व्हीएसन्यूज - उत्तर प्रदेशामधील उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवार सामुहिक बलात्कार प्रकरणी अटक केलेले भाजप आमदार कुलदीप सेंगर यांना तसेच कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खुन प्रकरणांतील आरोपींना फाशी द्यावी. या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात, कॅन्डल मार्च काढुन निषेध करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.