व्हीएस न्यूज - वीस दिवसांपूर्वी विवाहबध्द झालेल्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सेन्चुरीएंका कॉलनी येथे उघडकीस आली. संदीप दत्तात्रय कानडे (वय 23, रा. सेच्युरी एंका कॉलनी, भोसरी. मूळगाव रहाता, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंच्युरी एका कॉलनीतील मोकळ्या व आतून बंद असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला कळविली. खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यात पंख्याच्या हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन संदीप यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले.
संदीपचा 24 मार्च रोजी विवाह झाला होता. तो डॉक्टरांचा मदतनीस म्हणून काम करीत होता. तो चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. शनिवारी त्याचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत
व्हीएस न्यूज - बडोदा येथे संपन्न झालेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ समीक्षक, 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत संवेदना प्रकाशननिर्मित आणि ज्येष्ठ साहित्यिक विलास राजे लिखित आठ पुस्तकांचा प्रकाशन सोहळ्याचे उद्या (बुधवार) आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. लिज्जत पापड उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रकाशन समारंभात 'कथाकलश' (कथासंग्रह), 'झिपरी' (कादंबरी), 'चैतन्याचा जिव्हाळा' (लेखसंग्रह), 'भावस्पर्श' (कवितासंग्रह), 'शब्दरूप' (चारोळीसंग्रह), 'प्रजापती कुंभार' (संकीर्ण), 'असे घडले पुणे' (संकीर्ण), 'माणसं मराठी मुलखातली' (संकीर्ण) अशा वैविध्यपूर्ण पुस्तकांचा समावेश आहे. रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन विलास राजे, संजय राजे आणि नीता हिरवे यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आयोजित मॉक टेस्ट या सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेसाठी लोणावळा परिसरातील जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने रजिस्ट्रेशन केले होते. लोणावळा शहरात प्रथमच ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये NEET -UG, CET-PCM CET- PCM,CET-LAWच्या अभ्यासक्रमाचा समावेश होता.
लोणावळा नगरपरिषदेच्या उर्दू व मराठी माध्यमिक विद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. मावळ विधानसभा संपर्क प्रमुख गणेश जाधव व युवासेना विस्तारक मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांनी परीक्षा केंद्रांना भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
परीक्षाचे संयोजन लोणावळा शहराचे युवासेना अध्यक्ष तानाजी सुर्यवंशी, भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर संघटक शाम सुतार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले होते. परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी, नगरसेवक सुनिल इंगुळकर, उपशहरप्रमुख बाळासाहेब फाटक, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, सिंधु परदेशी, दिपाली भिल्लारे, संगीता कंधारे, मनिषा भांगरे, जयवंत दळवी, संजय भोईर, श्रीकांत कंधारे, मनीष पवार, मोहन मल्ला, विजय आखाडे, विजय मोरे, ओमकार फाटक आदी उपस्थित होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिलेचे क्रांतीवीर नगर येथे फरशीचे दुकान आहे. 12 एप्रिल रोजी आरोपी वाघमारे रात्री साडेआठच्या सुमारास दुकानात आला. दुकानातील लाईट बंद करून आरोपीने महिलेला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत महिलेच्या कमरेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने व रोकड असा 1लाख 14 हजारांचा ऐवज जबरदस्तीने नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. एस. भोगम अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - दुधवाल्याला मारहाण करत त्याच्याकडील 1 लाख 20 हजार रूपयांची रोकड दोघांनी लुटली. ही घटना रविवारी पहाटे संत तुकाराम नगर येथे घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. सागर बसु चौधरी (वय-24, रा. नेहरूनगर), विनम्र अहिवळे (वय-37, रा. उदयमनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संतोष चांदेरे (वय-43, रा. खराळवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदेरे हे रविवारी पहाटे संत तुकाराम नगर येथे दुधाच्या टेम्पोसह थांबले होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या आरोपी चौधरी व अहिवळे यांनी चांदेरे यांच्या टेम्पोच्या उजव्या बाजूला मोटार लावली. आरोपींनी चांदेरे या विनाकारण हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. चौधरीने चांदेरे यांना डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. अहिवळे याने त्यांच्याजवळील दुध विक्रीतून जमा झालेले 1 लाख 20 हजार रूपयांची रोकड जबरदस्तीने घेवून आरोपी पसार झाले. आरोपींना गजाआड करण्यात पिंपरी पोलीसांना यश आले आहे. फौजदार मधुसुदन घुगे अधिक तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गतअसलेल्या ग प्रभागातील थेरगाव - तापकीरनगर परीसरात गेल्या अनेक दिवसांपासून मैला मिश्रीत पाणी सुरु आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता साबळे यांना कल्पना देवूनही संबंधीत अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून त्यांच्या कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी सेनेचे युवराज दाखले यांनी केली आहे. याबाबत, पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त यांना निवदेन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगरसेवकांच्या सांगण्यावरून सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडीत करायचा आणि दुसरीकडेसर्व सामान्य नागरीकांना मैलामिश्रीत पाणी पाजायचे. हा गंभीर प्रकार सध्या या भागात सुरु आहे. याबाबत येत्या पाच दिवसात या प्रकरणाची गांभिर्याने दखल घ्यावी, असेही दाखले यांनी निवेदनात नमूद केले आहे.
