व्हिएस न्यूज - आईला झालेल्या गंभीर आजारामुळे यातून आलेल्या नैराश्यातून मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी रात्री आठच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आला.
गौतम चंद्रकांत ठोसर (वय-24, रा. सोनवने वस्ती,ताथवडे, मुळ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव यांनी माहिती दिली. गौतम हा त्याचा मोठा भाऊ व आईसह ताथवडे येथे राहण्यास आहे. काही वर्षांपुर्वी गौतमच्या वडीलांचे निधन झाल्याने दोघां भावांवर कुटूंबाची जबाबदारी होती. गौतम इलेक्ट्रिकची कामे करत होता. काही दिवसांपुर्वीच त्यांच्या आईला गंभीर आजार असल्याचे स्पष्ट झाले. आईवर एका खासगी रूग्णालयात दहा दिवसांपासून उपचार सुरू आहेत. आईच्या आजारपणामुळे गौतमला नैराश्य आले होते. यातून गौतमने घरात कोणी नसताना गळफास घेवून आत्महत्या केली.
वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.