व्हीएस न्यूज - भडकावू भाषण करत एकाला जीवे मारण्याची धमकीदेण्यात आली. हा प्रकार रविवारी दुपारी दोनच्या सुमारास देहूरोड, शितळानगर येथे घडला. हाजी अराफत शेख (वय 39, रा. शितळा नगर, ता. हवेली, पुणे, मूळ रा. कुर्ला, मुंबई) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मूळचे मुंबईचे आहेत. ते पुण्यामध्ये व्यापारासाठी येतात. त्यामुळे त्यांनी शितळा नगर येथे घर घेतले आहे. त्याचे कुटुंबीय देखील पुण्यातच राहतात. रविवारी दुपारी 17 जणांनी बेकायदेशीररित्या जमाव जमवला. काहींनी भडकावू भाषणे दिली. तसेच शेख यांच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.