Breaking News

कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी | संघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल | पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरी | राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल! | 'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश | आषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास | औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी | मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन |
V. S. News
पिंपरी-चिंचवडमध्ये सव्वातीनशे अनधिकृत जाहिरात फलक

व्हीएस न्युज - पुण्यात जाहिरात फलकाचा सांगाडा कोसळून चार नागरिकांचा हकनाक बळी गेल्यानंतर पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत जाहिरात फलकांवरील कारवाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका हद्दीत अठराशे अधिकृत फलक आहेत, तर सव्वातीनशे अनधिकृत जाहिरात फलक आहेत. जाहिरात फलकांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असताना महापालिका अनधिकृत फलकांवरील कारवाईसाठी गंभीर नसल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. महापालिकेकडून अनधिकृत फलकांची संख्या सव्वातीनशे असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त संख्येने अनधिकृत फलक शहरात आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत, धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांची संख्या मोठी आहे. राजकीय लागेबांधे आणि प्रशासकीय हतबलता यामुळे अशा जाहिरात फलकांवर महापालिकेकडून कारवाई केली जात नाही. एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी उभे करण्यात येणारे जाहिरात फलक किंवा फ्लेक्स आणि विनापरवाना जाहिरात फलक उभे करुन त्यापासून उत्पन्न मिळवणारे फलक असे फलकांचे दोन प्रकार शहरात आहेत. महापालिकेकडे फलकांवरील कारवाईची माहिती ही सरसकट स्वरुपाची आहे. महापालिकेकडून फ्लेक्स आणि जाहिरात फलक यांच्यावरील कारवाईची संयुक्त माहिती आहे. महापालिकेने गेल्या सहा महिन्यात केवळ सव्वाशे अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसात जाहिरात फलक कोसळून दोन नागरिकांचा बळी शहरामध्ये गेला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सव्वातीनशे अनधिकृत जाहिरात फलक आहेत. त्यासंबंधीचे सर्वेक्षण सुरु आहे. गेल्या सहा महिन्यात सव्वाशे फलकांवर कारवाई केली आहे, तसेच बावीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढे सर्व अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करुन ते काढून घेण्यात येणार आहेत. – विजय खोराटे, सहायक आयुक्त, महापालिका

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जाहिरात फलकांची पाहणी करावी. कमकुवत असलेल्या जाहिरात फलकांचे सांगाडे सुरक्षित करण्याचे आदेश संबंधित जाहिरात संस्थेला द्यावेत. तसेच अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या संस्थेवर कारवाई करावी. – दत्ता साने, विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड महापालिका

...Read More

V. S. News
शिवसेना गटनेते राहुल कलाटेंचे महापालिकेत ‘ठिय्या आंदोलन’

व्हिएस न्युज - चिंचवड विधानसभा मतदार संघातील गृहप्रकल्पांच्या पाण्यासाठी अचानकपणे सुरु केलेल्या ‘एनओसी’बाबत माहिती मिळेपर्यंत मुख्यालयातील सहशहर अभियंता कार्यालयात शिवसेना गटनेते राहुल कलाटे व मारुती भापकर यांनी शनिवारी (दि.६) सायंकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले. कार्यालयीन कामकाजानंतर सुरु झालेले हे आंदोलन माहिती मिळाल्याशिवाय मागे न घेण्यावर कलाटे व भापकर ठाम होते. सहशहर अभियंता कार्यालय रात्री नऊ वाजेपर्यंत हा ठिय्या होता.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिंचवड विधानसभा मतदार संघात पाण्याची टंचाई जाणवत असल्याचे कारण पुढे करत, तीन महिन्यांपूर्वी याठिकाणच्या लहान बांधकामांना वगळून इतर सर्व बांधकामांना पाणी पुरवठ्यासाठी ‘एनओसी’ देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली होती. यावर मोठी टीका झाली होती. आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यात चांगेलच ‘शाब्दिक युद्ध’ रंगले होते. यामध्ये आरोपाच्या फैरी झडल्या होत्या. आमदार जगताप यांना पत्रकार परिषद घेत, याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतरही ही बंदी कायम होती.

