Breaking News

कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी | संघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल | पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरी | राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल! | 'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश | आषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास | औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी | मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन |
V. S. News
…अन्यथा आयुक्तांनाच दूषित पाणी पाजणार

विरोधी पक्षनेते दत्ता सानेंचा इशारा

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात गेल्या दहा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि आरोग्य विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. सर्व विभाग आपली जबाबदारी झटकत आहेत. पालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. पालिकेने त्वरित स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. अन्यथा महापालिका आयुक्तांना दूषित पाणी पाजण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच स्वखर्चाने हे पाणी खासगी प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी महापालिका मुख्यालयातील विरोधी पक्षनेत्याच्या दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना साने पुढे म्हणाले, चिखली परिसरात दाट लोकवस्ती आहे. या परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. चिखलीतील यशवंत कॉलनी, मनिषा कॉलनी या परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात दोन ते तीन हजार लोकवस्ती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून होणा-या दूषित पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात दूषित पाणीपुरवठ्याचे नमुने आणून दिले आहेत.

दूषित पाणी प्यायल्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. पोटाचे विकार होत आहेत. पाणीपुरवठा विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. पालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. चिखली परिसरात त्वरित स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही साने यांनी केली.

पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात देखील दूषित पाणीपुरवठा होत आहे. मुख्यालयातील पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई केली जात नाही. त्यामुळे पदाधिकारी,अधिका-यांना दूषित पाणी प्यावे लागते. पाण्याला दुर्गंधी येत आहे. पाण्याच्या टाकीचे ऑडीट करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

...Read More

V. S. News
सांगवीत उभारली भव्य शिवराज्याभिषेक गुढी

व्हीएस न्यूज - ओम साई ट्रस्ट व नगरसेवक नवनाथ जगताप मित्रपरिवारातर्फे व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील पहिली भव्य शिवराज्याभिषेकाची गुढी नवी सांगवी येथील साई चौकात उभारण्यात आली.

ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे नवनाथ जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या सहकार्याने आयोजित केलेले हे शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी या ठिकाणी शिवयोद्धा मर्दानी आखाडा,सांगवी यांच्या वतीने लाठीकाठीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व शिवभक्तांच्या हस्ते मशालीचे प्रज्वलन करण्यात आले. शिवकीर्तनकार डॉ.गजानन वाव्हळ यांचे शिवकीर्तन झाले. यावेळी शिवकीर्तनातून भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचा नयनरम्य असा जीवंत देखावा सादर करण्यात आला. तसेच रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शिवकीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान, जुनला साई चौक येथे भारतीय सशस्त्र सेनेतील जवानांसाठी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी मिलिटरी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर व ब्लड बॅंकेतर्फे रक्त संकलित केले जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
निगडीत दिवसाढवळ्या अडीच लाखांची घरफोडी

व्हीएस न्यूज - कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी शयनगृहातील कपाटामधील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही प्राधिकरणातील सेक्टर.4 मध्ये मानस व्हिला इमारतीमध्ये मंगळवारी घडली. विजयकुमार अनंतपुर (वय-54, रा. प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतपुर यांचा फ्लॅट मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कुलूप लावून बंद होता. या कालावधीत चोरट्यांनी दिवसाढवळ्या फ्लॅटचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाटामधील 2 लाख 49 हजार 600 रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
दिवंगत महापौर भिकू वाघेरे यांना अभिवादन

व्हीएस न्यूज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने दिवंगत महापौर भिकू वाघेरे (पाटील) यांच्या पुण्यतिथी निमित्त महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

आज सकाळी पिंपरीगांव येथे झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसदस्य योगेश बहल, विठठल ऊर्फ नाना काटे, भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या सुमन पवळे, उषा वाघेरे, निकीता कदम, माई काटे, उषा काळे, स्विकृत सदस्य नरहरी तापकीर, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसदस्य रंगनाथ कुदळे, निलेश पांढारकर, माजी शिक्षणमंडळ सभापती फजल शेख, विजय लोखंडे, हनुमंत नेवाळे, माजी नगरसदस्या शकुंतला भाट, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, माहिती व जनसंपर्कचे प्र.प्रशासन अधिकारी रमेश भोसले, ह.भ.प माऊली महाराज वाळुंजकर, चंद्रकांत गव्हाणे, कामगारनेते शिवाजीराव तापकीर, शिवाजीराव वाघेरे, सदाशिव नाणेकर, प्रा.संपतराव जगताप, उदयोजक महेश जाचक, प्रकाश सोमवंशी, शंकरराव वाघेरे, गुलाबराव सोनवणे, गुलाबराव वाघेरे,बबनराव खराडे, बाळासाहेब वाघेरे, वाल्मिक कुटे, तसेच मोठया संख्येने मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचलन अभिजीत वाघेरे यांनी केले.

