Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
फिर्याद देताना दोन गटात साने चौक पोलीस चौकीसमोर तुफान हाणामारी; दहा जणांना अटक

व्हीएस न्युज - दारु पिल्याचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन साने चौक पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या २५ ते ३० जणांच्या दोन गटात पोलिस चौकीसमोरच तुफान हाणामारी झाली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भिमशक्तीनगर साने चौक पोलीस चौकी समोर घडली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यु.बी.ओमासे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल संजय पवार, आशिष ज्ञानेश्वर गवळी, सचिन बाळासाहेब येलकेवाढ, योगेश कैलास कदम, अनिल विठ्ठल खंडागळे, अरुण दौलत पवार, गोरख दशरथ डुकळे, सतिश किसन जाधव, अर्जुन दशरथ पिटेकर आणि संदिप भारत डुकळे या दहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर कैलास गेणबा डुकळे (रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) हा आरोपी अद्याप फरार आहे. या सर्वांविरोधात भा.द.वि.क ३५३,३२३,१४३, १६०, ५०४ आणि महाराष्ट्र पोलीस अॅक्ट १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दारु पिण्याच्या कारणावरुन २५ ते ३० जणांच्या दोन गटात भांडण झाले होते. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास दोनही गटातील लोक हे साने चौक पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. यादरम्यान पोलिस चौकीच्या आवारात आणि समोरील रस्त्यावर या गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी मध्यस्ती केली असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. तसेच जमाव बंदीच्या आदेशाचा भंग करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी वरील दहा जणांना अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
तब्बल १०१ किलो गांजा जप्त ; भोसरी पोलिसांची कारवाई

व्हीएस न्युज - भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ई क्षेत्रीय कार्यालय शेजारी इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रोडवर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला तब्बल १५ लाख १६ हजार ८७५ रुपये किमतीच्या १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाच्या गांजासह अटक करण्यात आली. ही कारवाई भोसरी पोलिसांनी शनिवारी (दि. १३) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी येथे केली.

अतिक युनूस शेख (वय २७, रा. दिल्ली नाका, मोगल टेकडी, ता. संगमनेर, जि. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार रफिक शेख (रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. नगर) पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बाळासाहेब गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील ई क्षेत्रीय कार्यालायशेजारी इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रोडवर एक कार थांबली असून त्यामध्ये गांजा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कारसह एकाला ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता कारमध्ये तब्बल १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाचा १५ लाख १६ हजार ८७५ रुपये किमतीचा गांजा आढळून आला. यावरून अतिक शेख याला अटक करत गांजा जप्त करण्यात आला आहे. तर त्याचा दुसरा साथीदार पळून गेला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
शेळ्या चोरून चालवायचा मटणाचे दुकान; तिघांना केली भोसरी पोलिसांनी अटक.

व्हीएस न्युज - शेळ्या चोरून स्वतःचे मटणाचे दुकान चालवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भोसरी पोलिसांनी दोन साथीदारांसह अटक केली आहे. त्यांच्याकडून १० शेळ्या, दोन दुचाकी आणि एक कार असा एकुण ६ लाख ३६ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

अल्तमश कुरेशी (वय- १८) असे मुख्य आरोपीचे नाव असून, सोमेश तायड (वय-१९), रोहन रिठे (वय-२०) सर्व राहणार खडकी बाजार अशी दोन्ही साथीदारांची नावं आहेत. दोन्ही आरोपी महाविद्यालीयन विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनकडून प्राप्त माहितीनुसार, मुख्य आरोपी अल्तमशचे कासारवाडी येथे मटणाचे दुकान आहे. तो अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतो. परंतु , तो एक सराईत गुन्हेगार असून त्याने मोटार आणि दुचाकी चोरलेल्या आहेत. अनेक ठिकाणी चोरी करताना तो मोटारीत शेळ्या चोरून आणत, त्याच्यामार्फत वेगवेगळ्या पाच पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

दरम्यान, साथीदार सोमेश आणि रोहन यांच्यासह तो नाशिक फाटा इथे चोरीची मोटार विक्रीसाठी आल्याची माहिती समीर रासकर या पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी जाऊन तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता १० शेळ्या, दोन दुचाकी आणि एक तवेरा मोटार चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. चोरलेल्या शेळ्या अल्तमशच्या मटणाच्या दुकानात नेऊन हलाल करत आणि तेच मटण ग्राहकांना विकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कामगिरी भोसरी पोलिसांनी केली आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी : महाडाच्या बांधकाम साईटवरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू

व्हीएस न्युज - महाडाच्या बांधकाम साईटवरील इमारतीच्या १९ व्या मजल्यावर प्लास्टरचे काम करताना क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने एका कामगाराचा खाली पडून मृत्यू झाला.

ही घटना बुधवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास पिंपरीतील म्हाडाच्या साईटवर घडली. राजकुमार अशोक घोसले (वय २४, रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास पिंपरीतील म्हाडाच्या साईटवरील इमारतीच्या १९ व्या मजल्यावर राजकुमार हे क्रेनवर उभे राहून प्लास्टरचे काम करत होते. यावेळी क्रेनचे अचानक ब्रेक फेल होवून ती खाली कोसळली. याबरोबरच राजकुमार ही खाली कोसळले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत इतर दोन कामगार देखील जखमी झाले आहेत. सध्या त्यांनी प्रकृती स्थीर आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
सावधान!! पुण्यातील मुठा नदी पात्रात मगर.

