व्हिएस न्यूज - चऱ्होलीत दहा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी समोर आला आहे. भारत सुरवसे (वय-28, रा. लोहारा, उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत32 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दहा वर्षीय मुलावर मंगळवारी लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाने घरच्यांना सांगितला. त्यानंतर मुलाच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात फिर्याद दिली. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.