...Read More

V. S. News
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार - वैशाली काळभोर

व्हीएस न्यूज - भाजपाने निवडणूकीपुर्वी भाववाढ स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले होते. सर्व नागरिकांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करु. शेती मालाला भाव मिळवून देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करु. देशातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी दरवर्षी चार कोटी युवकांना रोजगार देऊ. गरीब व अल्पउत्पन्न गटातील कुटूंबांना मोफत घरे देऊ. महिला सक्षमीकरणासाठी नविन योजना अमलात आणू. नद्यांचे संर्वधन, सुशोभिकरण करुन जलपर्यटनास चालणा देऊ. अशा शेकडो घोषणा केल्या होत्या. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होऊन चार वर्ष उलटून गेली तरी सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. तर उलट गोरगरिब नागरिकांना तासनतास बँकेच्या रांगेत उभे करुन खाते काढून घेतले आणि आता डिजिटललायजेशनच्या नावाखाली अनेक प्रकारचे टॅक्स आकारुन गरीबांच्या पैशांवर सरकारने डल्ला मारला आहे. मागील चार वर्षात महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक कमी झाली. त्यामुळे नविन रोजगार तर नाहीच उलट आहे तेच कामगार बेरोजगार झाल्याचे चित्र राज्यात व विशेषता पिंपरी चिंचवड मध्ये दिसत आहे. युपीए सरकारने दिलेल्या घरकुल योजना गुंडाळण्याचे काम भाजपा करीत आहे. नद्यांचे संर्वधन तर दुरच नदी पात्रातील अतिक्रमण देखील भाजप सरकारला काढता आले नाही. अशा निष्क्रिय भाजपा सरकारला जनता आगामी निवडणूकीत घरी बसवेल. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात जनजागृती करुन तीव्र आंदोलन छेडणार आहे. असे वैशाली काळभोर यांनी सांगितले.

राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पिंपरी चिंचवडमध्ये गॅस दरवाढी विरोधात केंद्र व राज्य सरकारचा आंदोलन करुन निषेध केला. यावेळी महिलांनी ना तेरी है, ना मेरी है। ये सरकार लुटेरी है।।अशा घोषणा दिल्या. दोन दिवसापुर्वी घरगुती गॅस, सिलेंडरच्या किंमतीत 48 रुपयांची वाढ केली. या दरवाढीमुळे महिला भगिनींना कुटूंबाचा मासिक खर्च चालविणे अवघड झाले आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव शंभरीकडे कुच करीत असताना वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे आणि शेतक-यांच्या संपामुळे भाजीपाल्यासह सर्वच पदार्थाच्या किंमती उच्चांकी पातळीवर आहेत. या गॅस वाढीचा व पेट्रोल, डिझेल वाढीचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी मंगळवारी (दि. 5 जून) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक आणि चिंचवड गावातील चापेकर चौकात चुल पेटवून पिठलं,भाकरी करुन निषेध केला.

यावेळी माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेविका संगीता ताम्हाणे, कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, मनीषा गटकळ, संघटिका कवीता खराडे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, लता ओव्हाळ, माजी नगरसेविका शकुंतला भाट, गंगा धेंडे, सुप्रिया पवार, संगीता जाधव, जयश्री पाटील, विद्या दिसले, दिपाली देशमुख, मंगला ढगे, रंजना कसबे, प्रिती मोकाशी, निलीमा कळंब, मंदा पेटकर, मिनल नवले, शिल्पा बिडकर, रुपाली गायकवाड, सविता धुमाळ, रामदास मोरे, नरेंद्र जाधव, दत्ता ओव्हाळ, आंनदा यादव, बाळासाहेब पिल्लेवार आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
पिंपळे सौदागरमध्ये ड्रेनेज लाईन साफ सफाईचे काम सुरु

व्हीएस न्यूज - पावसाळा काही दिवसावरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे या दिवसात चेम्बर्स, ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर लाईन तुंबण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. नागरिकांना त्याचा फार त्रास होतो. त्यामुळे पिंपळे सौदागरमधील नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी सतत पाठपुरावा करत पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुर्व तयारी तसेच खबरदारी म्हणून परिसरातील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईनची साफ सफाई कामाची सुरुवात करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते.

