व्हिएसन्युज - लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना निगडी येथे मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 21 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच भागात रहाण्यास आहेत. दोघेही एकमेकांना ओळखतात. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. पीडित मुलगी पाच आठवड्यांची राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.