व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड शहरात पसार परवाना नसताना सर्रासपणे बेकायदेशीर रित्या सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या एजन्सींनवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तिरोडा-गोरेगाव चे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्तांना मंगळवारी केली.
निवेदनात दाखले म्हणतात की " सुरक्षारक्षक एजन्सी कडून पोलिस पडताळणी न करता सुरक्षारक्षक पुरवले जातात, कामगारांना पगार वेळेवर दिला जात नाही व काही घरगुती कारणामुळे सुरक्षारक्षक कामावर रुजू नसल्यास त्याला कामावरून कमी करण्यात येते आणि कामगारांनी पगार मागितल्यास त्याला मारहाण करून शास्त्राच्या धाक दाखवने व स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना हाताशी धरून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
प्रविण फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (निगडी पुणे) या सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या कंपनीकडे पसारा परवाना नसल्याचा या तक्रार अर्जात उल्लेख केला आहे.
महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना काही दुष्काळी भागातील कामगार जे पोटाची खळगी भरण्यासाठी सुरक्षारक्षकाचे काम करतात अश्यांना न्याय द्यावा आणि बेकायदेशीर सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई येत्या आठ दिवसात करावी व कारवाई केल्याचा अहवाल सादर करावा अन्यथा अन्यायग्रस्त सुरक्षारक्षक घेऊन निदर्शने करू असा इशारा दाखलेंनी दिला.
व्हीएस न्युज -पिंपरी-चिंचवड महापालिका घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा 60 रुपये शुल्क आकारणार आहे. तर, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 90 ते 120 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास दंड केला जाणार आहे. कचरा जाळल्यास 50 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार 19 डिसेंबर रोजी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने 8 एप्रिल 2016 मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 जारी केला आहे. दुकानदारांकडून दरमहा 90 रुपये, शोरूम, गोदामे, उपहारगृह आणि हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 120 रुपये, हॉटेलसाठी दरमहा 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 50 खाठापेक्षा कमी क्षमता असलेल्या रुग्णालयासाठी दरमहा 120 रुपये आणि 50 हून अधिक खाठा असलेल्या रुग्णालयासाठी 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
शैक्षणिक, धार्मिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय यांना दरमहा 90 रुपये, मंगल कार्यालयांना दरमहा 300 रुपये आणि फेरीवाल्यांकडून 180 रुपये शुल्क दरमहा घेतले जाणार आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास पहिल्यांदा 60 रुपये दंड आकारला जाणार आहे. दुसऱ्यावेळी चूक केल्यास 120 रुपये आणि तिसऱ्यांदा चूक केल्यास 180 रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
त्यांनतर प्रत्येक चुकीसाठी 180 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण केल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा चूक केल्यास दहा हजार आणि तिसऱ्यावेळी चूक केल्यास 15 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी 15 हजार रुपये दंड असणार आहे. तसेच कचरा जाळल्यास 50 रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
व्हीएस न्युज - बेकायदेशीर पिस्तुल विक्री करणाऱ्या आणि बाळणाऱ्या तिघांना खंडणी, दरोडा विरोधी पथकाने अटक करून दोन देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ६० हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्यात तिघांन विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये ( दि.२५) मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार रमेश हिंगे (१९, रा. शिवतेजनगर, बिबेवाडी), मंगेश दामु मांजरे (२०, रा. ओटा स्कीम, निगडी) आणि मनिष माधव निदानिया याना अटक केली आहे. खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निगडी येथली त्रिवेणीनगर परिसरात अॅण्टी चैन स्नॅचिंग, रोड राॅबरी गुन्ह्यास प्रतिबंध व्हावा या अनुषंगाने गस्त घालत असताना पोलिस नाईक शरीफ मुलानी यांना त्यांच्या खास खबऱ्या कडून ओटा स्कीम येथील विवेकानंद शाळेजवळ एक जण संशयीतरित्या उभारला व पिस्तूल सारखे हत्यार तो बाळगत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-निरीक्षक पुरुषोत्तम चाटे, विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, अशोक दुधवणे, शरिफ मुलानी, गणेश कोकणे, किरण खेडकर,विक्रांत गायकवाड, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, प्रवीण माने यांच्या पथकाने सापळा रचला.