याची अंमलबजावणी करत आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर प्रभागातील सर्व चेम्बर्स, ड्रेनेज लाईन, स्टोर्म वॉटर साफसफाई करण्याबाबत अभियान सुरु केले आहे. या अभियानामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर गटारी, नाले तुंबणार नाहीत. स्टॉर्म वाटर लाईन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल जेणेकरून पावसाचे पाणी कुठेही साचणार व तुंबणार नाही. त्यामुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.

यासंदर्भात आवश्यक त्या सूचनाही नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी आरोग्य विभागाला दिले. तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही सांगितले.

...Read More

V. S. News
एमआयएमची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी बरखास्त

व्हीएस न्यूज - गेल्या दोन वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या एमआयएम पक्षाला सुरूंग लागला आहे. वरिष्ठ नेत्यांचे होत असलेले दुर्लक्ष, कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा यामुळेच नाराज होत शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलीय. शहराध्यक्ष अकील मुजावर यांच्यासह सर्वच पदाधिकार्यांनी थेट पक्षाचेच राजीनामे दिले आहेत.

शहराध्यक्ष अकिल मुजावर, महासचिव शफीमुल्ला काझी, प्रवक्ते धम्मराज साळवे यांनी याबाबत एमआयएमचे आमदार इम्तियाझ जलील यांना सर्व पदाधिकार्यांनी राजीनामे सादर केले आहेत. या राजीनाम्यात म्हटले आहे की, ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे कार्य २०१६ पासून प्रामाणिकपणे अविरत कार्य करत होतो. फेब्रुवारी २०१७ च्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे १४ उमेदवार स्वबळावर दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी कार्यक्षमपणे लढतही दिली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेते खासदार असददुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा राज्य कोर कमिटीने नियोजित केली होती. या सभेसाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च करून नियोजन केले होते. मात्र ऐंनवेळी ही सभा रद्द करण्यात आल्याने स्थानिक नागरिक तसेच पक्षातील कार्यकर्त्यांचा रोष आमच्यावर ओढला गेला. ही सभा रद्द झाल्यामुळे निवडणुकीवरही त्याचा परिणाम झाला. मोठ्या पराभवाला सामोरे जाऊन देखील खचून न जाता आम्हा पक्षाच कार्य सुरुच ठेवले. काही दिवसांपूर्वी देहूरोड येथे शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांच्या वडिलांच्या वादग्रस्त दर्ग्याच्या व देहूरोड मुस्लिम जमात दफनभूमी येथे पक्षाचे आमदार वारीस पठाण यांच्या हस्तक्षेपामुळे १७ निष्पाप युवकांवर गुन्हे दाखल झाले. यामुळे शहरातील उलेमा आणि मुस्लिम समाजसेवक व मुस्लिम संघटना नाराज झाले आहेत. आगामी काळात एमआयएम पक्षाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही अशी भूमिका सर्वांनीच जाहीर केली आहे.

महाराष्ट्र राज्य कार्यकारणी शहरात पक्षबळकट करण्यासाठी कार्य करत नाही.जनतेला पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्ही पक्षात का कार्य करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करून आम्ही सर्व पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे.

...Read More

V. S. News
वृत्तवाहिनीचा पत्रकारच निघाला सोनसाखळी चोर

व्हीएस न्यूज - एका सोनसाखळी चोराला त्याच्या साथीदारांसह वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ४५ हजार रुपये किमतीचे आठ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. झटपट पैसे कमविण्यासाठी चोरीसारखे गुन्हे करत असल्याची कबुली दोन्ही चोरांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी हा एका वृत्तवाहिनीचा पत्रकार असल्याची माहीती तपासात समोर आली आहे.