व्हीएस न्यूज - नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना लोकल पकडण्याच्या नादात महिला प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मध्ये पाय घसरून पडली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या दोन लोहमार्ग पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला ओढून बाहेर काढले आणि तिचे प्राण वाचविले. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजता चिंचवड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर ३ वर घडली. नीता संजय गंगावणे (वय ३१ रा. पनवेल) असे या महिलेचे नाव आहे. नीता गंगावणे या पती संजय आणि मुलगा सिद्धार्थ सोबत चिंचवडला आल्या होत्या. हे तिघे दुपारी पुणे लोणावळा लोकलने देहूरोज येथे जाण्यासाठी चिंचवड रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. दुपारी साडेबाराची लोकल चिंचवड रेल्वे स्थानकावर आली. स्थानकावर गर्दी असल्याने त्यांनी लोकल पडण्याचा प्रयत्न केला. परंतु गर्दी असल्याने त्यांना गाडी पकडता आली नाही आणि त्यांचा पाय घसरला. नीता यांचा पाय प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मध्ये असलेल्या फटीत गेला. त्या रेल्वे खाली येणार तेवढ्यात स्थानकावर उपस्थित असलेल्या पुरुषोत्तम कर्दळे आणि अनिल बागुल या दोन लोहमार्ग पोलिसांनी नीता यांना बाहेर ओढून काढले. थोडाजरी उशीर झाला असता तर नीता या रेल्वे खाली आल्या असत्या. दैव बलवत्तर म्हणून नीता गंगावणे यांचे प्राण वाचले. स्थानकावर असलेल्या अनेकांनी हा थरार आपल्या डोळ्यांनी पहिला. लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नीता यांचे प्राण वाचले. प्रवाशांनी आणि नीता गंगावणे यांनी कर्दळे आणि बागुल यांचे आभार मानले.
व्हीएस न्यूज - उत्तर प्रदेशामधील उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवार सामुहिक बलात्कार प्रकरणी अटक केलेले भाजप आमदार कुलदीप सेंगर यांना तसेच कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खुन प्रकरणांतील आरोपींना फाशी द्यावी. या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात, कॅन्डल मार्च काढुन निषेध करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड ग्रामीण भागातून निर्माण झालेली नगरी असून या नगरीने लोककलेला नेहमीच दाद दिली आहे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा व लोकरंग सांस्कृतिक कलामंच यांच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या तिस-या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर नितीन काळजे, मुख्य निमंत्रक आमदार लक्ष्मण जगताप, स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसद्स्या अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, राही भिडे, प्रकाश खांडके, प्रविण गोळे, कार्यकारी अभियंता प्रविण तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले , साधी माणसं हे या शहराचा वैशिष्ठ आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या वाढलेल्या उत्पनाचा उपयोग सामान्यांसाठी करत आहे हे पाहून आनंद होत आहे. बालगंधर्व व शाहीर पठ्ठे बापूराव हे महाराष्ट्राला पडलेलं सुंदर स्वप्न होतं. असेही ते म्हणाले. संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, पिंपरी चिंचवड लाखो वारक-यांच्या दिंड्यांनी पावन झालेली भूमि आहे. लोककलाकार शरीराने जरी मनोरंजन करत असले तरी मनाने ते प्रबोधन करत असतात. लोककलांच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. लोककलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभे केले पाहिजे. हे संमेलन पठ्ठे बापूरावांच्या नावाने भरवल्याचा आनंद होत आहे. पठ्ठे बापुरावांनी तमाशाला वेगळी ओळख मिळवून दिली. असेही ते म्हणाले. महापौर नितीन काळजे भाषणात म्हणाले, मनपाच्या वतीने लोककला जिवंत ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. चांगले कलाकार या शहरात घडावे याकरिता मनपाच्या वतीने नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते, विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले, लोककलेतील सर्व घटकांचा अभ्यास असलेले व्यक्तिमत्व उदघाटक व अध्यक्ष म्हणून आजच्या संमेलनाला लाभले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात देशाच्या सर्व भागातून आलेले नागरिक आपापली संस्कृती, परंपरा व लोककला घेऊन येथे आले. त्यामुळे शहरात देशातील विविध सण, समारंभ व लोककला अनुभवायला मिळतात, असेही ते म्हणाले. यावेळी जेष्ठ अभिनेत्री लीलाताई गांधी यांना जीवनगौरव व प्रभाकर मांडे यांना लोककला साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वसंत अवसरीकर, संजीवनी मुळे, पुरषोत्तम महाराज पाटील, बापूराव भोसले, मुरलीधर सुपेकर, सोपानजी खुडे, प्रतिक लोखंडे आदींना देखील सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी शहरातून निघालेल्या महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे दर्शन घडवणा-या दिंडीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले तर आभार प्रशांत खांडके यांनी मानले.