दरम्यान, गुरुवारपासून (दि.४) पाणी पुरवठा विभागाच्या वतीने बांधकामांना पुन्हा ‘एनओसी’ देण्यास सुरुवात झाली. याची माहिती समजताच राहुल कलाटे यांनी प्रभारी सहशहर अभियंता रामदास तांबे यांच्या कार्यालयात जाऊन, याबाबतची लेखी माहिती देण्याची मागणी केली. तत्पूर्वी देखील हा निर्णय कोणत्या आधारे घेतला होता, याबाबत कलाटे यांनी तीन-चार वेळा मागणी करुनही पाणी पुरवठा विभागाकडून माहिती देण्यात आली नाही.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, रामदास तांबे यांनी ही माहिती गोपनीय असून, ती आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिली असल्याचे सांगितले. ती माहिती आयुक्तांकडून घ्या, असे कलाटे यांना सांगितले. त्यामुळे संतापलेल्या कलाटे यांनी तांबे यांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरु केले. आयुक्त हर्डीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांचा मोबाईल ‘स्वीच ऑफ’ लागत होता. त्यामुळे आयुक्त मुख्यालयात येईपर्यंत कार्यालयातून उठणार नसल्याची भुमिका घेतली. त्यामुळे तांबे यांची मोठी गोची झाली. रात्री नऊ वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरुच होते

...Read More

V. S. News
निगडीत तरूणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून

व्हीएस न्युज - निगडी मिलींदनगर येथे राहते घरात एका तरुणाच्या डोक्यात सीमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला आहे. तुकाराम गुरपा शिंदे (२२, रा. मिलिंदनगर, निगडी) या तरुणाचा खून झाला आहे. तर भाऊ सुरेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार निगडी पोलिसांना सकाळी आठच्या सुमारास समजला असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुकाराम आणि त्याचा भाऊ सुरेश हे दोघे मिलिंदनगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. शनिवारी रात्री कामावरून घरी आल्यानंतर नेहमी प्रमाणे दोघे झोपले होते. दरम्यान पहाटेच्या वेळी अज्ञात व्यक्तीने दोघा भावांवर हल्ला केला. डोक्यात सीमेंटचे गट्टू टाकले आहेत. हा प्रकार सकाळी समजताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांना रुग्णालयात दाखल केले असता तुकाराम याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले. तर भाऊ जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ला, खून कोणी आणि का केला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा पथक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
पिंपरीत भाजप सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे ‘मौन’ आंदोलन

व्हीएस न्युज - शेती माल हमी भाव, शेतकरी कर्ज माफी, शेतकरी आत्महत्या, कामगार धोरण, महिला व युवतींवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती गुन्हेगारी, आदी विषयात सरकार अपयशी ठरले अाहे. ‘असत्य, हिंसा, अशांती’च्या मार्गाने सत्ताधारी भाजपचा कारभार सुरू आहे. त्याच्या निषेधार्ध आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारचा पिंपरीत राष्ट्रवादीच्यावतीने निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘मौन’धारण करून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले.

पिंपरीतील खराळवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सकाळी ९ वाजता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन सुरू करण्यात आले असून दुपारी १२ वाजेपर्यंत हे आंदोलन होणार आहे. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयुर कलाटे, नगरसेविका संगीता ताम्हाणे,सुलक्षणा शिलवंत, माजी नगरसेवक अतुल शितोळे, महंमद पानसरे, निलेश पांढरकर, पंडीत गवळी, राजेंद्र साळुंखे, प्रवक्ते फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विश्रांती पाडाळे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...Read More

V. S. News
डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू

व्हीएस न्युज - पित्ताच्या खड्याच्या औषधोपचारासाठी पिंपरीतील संत तुकारामनगर येथील डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात गेलेल्या एका गर्भवती महिलेचा डॉक्टरांनी दिलेल्या गर्भपाताच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला. ही घटना डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान घडली.

