व्हिएस न्यूज - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीस खडकी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. औंधरोड बोपोडी येथिल मित्राच्या अल्पवयीन बहिणीस दि. 25 मार्च रोजी संध्याकाळी राहत्या घरातुन बुलेटवरुन फिरण्यास जाण्याच्या बहाण्याने पळवुन नेऊन दि. 25 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान काळेवाडी नढेनगर येथे ठेऊन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी महेश उर्फ सॅंम रविंन्द्र पाटोळे (रा.भिंगार अहमदनगर) यांस पोलिसांनी अटक करण्यात आली होती. मंगळवारी आरोपी पाटोळे यांस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. दि.10 मार्च रोजी फिर्यादी हे खडकी बाजार येथे नातेवाईकासमवेत लग्नाचा बस्ता बांधण्या करिता गेले होते. पत्नी घरकाम करित असताना मुलगी काही न सांगता घराबाहेर गेली. ती बराच वेळ झाला तरी ती घरी न आल्याने आजुबाजुला व नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु तिचा शोध लागला नाही. पाटोळे हा नेहमी घरी येत असे त्याचा संशय आल्याने त्याची चौकशी केली असता तो ही गायब असल्याचे समजले. त्यानंतर मुलीच्या वडीलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिस उप निरिक्षक मदन कांबळे व पोलिस कर्मचारी जे.एम.मोमिन यांनी आरोपीने आईला मोबाईल वरुन केलेल्या फोनवरून त्याआधारे कॉंमन आयडीचा शोध घेतला. त्याद्वारे आरोपी पाटोळेचा लोकेशन ट्रेस केला तो प्रथम म्हाळुंगे बालेवाडी व नंतर काळेवाडी येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी त्यास व अल्पवयीन मुलीस नढे नगर काळेवाडी येथुन ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीने आरोपी याने लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासा अंतर्गत सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पाटोळे वर गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.
व्हिएस न्यूज - आईला झालेल्या गंभीर आजारामुळे यातून आलेल्या नैराश्यातून मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी रात्री आठच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आला. गौतम चंद्रकांत ठोसर (वय-24, रा. सोनवने वस्ती,ताथवडे, मुळ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव यांनी माहिती दिली. गौतम हा त्याचा मोठा भाऊ व आईसह ताथवडे येथे राहण्यास आहे. काही वर्षांपुर्वी गौतमच्या वडीलांचे निधन झाल्याने दोघां भावांवर कुटूंबाची जबाबदारी होती. गौतम इलेक्ट्रिकची कामे करत होता. काही दिवसांपुर्वीच त्यांच्या आईला गंभीर आजार असल्याचे स्पष्ट झाले. आईवर एका खासगी रूग्णालयात दहा दिवसांपासून उपचार सुरू आहेत. आईच्या आजारपणामुळे गौतमला नैराश्य आले होते. यातून गौतमने घरात कोणी नसताना गळफास घेवून आत्महत्या केली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - चऱ्होलीत दहा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी समोर आला आहे. भारत सुरवसे (वय-28, रा. लोहारा, उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत32 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दहा वर्षीय मुलावर मंगळवारी लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाने घरच्यांना सांगितला. त्यानंतर मुलाच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात फिर्याद दिली. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - हॉटेलचा व्यवस्थापक आणि बाऊन्सरने ग्राहकाला किरकोळ कारणावरून लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. हा प्रकार नुकताच पिंपळे-सौदागर येथे घडला. गणेश विठ्ठल पिदुलकर (वय-28, रा. हिंजवडी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बाऊन्सर आकाश करम गंगावणे (रा. रूपीनगर, तळवडे), अमोल विलास चौधरी (रा. मिलिंदनगर, निगडी), मंगेश वाघंबर दुवे (रा. रहाटणी),सनी मायकल गायकवाड (वय-30, रा. दत्तनगर, एकता चौक, थेरगाव), विनीतकुमार विनोदकुमार सिंग (वय-28,रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे-सौदागर परिसरातील स्पॉट 18 हा पब व हॉटेल आहे. यामध्ये गणेश आपल्या मैत्रिणींसोबत जेवनासाठी गेला होता. गणेशने आणखी जेवन मागविले. आरोपींनी हॉटेल बंद होण्याची वेळ झाली असल्याचे सांगत व्यवस्थापनाने जेवन देण्यास नकार दिला. गणेशने आपल्याकडे हॉटेलचे कुपन असल्याचे सांगितले. यावरून चिडलेल्या व्यवस्थापकाने त्यांना धक्काबुक्की करून हॉटेलच्या बाहेर काढले. हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या बाऊन्सरने गणेशला लाथाबुक्यांनी व हातातील कड्यानी जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गणेशवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. फौजदार हरीश माने अधिक तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - आकुर्डीतील गुंड अजय काळभोर टोळीतील एका गुंडाकडून दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असा 61 हजार 200 रूपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखेने केली. दत्ता विठ्ठल आगलावे (वय-25, रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर पुणे शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात खून, कट रचने,दरोड्याचा प्रयत्न, गावठी कट्टे बाळगल्याचे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसांनी अटक केलेल्या अजय काळभोर व तिरूपती ऊर्फ बाब्या जाधव यांनी आरोपीला पिस्तूले दिली होती. ही पिस्तूले त्यांनी मध्यप्रदेशातून पुण्यात विक्रीसाठी आणली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवाडी, सहा. पोलीस निरीक्षक गणेश पवार, राजू मोरे, भालचंद्र बोरकर, निलेश शिवतरे आदींच्या पथकाने केली.