व्हिएस न्युज - शिवसेना प्रणित शिवशाही व्यापारीसेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुणाॕकृती पुतळ्यास सह संभाजी महाराज लिखीत बुध्दभुषन ग्रंथास शिवशाही व्यापारीसेना प्रदेश आध्यक्ष-युवराज दाखले व प्रदेश सचिव - गणेश आहेर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार आपॕन करून आभिवादन करण्यात आले. यावेळी शिवशाही व्यापारीसेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गोरख पाटील,खजिनदार नवनाथ जाधव ,रविकिरण घटकार,रोहीत विभुत्ते,मारूती म्हस्के,नरसिंग माने,दत्ता गिरी,राज गिरी,गणेश पाडुळे ,निलेश भोरे ,आशिष वाळके, आमोल तेलंगे भाग्यश्रीताई म्हस्के,सारीकाताई तामचिकर,शिल्पाताई मरडेकर, आदी शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच राहटणी काळेवाडी परिसरात महाराष्ट्र दलित युवक महासंघ व लहुजीश्री बाॕईज् च्या वतीने तापकिरनगर येथे वाकड पोलिसस्टेशनचे पोलिस शिपाई नाना झेंडे व महाराष्ट्र दलित युवक महासंघ संस्थापक प्रमुख मारूती दाखले यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस व छञपत्ती शिवाजी महाराज यांच्या अधॕकृती पुतळ्यास पुष्पहार आपॕन करण्यात आला. यावेळी आमोल तेलंगे,प्रदिप दळवी,भिम वाळके ,सचिन घोलप ,आतुल गाडवे,सचिन येडके ,निलेश भेलके,आदी प्रमुख कायॕकतेॕ उपस्थित होते.
व्हिएस न्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाला मारहाण करण्यात आली. हा प्रकार पिंपरीतील वाल्मिकी चौकात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. मिथुन गौतम सूर्यवंशी (वय-25, रा. भीमनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भाऊसाहेब वामन कडाळे (वय 45, रा. बौध्दनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब आणि मिथुन यांची काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. त्याचा राग मिथुनच्या मनात होता. भाऊसाहेब मंगळवारी रात्री पिंपरी मधील वाल्मिकी चौकातील सिद्धार्थ ऑटो गॅरेजसमोर काही कामानिमित्त आले होते. त्यावेळी मिथुन याने त्यांना अडवून त्यांना दम दिला. मागील भांडणावेळी तू मला शिव्या का दिल्या होत्या, असे म्हणून गॅरेज दुकानातील टॉमीने भाऊसाहेब यांच्या पायावर आणि डोक्यात मारले. भाऊसाहेब गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फौजदार अशोक निमगिरी तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - जनावरांच्या गोठ्यात काम करणाऱ्या तरूणाला बैलाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास काळेवाडी येथे घडला. शशिकांत चिरोजीलाल धोबी (वय-22,रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे बैलाच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत काळेवाडी मधील स्मशानभूमीजवळ असलेल्या ग्यानसिंग यादव यांच्या गोठ्यात कामाला आहे. शुक्रवारी तो स्वच्छतेचे काम करत असताना बैलाने त्याला धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. शशिकांतला तात्काळ उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002