व्हिएस न्यूज - आकुर्डीतील गुंड अजय काळभोर टोळीतील एका गुंडाकडून दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असा 61 हजार 200 रूपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखेने केली. दत्ता विठ्ठल आगलावे (वय-25, रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर पुणे शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात खून, कट रचने,दरोड्याचा प्रयत्न, गावठी कट्टे बाळगल्याचे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसांनी अटक केलेल्या अजय काळभोर व तिरूपती ऊर्फ बाब्या जाधव यांनी आरोपीला पिस्तूले दिली होती. ही पिस्तूले त्यांनी मध्यप्रदेशातून पुण्यात विक्रीसाठी आणली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवाडी, सहा. पोलीस निरीक्षक गणेश पवार, राजू मोरे, भालचंद्र बोरकर, निलेश शिवतरे आदींच्या पथकाने केली.