व्हीएस न्यूज - दुधवाल्याला मारहाण करत त्याच्याकडील 1 लाख 20 हजार रूपयांची रोकड दोघांनी लुटली. ही घटना रविवारी पहाटे संत तुकाराम नगर येथे घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. सागर बसु चौधरी (वय-24, रा. नेहरूनगर), विनम्र अहिवळे (वय-37, रा. उदयमनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संतोष चांदेरे (वय-43, रा. खराळवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदेरे हे रविवारी पहाटे संत तुकाराम नगर येथे दुधाच्या टेम्पोसह थांबले होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या आरोपी चौधरी व अहिवळे यांनी चांदेरे यांच्या टेम्पोच्या उजव्या बाजूला मोटार लावली. आरोपींनी चांदेरे या विनाकारण हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. चौधरीने चांदेरे यांना डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. अहिवळे याने त्यांच्याजवळील दुध विक्रीतून जमा झालेले 1 लाख 20 हजार रूपयांची रोकड जबरदस्तीने घेवून आरोपी पसार झाले. आरोपींना गजाआड करण्यात पिंपरी पोलीसांना यश आले आहे.फौजदार मधुसुदन घुगे अधिक तपास करत आहेत.