अनुसया राठोड असे मयत गर्भवती महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सुर्यकांत लक्ष्मण राठोड (वय ५२, रा. १८२, केअर ऑफ अशोक किसन भेगडे, खळवाडी-घेरावाडी तळेगाव दाभाडे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुर्यकांत राठोड यांची पत्नी अनुसया राठोड यांना पित्ताच्या खड्यांचा त्रास होता. यावर औषधोपचार करण्यासाठी त्या डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात गेल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन सोनोग्राफी केली. यामध्ये त्या गरोदर असल्याचे समजले. पित्ताच्या खड्यांवर उपचार करण्यासाठी अनुसया यांना इंजेक्शन देऊन गर्भपात केला. मात्र त्या मागील परिणामाची माहिती डॉक्टरांनी सुर्यकांत आणि त्यांची पत्नी अनुसया यांना दिली नाही. तसेच गर्भपाता झाल्यानंतर अनुसया यांचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांनी अनुसया यांच्या केसपेपरवर मोठ्या प्रमाणात खाडाखोड केली तसेच सुर्यकांत यांच्या बऱ्याच ठिकाणी सहया घेतल्या. यामुळे सुर्यकांत यांनी अनुसया यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात डॉक्टरांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
पुण्यात मुठा कालवा फुटला, शेकडो संसार पाण्यात

व्हीएस न्युज - सारसबागेकडून दांडेकरपुलाच्या दिशेने जाताना पर्वती पुलाजवळ जनता वसाहत जवळून जाणारा मुळा कालवा आज सकाळी अचानक फुटला. कालव्यातून लाखो लिटर पाणी जवळ असलेल्या आंबिल ओढा वसाहतीमध्ये शिरून येथील रहिवाशांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. प्रचंड वेगात वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले तर अनेक दुचाक्या वाहून गेल्या.

येथील रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून मदतकार्य सुरु आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिकांनी दोरीच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले.

याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली आहे. या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आंबील ओढा वसाहतीमधील घरात पाणी शिरले असून घरातील गॅस सिलेंडर, अनेक वस्तू, भांडी पाण्याच्या प्रवाह बरोबर वाहून गेल्या आहेत. अनेक वस्तू, गॅस सिलिंडर डेक्कन जवळील नदीपात्रात वाहून आल्या. डोळ्यासमोर स्वतःच्या घरातील पैसे, साहित्य वाहून जाताना पाहून महिलांना अश्रू आवरणे अवघड झाले.

या घटनेमुळे अलका चौक, स्वारगेट टिळकरस्ता, बाजीराव रस्तावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या. पाण्याचा प्रवाह वाढत असून वरून पाणी बंद केले असले तरीही अंतर खूप असल्याने पाण्याचा प्रवाह कमी होण्यास वेळ जाणार आहे.

घटनास्थळी महापौर मुक्ता टिळक यांनी भेट दिली असून बाधित नागरिकांना नुकसान भरपाई देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्याचप्रमाणे दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. बाधित नागरिकांची जवळच्या शाळेत स्थलांतर करण्यात येणार आहे असे त्या म्हणाल्या.

...Read More

V. S. News
धक्कादायक -दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा उपचारादरम्यान मृत्यू

व्हीएस न्युज - मंदिरा जवळ खेळत असलेल्या दोन मुलींवर रविवारी चॉकलेटचं आमिष दाखवून रविवारी बलात्कार करण्यात आला. या दोघींपैकी एकीचं पोट खूप दुखू लागलं आणि ती जागेवरच बेशुद्ध झाली. उपचारासाठी तिला रुग्णालयात नेल्यावर संपूर्ण घटना डॉक्टरांच्या तपासातून उजेडात आली. याच मुलीचा काल रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंजवडी पोलिसांनी दुसऱ्या पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला आणि आरोपी गणेश निकमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तर एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतलं.

काय आहे घटना?

