व्हिएस न्यूज - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीस खडकी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. औंधरोड बोपोडी येथिल मित्राच्या अल्पवयीन बहिणीस दि. 25 मार्च रोजी संध्याकाळी राहत्या घरातुन बुलेटवरुन फिरण्यास जाण्याच्या बहाण्याने पळवुन नेऊन दि. 25 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान काळेवाडी नढेनगर येथे ठेऊन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी महेश उर्फ सॅंम रविंन्द्र पाटोळे (रा.भिंगार अहमदनगर) यांस पोलिसांनी अटक करण्यात आली होती. मंगळवारी आरोपी पाटोळे यांस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. दि.10 मार्च रोजी फिर्यादी हे खडकी बाजार येथे नातेवाईकासमवेत लग्नाचा बस्ता बांधण्या करिता गेले होते. पत्नी घरकाम करित असताना मुलगी काही न सांगता घराबाहेर गेली. ती बराच वेळ झाला तरी ती घरी न आल्याने आजुबाजुला व नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु तिचा शोध लागला नाही. पाटोळे हा नेहमी घरी येत असे त्याचा संशय आल्याने त्याची चौकशी केली असता तो ही गायब असल्याचे समजले. त्यानंतर मुलीच्या वडीलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिस उप निरिक्षक मदन कांबळे व पोलिस कर्मचारी जे.एम.मोमिन यांनी आरोपीने आईला मोबाईल वरुन केलेल्या फोनवरून त्याआधारे कॉंमन आयडीचा शोध घेतला. त्याद्वारे आरोपी पाटोळेचा लोकेशन ट्रेस केला तो प्रथम म्हाळुंगे बालेवाडी व नंतर काळेवाडी येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी त्यास व अल्पवयीन मुलीस नढे नगर काळेवाडी येथुन ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीने आरोपी याने लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासा अंतर्गत सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पाटोळे वर गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002