संशयित आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिंवत काडतुस आढळून आले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने आणखी एक पिस्टल त्याचा मित्र मंगेश याने घेतल्याचे सांगितले. मंगेश याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले. दोघांनी चार महिन्यापूर्वी मनिष निदानिया याच्याकडून त्या विकत घेतल्या होत्या.
व्हीएस न्यूज – मुलाची तक्रार न घेतल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस ठाण्यातच मारहाण केली. ही घटना नवी सांगवी पोलीस चौकीत रविवारी (दि. 23) रात्री दहाच्या सुमारास घडली. साहेबगौडा वामदेव पाटील (वय 49, रा. संकल्प सिद्धी अपार्टमेंट, शितोळे नगर, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू गंगाराम सुपे (वय 48, रा. बॉडिगेट पोलीस लाईन, औंध) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू सुपे नवी सांगवी पोलीस चौकीमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. रविवारी ते कर्तव्यावर असताना आरोपी पाटील चौकीत आला. त्याने त्याच्या मुलाची तक्रार का घेतली नाही म्हणून सुपे यांच्याशी हुज्जत घातली. तसेच छातीवर व तोंडावर मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की,रविवारी रात्री दहा च्या सुमारास १७ वर्षीय मुलगा आणि त्याचे दोन मित्र भरधाव वेगात ट्रिपल सीट दुचाकी चालवत होते.भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा अपघात झाला यात लहान मुलगा थोडक्यात बचावला. संतापलेल्या नागरिकांनी तिघांना चोप दिला. नागरिकांचा रोष पाहून तिघांपैकी एकाने शंभर नंबरला कॉल करत पोलिसांना बोलावून घेतले. तातडीने पोलिसांनी येऊन तिघांना नवी सांगवी पोलीस चौकीत आणले. दुचाकी चालवणार मुलगा हा अल्पवयीन होता त्यामुळे त्याच्या वडिलांना पोलिसांनी बोलावले होते. अल्पवयीन मुलाचे वडील साहेब गौडा पाटील हे पोलीस चौकीत आले. मुलाला किरकोळ जखम दिसली आणि पोलिसांनीच मारहाण केल्याचा गैरसमज करून त्यांनी थेट पोलीस कॉन्स्टेबल बाळू गंगाराम सुपे यांना शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करीत आहेत.
व्हिएस न्युज - पिंपरी-चिंचवडमध्ये गाडयांच्या तोडफोडीचे सत्र कायम आहे. शहराच्या पिंपळे गुरव भागात अज्ञात समाजकंटकांनी ओंकार कॉलनी मधील रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या रिक्षा आणि चारचाकी अशा सात ते आठ गाड्यांची तोडफोड केली. या प्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत. सहा ते सात जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन धुडगूस घालत गाड्यांची तोडफोड केली. ही घटना मध्यरात्री घडली आहे. शेखर चांदणे यांच्या मालकीच्या तीन गाड्या फोडल्या आहेत.
याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. ओंकार कॉलनी मध्ये गाडी घेऊन येत असताना चांदणे यांच्या गाडीवर अज्ञात टोळक्याने हल्ला केला यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत. त्यांच्या पुतण्याला काच लागली असून तिघे जण सुदैवाने बचावले आहेत.
व्हीएस न्युज - हिंजवडी येथे पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण कसबे (वय २७) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रवीणला पोलीस ठाण्यात बोलावले होते. प्रवीण कसबेविरोधात त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी समज देण्यासाठी प्रवीणला पोलीस ठाण्यात बोलावले होते. पोलिसांनी समज दिल्यानंतर प्रवीण घरी परतला. घरी गेल्यावर त्याने पुन्हा पत्नीशी भांडण केले. पोलिसांनी माझे काय केले अस म्हणत त्याने पुन्हा पत्नीला शिवीगाळ केली.
या प्रकाराने संतापलेल्या सासऱ्यांनी जावयाविरोधात तक्रार करण्यासाठी पुन्हा पोलीस ठाणे गाठले. त्यांच्यापाठोपाठ प्रवीणही हिंजवडी पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलीस ठाण्यात हवालदार अविनाश बोराटे यांनी प्रवीणला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवीणने त्यांना देखील शिवीगाळ केली. शेवटी शिवीगाळ करणे, धमकावणे आणि सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण विरोधात गुन्हा दाखल केला.