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी जवळ राहणाऱ्या शेतमजुरांच्या दोन मुली रविवारी शाळेला सुट्टी असल्याने घराजवळील मंदिरासमोर खेळत होत्या. त्यांच्या घराजवळ असलेल्या साखर कारखान्यातील मजुराच्या दोन मुलांनी मिळून त्या मुलींना चॉकलेटचे आमिष दाखविले आणि मंदिराच्या मागच्या बाजूला येण्यास सांगितले. चॉकलेट मिळणार म्हणून दोघीही मंदिराच्या मागे गेल्या.

त्यावेळी आरोपींनी दोघींना मंदिराच्या मागे असलेल्या दाट झाडीमध्ये नेले. तिथे त्यांच्यावर बलात्कार केला. त्यातील एका मुलीवर दोघांनी मिळून बलात्कार केला. त्यामुळे तिला फार मोठा धक्का बसला. दोघींनाही मानसिक आणि शारीरिक इजा झाली. दोघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील एका मुलीचा उपचारादरम्यान काल बुधवारी मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

घडलेला प्रसंग घरच्यांना समजला तेंव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. सुरुवातीला त्यांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी त्यांना विश्वास दिला. त्यामुळे मुलीच्या आईने फिर्याद दिली. एक पीडित मुलगी बोलू शकत असल्याने तिच्या मदतीने दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एकजण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एकजण सज्ञान आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
गणेश मृर्तींचे हौदातच विसर्जन करावे....श्रावण हर्डीकर

व्हीएस न्युज - वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्व नागरिकांनी आपले सण, उत्सव पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करावेत. मांगल्याचे प्रतिक असणारा गणेशोत्सव देखील पिंपरी - चिंचवड शहरात मोठ्या भक्ती भावाने, उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. शहराच्या जीवनवाहिन्या असणा-या पवित्र इंद्रायणी आणि पवना नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अनेक सामाजिक संस्था, संघटना व उद्योजक पुढाकार घेऊन काम करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून आसवाणी असोशिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेतर्फे पिंपरी गावातील वैभवनगर येथे सार्वजनिक मंडळांच्या गणेशमृर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत. याचा गणपती मंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी - चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

पिंपरी गावातील वैभवनगर येथे विजय आसवाणी यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच खासगी जागेत गणेशमृर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत. त्याचे उद्‌घाटन सोमवारी (दि. 17) आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आयुक्त हर्डीकर यांनी स्वहस्ते गणेश मृर्तीचे हौदात विसर्जन केले. माजी आमदार अण्णा बनसोडे, भाजपा शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, नगसेवक शीतल शिंदे, डब्बू आसवाणी, नगरसेविका सीमा सावळे, उद्योजक राजू आसवाणी, श्रीचंद आसवाणी, विजय आसवाणी, सुरेश जुम्माणी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका माधुरी मुलचंदाणी, सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे, जयहिंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकाणी, जयहिंद हायस्कूलचे विद्यार्थी स्वयंसेवक आदी यावेळी उपस्थित होते.

विजय आसवाणी यांनी या उपक्रमाविषयी सांगितले की, वैभवनगर येथे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत. यामध्ये आठ फुट, नऊ फुट, बारा फुट आणि सोळा फुट खोलीचे हौद आहेत. याठिकाणी गणेश मृर्तिंचे विसर्जन करावे यासाठी जयहिंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे घरोघरी जाऊन, सोसायट्यांमधील मंडळांच्या पदाधिका-यांना भेटून आवाहन व प्रबोधन केले. त्यामुळे पहिल्याच दिवशी पिंपरीगाव, काळेवाडी, तापकीरनगर भागातील छोट्या मोठ्या मंडळांनी, सोसायटीतील मंडळांनी आणि घरगुती एकूण 265 गणेश मृर्तिंचे विसर्जन करण्यात आले. रविवारी दि. 23 सप्टेंबरपर्यत याठिकाणी हि सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या वतीने पाणी व निर्माल्यकुंड दिले आहे. संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चार खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. जीवरक्षक विधीवत पध्दतीने या हौदांमध्ये मृर्ती विसर्जन करतील. या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष असून पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

...Read More

V. S. News
अनामत रक्कम सक्तीने मागणार्‍या हॉस्पिटल कारवाईसाठी रुग्ण हक्क परिषदेचे आंदोलन.

व्हीएस न्युज - गरीबांना उपचार नाकारणार्‍या हॉस्पिटलचा धिक्कार असो. रुग्ण हक्क अधिकाराचा विजय असो,अशा घोषणा देत रुग्ण हक्क परिषद, पुणे शहराच्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयावर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.

