व्हीएस न्यूज - बडोदा येथे संपन्न झालेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ समीक्षक, 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत संवेदना प्रकाशननिर्मित आणि ज्येष्ठ साहित्यिक विलास राजे लिखित आठ पुस्तकांचा प्रकाशन सोहळ्याचे उद्या (बुधवार) आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. लिज्जत पापड उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रकाशन समारंभात 'कथाकलश' (कथासंग्रह), 'झिपरी' (कादंबरी), 'चैतन्याचा जिव्हाळा' (लेखसंग्रह), 'भावस्पर्श' (कवितासंग्रह), 'शब्दरूप' (चारोळीसंग्रह), 'प्रजापती कुंभार' (संकीर्ण), 'असे घडले पुणे' (संकीर्ण), 'माणसं मराठी मुलखातली' (संकीर्ण) अशा वैविध्यपूर्ण पुस्तकांचा समावेश आहे. रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन विलास राजे, संजय राजे आणि नीता हिरवे यांनी केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002