व्हिएस न्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाला मारहाण करण्यात आली. हा प्रकार पिंपरीतील वाल्मिकी चौकात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
मिथुन गौतम सूर्यवंशी (वय-25, रा. भीमनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भाऊसाहेब वामन कडाळे (वय 45, रा. बौध्दनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब आणि मिथुन यांची काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. त्याचा राग मिथुनच्या मनात होता. भाऊसाहेब मंगळवारी रात्री पिंपरी मधील वाल्मिकी चौकातील सिद्धार्थ ऑटो गॅरेजसमोर काही कामानिमित्त आले होते. त्यावेळी मिथुन याने त्यांना अडवून त्यांना दम दिला. मागील भांडणावेळी तू मला शिव्या का दिल्या होत्या, असे म्हणून गॅरेज दुकानातील टॉमीने भाऊसाहेब यांच्या पायावर आणि डोक्यात मारले. भाऊसाहेब गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फौजदार अशोक निमगिरी तपास करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002