व्हीएस न्युज - शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत मटण शॉप दुकानातील २२ बकऱ्या आणि २ बोकडांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत ५ दुकान जळून खाक झाली आहेत. ही घटना रविवारी पहाटेच्या ५ च्या सुमारास मोरवाडी लाल टोपीनगर येथे घडली.
या आगीत एकूण ७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या विभागाने दिली आहे. मोरवाडी लाल टोपीनगर येथे पहाटे ५ च्या सुमारास मारुती टायर दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली, आगीने रोद्ररूप धारण करत शेजारी असलेल्या शानदार मटण शॉप या दुकानाला देखील आगीने घेरले.या दुकाना मधील २२ बकऱ्या आणि २ पाळलेल्या बोकडांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शानदार मटण शॉप मालक आणि मारुती टायर विक्री करणाऱ्या दुकानदाराचे ७ लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देताच घटनास्थळी भोसरी, संत तुकाराम नगर, चिखली, प्राधिकरण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले.
व्हीएस न्युज - पोलिस पत्नीने स्वतः अत्महत्या करून दोन वर्षाच्या स्वतःच्या कोवळ्या मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना हडपसर येथे शनिवारी(ता.22) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सासरच्या छळास कंटाळून ही आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल व कौटूंबिक हिसाचार केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सासु-सासऱ्यां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूनम उर्फ जान्हवी (वय २२, रा. टिळेकरवस्ती) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर शिवांश असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार पूनमचा पती अमित दत्तात्रय कांबळे हे हडपसर पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई आहेत. ते रात्रपाळीत कामाला होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते घरी गेले असता. घराची खिडकी उघडी होती व बेडरूमची लाईट चालू होती. त्यामुळे त्यांनी घरात पाहिले असता साडीच्या सहाय्याने पूनम हिने फॅनला गळफास घेतल्याचा व मुलाचा उशीने गळा दाबून खून केल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. त्यात पूनमने या घटनेस कोणालाही जबाबदार धरू नये असे नमूद केले आहे.
पूनमचे वडील सुरेश जगताप म्हणाले, ''मुलीला सासुरवास होता. तीचे लग्न चार वर्षांपूर्वीच झाले होते. ती सतत आम्हाला फोन करून सासरवास होत असल्याची माहिती देत. मात्र परिस्थित सुधारेल या हेतूने आम्ही तिला समजावून सांगत होतो. आम्ही घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.
व्हीएस न्युज - ऑस्ट्रेलिया मध्ये चालू असलेल्या बिग बॅश टि - 20 क्रिकेटच्या सामन्यांवर बेकायदेशीर सट्टा घेणार्या मनीष राजकुमार तलरेजा (वय-४१,राहणार - विजयनगर काळेवाडी) नितीन तिरंतदास कूकरेजा(वय-३५, राहणार - पिंपरी)या दोघांना काळेवाडी येथून (दि. २१) शुक्रवारी अटक करण्यात आली.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड खंडणी - दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे यांनी केली. बडे यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहीत मिळताच के. डि. एम प्लॅनेट, बि. बिल्डिंग, फ्लॅट क्र- ५०१, विजयनगर, काळेवाडी, पिंपरी येथे बेकायदेशीर सट्टा चालवणार्या दोन आरोपींना सापळा रचून छापा टाकून अटक केली.