नसीम सादिक उस्मानी (वय ३२, रा. जगतापनगर, लेन नंबर पाच, थेरगाव) आणि मोहम्मद शराफत हुसेन अली (वय २४, मूळ रा.ग्राम-पोस्ट अफजलगढ, ता. धामपूर, जि. बिजानेर,उत्तर प्रदेश, सध्या रा. थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखळीचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वाकड पोलिसांनी तपास पथक तयार केले. या पथकाने २९ मे रोजी साखळी चोरीच्या घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानुसार नसीम आणि मोहम्मद हे दोघे अॅक्टिव्हा मोपेड (एम एच १४ / जी आर ५४६८) वरून वाकड,थेरगाव आणि काळेवाडी परिसरात पायी चालत जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार आरोपींवर कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ८२ ग्रॅम वजनाचे २ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील तीन आणि सांगवी पोलीस ठाण्यातील दोन सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेला आरोपी नसीम हा अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, एका संघटनेचा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष आणि एका वृत्त वाहिनीचा पत्रकार म्हणून काम करत होता. त्याने आपला साथीदार मोहम्मद अली याला वेळोवेळी दिल्लीवरून बोलावून पिंपरी चिंचवड शहरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहेत. मोहम्मद अली याच्यावर दिल्लीमधील पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, तपास पथकातील विक्रम कुदळ, विजय गंभीरे, अशोक दुधवणे, प्रमोद कदम, विक्रांत गायकवाड, शाम बाबा, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, बिभीषण कन्हेरकर, अनिल महाजन, सनी जोंधळे, महंमद नदाफ, धनराज किरनाळे, दादा पवार यांच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
कोरेगाव –भीमा दंगलीमधील पीडितांची गिरीश बापटांच्या राजीनाम्याची मागणी

व्हीएस न्यूज - कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी झालेल्या दंगलीमधील पीडित आणि तिथे राहणारी पूजा सकट हिच्या हत्या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी,या मागणीसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं. तसंच यावेळी गिरीश बापट यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.

भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर ५ महिने होऊन गेले पण अद्यापपर्यंत दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई या सरकारने केलेली नाही, ही निषेधार्थ बाब आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे पीडितांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत, त्यामुळे त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांच्या नेतृतत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी, ‘माझ्या मुलीची हत्या होऊन दोन महिन्याचा कालावधी होऊन गेला. मात्र त्यातील आरोपीही अद्याप मोकाट आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी’, अशी मागणी पूजा सकटच्या वडिलांनी केली.

दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आज पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर धवळे यांना त्यांच्या गोवंडी येथील घरातून ताब्यात घेतले. तर वकील सुरेंद्र गडलिंग यांना नागपुरातून आणि माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
पुण्यातील NDA वर CBI चा छापा

व्हीएस न्यूज - पुणे येथील राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीवर बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी (सीबीआय) छापा मारला. एनडीएमध्ये शिक्षकांची निवड आणि नियुक्तीमध्ये घोटाळा झाल्यामुळे ही छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने एनडीएच्या मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक, केमिस्ट्री, गणित विषयाचे सहाय्यक प्राध्यापक यांच्यावर शिक्षक निवडीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. एनडीएमधील कार्यालये आणि आरोपींच्या निवासस्थानी शोध मोहिम सुरु आहे. एनडीएमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये सेवा बजावतात.

एनडीए देशातील एक प्रतिष्ठीत सैन्य प्रशिक्षण देणारी संस्था असून अनेकदा विदेशातूनही उमेदवार इथे प्रशिक्षणासाठी येतात. एनडीमध्ये निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप परिश्रम करावे लागतात तसेच इथल्या खडतर प्रशिक्षणानंतर उत्तम दर्जाचे लष्करी अधिकारी तयार होतात. एनडीएमधून भारतीय सैन्य दलांमध्ये गेलेल्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक युद्धात महत्वाची भूमिका बजावली आहे.

