा-या सुमारे ८ कोटी ३२ लाख ४१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या ताब्यातील पेठ क्र.५ व ८ मधील ग.नं.५४४ शेजारील क्षेत्रामध्ये उद्यान, खेळाचे मैदान व शाळा बांधणेकरिता मनपास आवश्यक एवढा भुखंड ताब्यात घेण्यास येणा-या सुमारे २ कोटी ०७ लाख ३६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ब व क प्रभाग कार्यक्षेत्रातील घरोघरचा कचरा गोळा करुन मोशी कचराडेपो येथे वाहतुक करुन टाकण्यासाठी येणा-या सुमारे ३ कोटी ३७ लाख ०५ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. ब व क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी उपलब्ध वाहनांवर ३८ वाहन चालक, २ सुपरवायझर व ७६ कामगार पुरविण्यासाठी येणा-या सुमारे ५५ लाख ०४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालयातील टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी उपलब्ध वाहनांवर ५३ वाहन चालक, ३ सुपरवायझर व १०६ कामगार पुरविण्यासाठी येणाऱ्या सुमारे ७४ लाख ९४ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. ड क्षेत्रीय कार्यालयातील टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी उपलब्ध वाहनांवर ४७ वाहन चालक, ३ सुपरवायझर व ९४ कामगार पुरविण्यासाठी येणा-या सुमारे ६८ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अ क्षेत्रीय कार्यालयातील टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी उपलब्ध वाहनांवर ४५ वाहन चालक, ३ सुपरवायझर व ९० कामगार पुरविण्यासाठी येणा-या सुमारे ६३ लाख ५८ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

...Read More

V. S. News
आमदार लांडगे अन् जगतापांवर अजितदादांचा हल्लाबोल

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेतील कारभाराची परिस्थिती दादा-भाऊ दोघं मिळून खाऊ अशी चाललीय, हे म्हणतील तिच पूर्व दिशा, यांना विचारणारं कोणी नाही. शहराचा विकास थांबलायं, कोणतेही नवीन प्रकल्प नाहीत. प्रत्येक कामात भ्रष्टाचाराचा आरोप होतोय. कचर्याचा प्रश्न गंभीर झालायं, दादागिरी वाढलीय. या आमदारांनी ४ वर्षात काय काम केलंय असा सवाल करत महेश लांडगे आणि लक्ष्मण जगतापांवर नाव न घेता हल्लाबोल केला.

काळेवाडी येथे आयोजित हल्लाबोल सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील,शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार बापू पठारे, विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, खोटं बोलून ही मंडळी सत्तेत आली. ४ वर्षात इथल्या आमदारांनी शहरासाठी काय केलं, कोणतचं विकासाच काम केले नाही. केवळ राष्ट्रवादीने केलेल्या भूमिपूजनांच्या कामांची उद्घाटने यांनी केलीत. वर्षभरात त्यांनी केलेल्या प्रत्येक कामावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. करचा उचलण्याचं टेंडर आज भ्रष्टाचाराच्या आरोपामुळंच रद्द झालं. शहरात आज कचर्याची समस्या भयानक झालीयं. सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलयं. गुन्हेगारी वाढली आहे. वाहने तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. सर्वत्र दादागिरी पसरत चालली आहे. पाण्याची समस्या लोकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. मुळातच काम करण्याची इच्छा शक्ती पाहिजे. परंतू दादा-भाऊ दोघं मिळून खाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ते म्हणतील तिच पूर्व दिशा आहे. यांना कुणीच विचारत नाही.

...Read More

V. S. News
जीवे मारण्याची धमकी देत अडीच लाख घेवून दोघे फरार

व्हीएस न्यूज - व्यवसायात तुमच्यामुळे आमचे 25 लाखांचे नुकसान झाले आहे. असे म्हणत तिघांनी एकाकडून जबरदस्तीने अडीच लाख रूपये घेतले. तसेच दोघांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी बावधन येथे घडला. याप्रकरणी एकाला अटक केली असून दोघे फरार आहेत.

कृष्णा भुजंगराव वारे (वय-38, रा. आनंदनगर, पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार फरार आहेत. याप्रकरणी संदीप उकरणा (वय-43, रा. बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार पगारे यांनी माहिती दिली.

फिर्यादी उकरणा व आरोपी एकमेकाच्या ओळखीचे आहेत. त्यांनी 2017 मध्ये औरंगाबाद येथे डिजीटल मार्केटींगचे नागरिकांना प्रशिक्षण दिले. त्यांना 4 लाख 50 हजार रूपये मिळाले होते. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कामगारांना पैशाच्या देवान-घेवानवरून फिर्यादी व आरोपींचा वाद झाला होता. त्यावेळी फिर्यादीच्या एका मित्राने मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता. परंतू, फिर्यादीला तुमच्या मित्रामुळे आमचे 25 लाखांचे नुकसान झाल्याचे म्हणत सोमवारी दोघांना मोटारीत बसवून बावधन येथील घरी नेले. तसेच फिर्यादीकडून अडीच लाख रूपये जबरदस्तीने घेवून त्यांच्या मोटारीची चावी घेतली. याचे सर्व व्हिडीओ रेकॉर्डींग केले. फिर्यादी व त्यांच्या मित्राला मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
कामगारांना धमकावून 16 हजारांचा ऐवज पळविला

व्हीएस न्यूज - कंपनीतील कामगारांना धमकी देत एका त्रिकुटाने कॉपर वायर, पट्या व एक मोबाईल असा 16 हजारांचा ऐवज जबरदस्तीने नेला. हा प्रकार मंगळवारी पहाटे भोसरीतील साई एंटरप्रायजेस या कंपनीत घडला. राकेश चौधरी (वय-22, रा. भोसरी) याने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीत सेक्टर नं 7/108 येथे साई एंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे. फिर्यादी चौधरी व त्याचा सहकारी बबलू कंपनीत मंगळवारी पहाटे काम करत होते. एका दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने फिर्यादीला धमकी देऊन कॉपर वायर, पट्या व एक मोबाईल असा 16 हजारांचा ऐवज जबरदस्तीने नेला. फौजदार आहेर अधिक तपास करत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!