व्हीएस न्यूज - एका 17 वर्षाच्या मुलीला पूस लावून पळवून नेल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दापोडी येथे घडला.संशयित आरोपी अकबर शेख (वय 18, रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) याच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलगी शनिवारी सायंकाळी अचानक घरातून गायब झाली. घरच्यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती कुठेही सापडली नाही. त्यामुळे घरच्यांनी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. तिच्या घरच्यांनी संशयित आरोपी अकबर याने त्यांच्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.