व्हिएस न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी तरूणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. तरूणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता बेंगलोर-मुंबई महामार्गावर घडला. रूपेश कुमार तिवारी (वय-20, रा. भुमकर चौक,लेबर कॅम्प) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी मुमताज मनसुरी (वय-20) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश हा बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता बेंगलोर-मुंबई महामार्ग ओलांडत होता. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने रूपेशला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी होऊन रूपेशचा मृत्यू झाला. अपघातस्थळी न थांबता वाहन चालकाने पोबारा केला. फौजदार पगारे अधिक तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - प्रभात फेरीसाठी गेलेल्या बारा वर्षांच्या मुलाला भरधाव वेगातील मिनी बसने जोरदार धडक दिली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी सकाळी सव्वा सहा वाजता नाशिक फाटा येथील पुलावर घडला.
प्रतिक परमेश्वर सावंत (वय-12) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सुरज चंदनशिवे (वय-22, रा. आनंदनगर, पिंपळे-गुरव) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रतिकचे आई-वडील दोघेही अपंग असल्यामुळे त्याचा आधारवड गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरजबरोबर प्रतिक हा दररोज प्रभात फेरीसाठी जात असे. गुरूवारी सव्वासहाच्या सुमारास नाशिक फाटा येथील पुलावर प्रतिकला भरधाव वेगाने आलेल्या मिनी बसने जोरदार धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या प्रतिकचा जागीच मृत्यू झाला. तर घटनास्थळी न थांबता मिनी बस चालक पसार झाला. फौजदार एन. ए. डावरे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या लिफ्ट मधून पडून एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. शरद भोंडवे असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव असूनभोंडवे यांच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
पिंपरी महापालिकेतील उपमहापौर कार्यालयात शरद भोंडवे हे कार्यरत आहेत. दररोज प्रमाणे आज सकाळी ते कामावर आल्यानंतर तळमजल्यावरून ४ नंबरच्या लिफ्टने तिसर्या मजल्यावर येण्यास निघाले होते. यावेळी लिफ्टची लाईट अचानकपणे गेली आणि ते लिफ्ट मध्येच अडकली. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा अचानक उघडला. शरद भोंडवे यांनी लिफ्ट मधून बाहेर पाय टाकला, पण लिफ्ट अर्ध्यातच असल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यात त्यांच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर खाजगी रुग्णलयात उपचार सुरू असून गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
महापालिकेतील मुख्यालयात एकूण ४ लिफ्ट आहेत. त्यातील एक महापौर,आयुक्त, नगरसेवक, पदाधिकारी तसेच पत्रकार यांच्या वापरासाठी आहे. अन्य तीन लिफ्टचा वापर कर्मचारी तसेच नागरिक करतात. परंतू अनेकदा या लिफ्ट दुरूस्तीच्या कारणास्तव बंद असतात. तसेच या लिफ्टमधे लिफ्टमन जागेवर नसल्याच्या तक्रारीही महापालिकेत येणार्या नागरिकांकडून होत आहे. आज झालेल्या अपघातामुळे या लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित रहात आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रभागातील विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. प्रभागातील वारंवार उद्भवणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तसेच सांडपाण्याच्या समस्या नियोजनासंदर्भातील विकासकामांनी वेग धरला आहे. भाजपाचे नगरसेवक नामदेवराव ढाके यांच्या वारंवार सुरु असलेल्या पाठपुराव्याने आगामी काळातील अडचणींचा विचार करून विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत.
गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून तत्कालीन नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षांमुळे प्रभागातील विकास खालावला होता. त्यामुळे पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येवून स्थानिकांच्या घरात शिरत होते. याबाबत तत्कालीन नगरसेवकांकडे वारंवार मागणी करून देखील नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते.
परंतु, ढाके यांनी निवडणुकीच्या पहिल्याच वर्षी विकासकामांचा पाठपुरावा सुरु केला आहे. त्यांनी पहिल्याच वर्षी प्रभागात कमी दाबाचा होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष देवून पाण्याची समस्या सोडविली. यासह रस्ते डांबरीकरणावर भर दिला. इतकेच नव्हे तर बिजलीनगर, चिंचवडे नगर, समर्थ कॉलनी, चिंतामणी चौक, दगडोबा चौक आदी भागातील ड्रेनेजचे काम मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड शहरातील बिजलीनगर या परिसरात प्रवाशांच्या वाहतुकीसाठी शटल सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक नामदेव ढाके यांनी केली आहे. याबाबत मागणीचे निवेदन पुणे महानगर परिवहन महामंडळाचे वाहतुक व्यवस्थापक, स्वारगेट यांना देण्यात आले आहे.