येरवडा येथील बारा वर्षाच्या मुलावर अनामत रक्कम भरली नाही म्हणून रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. अशा पद्धतीच्या घटना खासगी व धर्मादाय रुग्णालयांमध्ये वारंवार घडताना दिसतात. अनामत रक्कम सक्तीने मागणार्‍या धर्मादाय रुग्णालयावर कारवाई करावी व तातडीने उपचार सुरू करावेत या प्रमुख मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या अ‍ॅड. वैशाली चांदणे व राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या व तीव्र निदर्शने करण्यात आली.

धर्मादाय रुग्णालयांनी आढेवेढे न घेता तातडीने उपचार सुरू करावेत. बिलाचे पैसे भरण्याची पात्रता नसल्यास मृतदेह अडवून ठेवू नये, मृतदेह अडवणार्‍या हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. रुबी हॉल हॉस्पिटलवर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल करावा इ. मागण्या सहआयुक्त धर्मादाय मा. नवनाथ जगताप यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आल्या.

यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या अ‍ॅड. वैशाली चांदणे व राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनामध्ये शहराध्यक्ष दत्ता सुरते, कार्याध्यक्ष डॉ. आनंद कांबळे, कार्याध्यक्ष तेजश्री पवार, शहरसचिव समीर वाव्हळे, शहर उपाध्यक्ष सुधीर गडवीर, सरचिटणीस संध्या चौरे, संगीता सोनवणे, सोनाली बढे, नितीन शिंदे, साधना मिसाळ, मुकुंद गायकवाड, सुजाता गुरव, रमेश म्हस्के आदींसह सुमारे दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनातील मागण्या पूर्ण झाल्या असल्याचे राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
... अन्यथा आयुक्त कार्यालयातून "हंडाभर पाणी भरो" आंदोलन केले जाईल - युवराज दाखले

व्हीएस न्युज - 'ग' प्रभाग थेरगाव मध्ये आसलेल्या प्रभाग क्रमांक २७ श्रीनगर परिसरामध्ये गेल्या आनेक दिवसांनपासुन काही ठराविक परीसरात स्थानिक नगरसेवकांच्या सांगण्या वरून पाणीपुरवठा विस्कळीत केला जात आसल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे.

नागरिकांच्या या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेत आणि या घानेरड्या वृत्तीला आळा घालण्यासाठी युवराज दाखले यांनी शिवसेना राहटणी-काळेवाडी विभागाच्या वतीने निषेध व्यक्त करत 'ग' प्रभाग थेरगाव मध्ये आसलेल्या प्रभाग क्रमांक २७ श्रीनगर परिसरामध्यील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना आज निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की "संबंधित पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रभाग क्रमांक २७ श्रीनगर परिसरामध्यील पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक करण्याचे त्वरित आदेश देण्यात यावे. पाच दिवसांच्या कालावधीत जर पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक न केल्यास शिवसेना राहटणी-काळेवाडी विभागाच्या वतीने सदरील ठिकाणच्या महिला भगिनिंनच्या सोबत आयुक्त कार्यालयातून "हंडाभर पाणी भरो" आंदोलन केले जाईल.

