व्हिएस न्यूज - प्रभात फेरीसाठी गेलेल्या बारा वर्षांच्या मुलाला भरधाव वेगातील मिनी बसने जोरदार धडक दिली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी सकाळी सव्वा सहा वाजता नाशिक फाटा येथील पुलावर घडला.
प्रतिक परमेश्वर सावंत (वय-12) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सुरज चंदनशिवे (वय-22, रा. आनंदनगर, पिंपळे-गुरव) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रतिकचेआई-वडील दोघेही अपंग असल्यामुळे त्याचा आधारवड गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरजबरोबर प्रतिक हा दररोज प्रभात फेरीसाठी जात असे. गुरूवारी सव्वासहाच्या सुमारास नाशिक फाटा येथील पुलावर प्रतिकला भरधाव वेगाने आलेल्या मिनी बसने जोरदार धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या प्रतिकचा जागीच मृत्यू झाला. तर घटनास्थळी न थांबता मिनी बस चालक पसार झाला.फौजदार एन. ए. डावरे अधिक तपास करत आहेत.