नगरसेवक ढाके यांनी निवेदनात म्हटले आहे की, बिजलीनगर, गुरुद्वारा, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज, रावेत परिसर, वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर या भागात बहुतांशी मध्यमवर्गीय कामगार वर्ग, शाळकरी – महाविद्यालयीन विद्यार्थी वास्तव्यास आहेत. येथील बहुतांश नागरीक पिंपरी- चिंचवड, पुणे भागात कामानिमीत्त आकुर्डी रेल्वे स्टेशन, डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज, पिंपरी- चिंचवड पॉलीटेक्निक, चिंचवडगाव या ठिकाणी जातात. तथापि या भागातून प्रवाशांना प्रवासासाठी कुठलीही सार्वजनिक सुविधा नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा पर्याय शोधावा लागतो. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी चिंचवडगाव- बिजलीनगर – गुरुद्वारा – आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर – डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज – रावेत परिसर, वाल्हेकरवाडी – चिंचवडेनगर – चिंचवडगाव अशी शटल सुविधा सुरु केल्यास मध्यमवर्गीय नागरिक, विद्यार्थी यांना जाणे- येणे सोयीस्करहोईल. तसेच, वाहतुक सुरळीत होवून वाहतुक कोंडीही लगाम बसेल. तरी, या परिसरात शटल सेवा सुरु करावी, असेही नामदेव ढाके यांनी निवेदनात नमूद केले आहे.
व्हीएस न्यूज - कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त कलारंग कला संस्था व संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि.१५) ‘कलासंगम सोहळा २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरातील कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील १५० हून अधिक कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती कलासंस्था व संस्कार भारतीचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोरवाडी, येथे झालेल्या पत्रकार परिषदेला केतन लोंढे, दिनेश मारणे, सुमित काटकर, आशा नेगी, सुप्रिया धाईंजे, सरोज राव आदी उपस्थित होते.
चिंचवड, येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी सायंकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, प्रसिद्ध कथक नृतक डॉ. नंदकिशोर कपोते, तेजश्री अडिगे, पालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे, रविंद्र गांगुर्डे, गीता शर्मा, संदीप जाधव, संस्कार भारतीचे सतीश कुलकर्णी उपस्थित असणार आहेत.
अमित गोरखे म्हणाले, ”पिंपरी चिंचवड शहरातील सांस्कृतिक, साहित्य आणि कला क्षेत्रातील सर्वांना, ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शहराच्या नावलौकीकात भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. अशा सर्वांचा सन्मान ‘कलासंगम २०१८’ या कार्यक्रमात केला जाणार आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य, गायन, नृत्य,अभिनय, दिग्दर्शन, संगीत, चित्रकला, शिल्पकला, रांगोळी, निवेदन, छायाचित्रकार यासारख्या विविध क्षेत्रातील मंडळीचा सन्मान केला जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहर केवळ औद्योगिक नसून कला, साहित्य व संस्कृतीने सज्ज असलेले शहर आहे, हे सिद्ध करण्यासाठी सर्वांना एकत्र जाणार आहे”. साहित्य, कला आणि संस्कृती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे कलासंगम कलासंगम कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील कलाकार आणि त्यांच्यासाठी काम करणा-या संस्थांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सांस्कृतिक मेजवानीसह विविध क्षेत्रातील तब्बल १५० पेक्षा जास्त कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या १५ कलाकारांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील कलाकार एकाच मंचावर आल्याने पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिक लौकिक वाढणार आहे.
भाऊसाहेब भोईर, नंदकिशोर कपोते, प्रवीण तुपे, डॉ. सतिश गोरे, बाळ जुआटकर, राजन लाखे, सतिश वर्तक, किरण एवलेकर, तेजश्री अडिगे, संजय कांबळे, राज आहेरराव, वैशाली पळसुले, दत्तोबा पाचंगे, देवदत्त कशाळीकर आणि नाना शिवले यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रभा एंटरप्रायझेस निर्मित पिंपरी चिंचवड मधील स्थानिक कलाकारांचा मराठी व गाणी, नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमध्ये झालेल्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पिंपरी चिंचवड मधल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे पलटवार केला आहे… कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेची निविदा मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीने त्यात भ्रष्टाचार सिद्ध झाल्याची टीका केली होती. दादा-भाऊ मिळून खाऊ अशा शब्दात अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्योत्तर देताना मी जर कचरा निविदा प्रक्रियेत एक रुपयांचा मिंदा असेल तर राजकारण सोडेल अशा शब्दात लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले.राष्ट्रवादीचा हल्लाबोल म्हणजे मनोरंजनाचा आर्केस्ट्रा असल्याची टीका त्यांनी केलीय…!
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002