...Read More

V. S. News
झिरो बॉईज चौक ते अजमेरा कॉलनी रोड शेजारील फुटपाथची दुरावस्था ; प्रशासनाचे दुर्लक्ष.

व्हीएस न्युज - झिरो बॉईज चौक ते अजमेरा कॉलनी रोड शेजारील फुटपाथ सहा महिन्यापासुन पुर्णपणे उखडलेल्या अवस्थेत आहे. सदर ठिकाणी सतत कचऱ्याचा ढीग साचलेला असतो त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे, या संर्दभात 'क' प्रभागाचे अतिरिक्त आयुक्त यांना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख श्री.गणेश जाधव,श्री.विद्यासागर गायकवाड,श्री.गोरकनाथ कवडे, श्री.कैलास कुदळे यांनी आज रोजी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की " पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश करण्यात आला आहे परंतू फुटपाथ, रस्ते, स्वच्छता या बाबत नागरिकांन मध्ये नाराजी आहे. झिरो बॉईज चौक ते अजमेरा कॉलनी रोड शेजारील फुटपाथचे काम त्वरित करण्यात यावे आणि या परिसरात पालिके तर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. निवेदनावर पालिके द्वारा केलेल्या कारवाईचा अहवाल लेखी स्वरुपात सात दिवसात सादर करण्याची मागणी हि केली आहे.

...Read More

V. S. News
गणेशोत्सवानंतर शहरातील गुन्हेगारांचा योग्य बंदोबस्त करू – पोलीस आयुक्त

व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या. वाहतूक कोंडीतून थोडी उसंत मिळाल्यानंतर शहरातील छोटे-मोठे गुन्हेगार आता त्यांच्या रडारवर आले आहेत. गणेशोत्सवानंतर शहरातील गुन्हेगारांचा योग्य बंदोबस्त करू अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. ऑटोक्लस्टर येथे सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.

पिंपरी चिंचवड आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर आयुक्तांनी पदभार स्वीकारताच काही दिवसात हिंजवडी येथील ५४ कंपन्या वाहतूक कोंडीला कंटाळून हिंजवडी सोडून जाणार असल्याची ‘फेक न्यूज व्हायरल’ झाली. याची गंभीर दखल घेत आयुक्त पद्मनाभन यांनी स्वतः हिंजवडीच्या रस्त्यावर उतरून वाहतूकीचा आढावा घेतला. आयुक्तांनी निरीक्षण करून हिंजवडीमध्ये चक्राकार वाहतूकीचा बदल सूचवला. आयुक्तांच्या आदेशानंतर तात्काळ त्यावर अंमलबजावणी करण्यात आली. वाहतूकीतील या बदलांना स्थानिकांनी विरोध केला. मात्र, या बदलांमुळे स्थानिकांना कसा फायदा होणार हे आयुक्तांनी त्यांना विश्वासात घेत समजावून सांगितले. काहीच दिवसात स्थानिकांना देखील या बदलाचे फायदे दिसू लागल्याने स्थानिकांचा विरोध मावळला. तसेच आयटीयन्सने देखील आयुक्तांच्या निर्णयाचे भरभरून कौतुक केले.

शहराच्या इतर भागाची देखील पाहणी करून आयुक्तांनी बदल सुचवले. वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणार्‍या वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल करा असे आदेश दिल्याने वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने दामटणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. वाहतूक कोंडीतून थोडा दिलासा मिळाल्यानंतर आता आयुक्तांनी गुन्ह्यांच्या फायलींची चाचपणी सुरु केली आहे.

वाहतूक कोंडी पाठोपाठ शहरातील गुन्हेगारीमुळे देखील नागरिक हैराण असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता शहरातील गुन्हेगारांची माहीती घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. गणेशोत्सवसानंतर शहरातील गुन्हेगारांवर कारवायांचा धडाका सुरु करणार असल्याचे संकेत त्यांनी या वेळी दिले. आयुक्तालयापूर्वी परिसरात दहशत माजवण्यासाठी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. तलवारीचा नंगा नाच शहरवासीयांनी पहिला आहे. या सर्व प्रकरणातील आरोपींची पार्श्वभूमी तसेच त्या गुन्ह्याची माहिती त्यांनी मागवली आहे. यापूर्वी घटनेनंतर केवळ गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, असे गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!