व्हीएस न्यूज - जय भवानी तरुण मंडळ आणि कालिमाता मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २२ एप्रिल २०१८ दरम्यान चिंचवड येथे फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिली. चिंचवड, मोहननगर येथील श्री दत्त मंदिर चौकात १८ ते २२ एप्रिल २०१८ दरम्यान दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत विविध मान्यवरांचे व्याखान होणार आहे. बुधवारी (दि.१८) ज्येष्ठ विचारवंत प्रा. तेज निवळीकर यांचे ”संत गाडगेबाबा व आजचा समाज” या विषयावर व्याख्यान होणार आहे. गुरुवारी (दि.१९) राजकीय अभ्यासक प्रा. प्रकाश पवार यांचे ”भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर- संसदीय लोकशाही” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर, शुक्रवारी (दि.२०) लेखिका समुपदेशक व सामाजिक अभ्यासिका डॉ. सीमा निकम यांचे ”सोशल मिडिया- एक दुधारी शस्त्र” या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवारी (दि.२१) प्रसिद्ध विचारवंत, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांचे ”स्वातंत्र्य चळवळ आणि आजचा भारत” या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी (दि.२२) माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे ”छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे राजकारण” या विषयावर व्याख्यान होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या व्याख्यानमालेचे लाभ घेण्याचे आवाहन, संयोजक मारुती भापकर यांनी केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002