या कारवाई मध्ये त्यांच्याकडून एलईडी टिव्ही, सेट टॉप बॉक्स, ९ मोबाईल हँन्डसेट, वही, पेन्सिल, प्लँस्टिक टेबल, टेबल कव्हर, इलेक्ट्रीक वायर, मोबाईल चार्जिंग हब, मोबाईल चार्जिंग बॉक्स, लँपटॉप व चार्जर, असा एकूण एक लाख १५,१०५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहा. पोलीस आयुक्त सतीश पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, राजेंद्र शिंदे, अजय भोसले, विक्रांत गायकवाड, आशिष बोटके, नितीन लोखंडे, शैलेश सुर्वे, नितीन जाधव, नितीन खेसे व अनिता जाधव यांचे पथकाने केली आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्ना बाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी केंद्रीय केमिकल फर्टीलायझर मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स ही भारत सरकारची कंपनी अनेक समस्यांनी ग्रासली आहे. कंपनीच्या कामगारांचा १९ महिन्याचा पगार प्रलंबित असून कंपनीकडे पुरेसे पैसे नसल्याने कंपनी चालू ठेवणे व्यवस्थापनाला कठीण जात आहे. कंपनीच्या जमीन विक्रीची परवानगी मिळूनही जमिनीची विक्री होऊ शकली नाही. यासाठी दोन वेळा जाहिरात प्रसिद्ध करूनही कोणी खरेदीदार पुढे आला नाही. या सर्व कारणाने कंपनी चालू ठेवणे अधिकच कठीण झाले आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठ्पुराव्याणे कंपनीला केंद्र सरकार कडून १०० कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळाले होते. त्यात कंपनीच्या कामगारांचा थकीत पगार देऊन कंपनीचे उत्पादन चालू करण्यात आले आहे. कंपनी सुस्थित चालू ठेवण्यासाठी मोठा निधी आवश्यक आहे. कंपनी पूर्वस्थितीत आणण्यासाठी तसेच सेवा निवृतीची रक्कम व कामगारांचे थकीत पगार देण्यासाठी केंद्रीय केमिकल फार्टीलायझर मंत्रालयाने केंद्रीय आर्थिक संबधि कॅबिनेट कमिटी पुढे ४५० करोड रुपये कंपनीस देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यास आज पर्यंत मंजुरी मिळाली नसल्याने एच. ए कंपनीच्या अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी आज संबधित खात्याचे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली .
सरकार या प्रश्ना बाबत सकारात्मक असून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संबधित विभागाच्या आधिकाऱ्या समवेत बैठक बोलावली असुन एच.ए कंपनीला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा म्हणाले असल्याचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रत्रकात म्हटले आहे.
व्हीएस न्युज - रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिस व आरटीओकडून नियम तोडणाऱ्या वाहनचालकांकडून दंड आकारला जातो. मात्र दंड आकारूनही वाहचालकांवर फारसा परक पडत नाही. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधित वाहनचालकाचा परवानाच निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठवावा आणि आरटीओने परवाना निलंबित करावा, असे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले आहेत.
त्यानुसार पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडणाऱ्यांचा वाहन चालवण्याचा परवाना निलंबित होणार आहे. अपघात रोखण्यासाठी सरकारने विविध विभागांमार्फत अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच विविध समित्यांचीही स्थापना केली आहे. एवढे करूनही रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी होताना किंवा रोखण्यात यश येत नाही. त्यामुळे सरकारने आता अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी गंभीर कारवाईचा निर्णय घेतला आहे. अपघात रोखण्यासाठी केवळ वाहतूक पोलिस आणि आरटीओंनाच जबाबदारी न देता या दोन विभागांसोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग पोलिस, आरोग्य विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रसिद्धी कार्यालयांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यातील मुख्य जबाबदारी ही आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची राहणार आहे.
दारू पिऊन वाहन चालवणारे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहून चालवणे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे आणि क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे या पाच प्रकारांपैकी कोणताही वाहतूक नियम मोडला तर संबंधित वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता पोलिसांनी परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओ विभागाकडे पाठवतील. आरटीओ विभागाने वाहतूक पोलिसांच्या शिफारशीनुसार संबंधित वाहनचालकाचा परवाना निलंबित करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्याचप्रमाणे हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशात नमूद आहे.
व्हीएस न्युज - जुण्या भांडणाच्या रागातून दोघा जणांनी मिळून एका तरुणाच्या घरात घुसत त्याच्या डोक्यात चाकूने वार केले. ही घटना पिंपरी रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या सेनेटरी चाळीमध्ये घडली. विकी सतीश ठोकळ (वय २२, रा. सेनेटरी चाळ, पिंपरी रेल्वेस्टेशनजवळ, पिंपरी) असे चाकूने वार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अविनाश काशिनाथ काळे (वय २५) आणि कृष्णा काशिनाथ काळे (वय २०, दोघे रा. काळेवाडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विकी ठोकळ हे त्यांच्या पत्नीसोबत पिंपरीतील सेनेटरी चाळीतील भाड्याच्या खोलीत राहतात. जुण्या भांडणाच्या रागातून आरोपी अविनाश आणि कृष्णा हे दोघे त्यांच्या घरात घुसले. तसेच त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्या चाकूने वार करुन पसार झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002