व्हिएस न्यूज - हॉटेलचा व्यवस्थापक आणि बाऊन्सरने ग्राहकाला किरकोळ कारणावरून लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. हा प्रकार नुकताच पिंपळे-सौदागर येथे घडला.
गणेश विठ्ठल पिदुलकर (वय-28, रा. हिंजवडी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बाऊन्सर आकाश करम गंगावणे (रा. रूपीनगर, तळवडे), अमोल विलास चौधरी (रा. मिलिंदनगर, निगडी), मंगेश वाघंबर दुवे (रा. रहाटणी),सनी मायकल गायकवाड (वय-30, रा. दत्तनगर, एकता चौक, थेरगाव), विनीतकुमार विनोदकुमार सिंग (वय-28,रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे-सौदागर परिसरातील स्पॉट 18 हा पब व हॉटेल आहे. यामध्ये गणेश आपल्या मैत्रिणींसोबत जेवनासाठी गेला होता. गणेशने आणखी जेवन मागविले. आरोपींनी हॉटेल बंद होण्याची वेळ झाली असल्याचे सांगत व्यवस्थापनाने जेवन देण्यास नकार दिला. गणेशने आपल्याकडे हॉटेलचे कुपन असल्याचे सांगितले. यावरून चिडलेल्या व्यवस्थापकाने त्यांना धक्काबुक्की करून हॉटेलच्या बाहेर काढले. हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या बाऊन्सरने गणेशला लाथाबुक्यांनी व हातातील कड्यानी जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गणेशवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. फौजदार हरीश माने अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002