...Read More

V. S. News
नऊ सराईत गुन्हेगारांकडून 14 लाखांचा ऐवज जप्त 

व्हीएस न्युज :- नऊ सराईत गुन्हेगारांकडून 11 तोळे 3 ग्रॅम सोने-चांदीचे दागिने 23 मोबाईल फोन, 3 देशी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, 2 सेन्ट्रो मोटार, 1 स्विफ्ट मोटार, 1 करिझमा दुचाकी आणि रोकड असा तब्बल 14 लाख 7 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विविध पोलीस ठाण्यातील 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. सुरजितसिंग राजपालसिंग टाक (रा. बिराजदारनगर, हडपसर), हर्षल गुलाब पवार (रा. कुळे, ता.मुळशी), महेश शिवदास दिक्से (वय-28, रा. लोणी, ता. रिसोड, वाशीम), सॅम्युयल ऊर्फ विशाल डेडली ऑरनॉड (वय-30, रा. संभाजीराव हौसिंग सोसायटी, मिलींदनगर, पिंपरी), अतुल अविनाश पवार (वय-25, रा. मिलींदनगर, पिंपरी), सागर कुमार इंद्रा (वय-25, रा. कैलासनगर, बालाजी कॉलनी, थेरगाव), राहूल श्रीहरी काळे (वय-37, रा. बुधवार पेठ, पुणे), अक्षय आबासाहेब कोळेकर (वय-19, रा. साने कॉलनी, साने चौक, मोरेवस्ती, चिखली), शुभम नितीन काळभोर (वय-19, रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टाक हा आपल्या साथीदारांसह मोहननगर येथे घरफोडी करताना पोलीसांनी त्याला ताब्यात होते. त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले असून दोन मोटारींसह सुमारे साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला. तर आरोपी हर्षल पवार याच्याकडून तीन गुन्हे व 9 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. महेश दिक्से याच्याकडून 89 हजारांचा एक ऍपलचा मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपी ऑरनॉल्ड, अतुल पवार, इंद्रा यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतुस, एक लोखंडी कोयता, एक सुरा, एक चारचाकी स्वीफ्ट मोटार असा 3 लाख 50 हजार 700 रूपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी राहूल काळे याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे असा 51 हजारांचा ऐवज जप्त केला. अक्षय कोळेकर व एका अल्पवयीन मुलाकडून 2 लाख 10 हजार रूपये किंमतीचे 20 मोबाईल, एक करिझमा दुचाकी जप्त केली. तर शुभम काळभोर याच्याकडून 16 हजारांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. असा 14 लाख 7 हजार 725 रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बाळासाहेब अंतरकर, विठ्ठल बढे, महिला फौजदार रत्नमाला सावंत, हरिदास बोचरे, दत्तात्रय नणनवरे आदींच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
शिवशाही व्यापारी संघटनेची महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर 

व्हीएस न्युज - शिवशाही व्यापारी संघटनेच्या महाराष्ट्र कार्यकारिणी आज प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

पिंपरी येथील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात आयोजित कऱण्यात आलेल्या शिवशाही व्यापारी संघाच्यावतीने पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले,प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील , चिंचवड विधानसभा अध्यक्ष निलेश भोरे, खजिनदार माऊली जाधव, रोहिदास तांबे, शिवसेना उपविभागप्रमुख प्रमुख प्रदीप दळवी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,मनोहर कानाडे(संत तुकाराम नगर विभागअध्यक्ष. शिवशाही संघटनेचे पि चि उपाध्यक्ष गणेश पाडुळे ,दत्ता गिरी (थेरगाव विभाग अध्यक्ष) महिला आघाडीच्या सारिका तामचीकर(,महीला सल्लागार )रत्नप्रभाताई नवगिरे,शिल्पाताई मरडेकर (चिंचवड विधानसभा महीला अध्यक्ष ) नरसिंग माने,आकाश घटकार,रविकिरण घटकार , आदी उपस्थित होते.

शिवशाही व्यापारी संघाच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे - महादेव काळे (लातुर जिल्हाध्यक्ष), विजय पिंगळ (नाशिक जिल्हाध्यक्ष), दिपक बिजेकर (दिंडोरी तालुकाध्यक्ष), पुणे शहराध्यक्ष (गोगा सुपेकर), सुनीता खंडाळकर.(पुणे महिला शहराध्यक्ष), विशाल बाविस्कर (पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष), गणेश पाडोळे (पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष), बाळासाहेब गायकवाड (पिंपरी विधानसभा अध्यक्ष), सतीश भवाळ (पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष), राज गिरी (चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष), भीमराव कुलकर्णी (खराळवाडी विभाग अध्यक्ष), कर्जत तालुकाध्यक्ष (सुहास ठाकरे), रंजत यादव ( मुंबई उपाध्यक्ष ), प्रफुल्ल भोसले (उल्हासनगर विभागाध्यक्ष), बलराम जाधवानी (उल्हासनगर विभागाध्यक्ष), प्रकाश जैन (ठाणे जिल्हाध्यक्ष), बबलू वाणी (संभाजीनगर पूर्व शहराध्यक्ष), नितीन देशमुख (संभाजीनगर पूर्व उपाध्यक्ष), सागर बनसोडे (संभाजीनगर मध्य शहराध्यक्ष), साजिद कुरेशी, मुश्ताक कुरेशी (संभाजीनगर मध्य उपाध्यक्ष). सय्यद सलाबउद्दीन ( संभाजीनगर मध्ये शहर सचिव)

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!