व्हीएस न्युज - पुण्यातील नांदेड, शिवणे ग्रामपंचायत परिसरात मुठा नदी पात्रात मगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी पात्रात उतरू नका. अशा स्वरुपाची सुचना नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीकडून काढण्यात आली आहे. नदीपात्रत मगर आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुणे शहराला वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या चार ही धरणात पावसाने यंदा दमदार हजेरी लावल्याने पुणेकर नागरिकाची काही प्रमाणात पाणी संकटातून मुक्तता झाली असताना. ही धरण 100 टक्के भरल्यानंतर कालव्यातून पाणी सोडले जाते. मात्र यंदा पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पाणी सोडले गेले नसताना. धरण क्षेत्रापासून काही किलोमीटर अंतर असलेल्या नांदेड, शिवणे ग्रामपंचायत भागातून जाणार्‍या मुठा नदी पात्रात मगर आढळल्याची घटना घडली आहे.

यावर खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीकडून नागरिकांनी पाण्यात उतरू नये. असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी देखील धरण क्षेत्रात मगर आढळल्याची बाब समोर आली होती. आता यावर प्रशासन नेमकी काय उपाययोजना करते हे पाहावे लागणार आहे.

...Read More

V. S. News
...तर चक्क चावा घेत पाडला कानाचा तुकडा; निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

व्हीएस न्युज - दुचाकीला लाथ मारून खाली पाडल्याचा जाब विचारल्याने चक्क आरोपीने कानाला चावा घेत तुकडा पाडल्याची गंभीर घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी जखमी कौतुभ गोळे यांनी निगडी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी आरोपी अभिजित गुंजाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादींची इमारतीतमध्ये पार्क केलेल्या दुचाकीला अभिजीतने लाथ मारली होती. त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून चावा घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौतुभ यांनी त्यांची दुचाकी राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. तेव्हा, आरोपी अभिजित हा दुचाकीला काहीतरी खोडसाळपणा करत असल्याचे फिर्यादीच्या पत्नीने पाहिले आणि पतीला माहिती दिली. त्यांनी तातडीने येऊन पाहिले असता तो खोडसाळपणा करत असल्याचे दिसले. तसेच आरोपी अभिजितने त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडली. याचा जाब जेव्हा कौतुभ यांनी विचारला तेव्हा त्याने चक्क कानाला चावा घेत तुकडा पाडला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अभिजीतने कौतुभ आणि त्यांच्या पत्नीला लोखंडी पाईपने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.

...Read More

V. S. News
एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी केली अटक.

व्हीएस न्यूज – काळेवाडी चौक येथील पेट्रोल पंपावरील एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या पाचही गुन्हेगारांवर ल चोरी, घरफोडी, मारामारी, बेकायदेेशीर हत्यार बाळगणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलिसांच्या या कारवाईमुळे वाकड, कोथरूड, श्रीरामपूर आणि भूम पोलिस ठाण्यातील एकूण सोळा गुन्हे उघडकीस आले आहेत.

दुर्गेश बापू शिंदे (वय 32, रा. वाकड, मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), प्रमोद संजय सवणे (वय 29, रा. अष्टविनायक कॉलनी, वाकड), भैया ऊर्फ सचिन बबन जानकर (वय 26, रा. अण्णाभाऊ साठे नगर, वाकड), नाना ऊर्फ सचिन रामचंद्र शिंदे (वय 32, रा. क्षितिज कॉलनी, वाकड), रामकृष्ण सोमनाथ सानप (वय 30, रा. सद्गुरू कॉलनी, वाकड. मूळ रा. रामेश्वर वस्ती, ता. भूम, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत.

अटक केलेल्या आरोपींपैकी दुर्गेश शिंदे हा श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याच्यावर 2011 पासून जबरी चोरी, घरफोडी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारखे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. भैया जानकर याच्यावर 2015 पासून वाकड पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत, विनयभंग, दंगा यांसाखरे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

प्राप्त माहितनुसार, पोलीस कर्मचारी प्रमोद कदम यांना माहिती मिळाली की, काहीजण काळेवाडी चौकातील पेट्रोल पंपावरील एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याकडे कार आणि घातक हत्यारे आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लोखंडी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, मिरची पावडर, नायलॉन रस्सी, स्टील रॉड, पाच मोबाईल फोन आणि एक स्विफ्ट कार (एमएच 14 / सी के 1161) असा ऐवज मिळाला. यावरून पाच जणांना अटक करण्यात आली.

नाना शिंदे याच्यावर कोथरूड आणि वाकड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. रामकृष्ण सानप याच्यावर भूम आणि वाकड पोलीस ठाण्यात दोन आणि प्रमोद सवने याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद आहे. वाकड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाकड, कोथरूड, भूम आणि श्रीरामपूर या चार पोलीस ठाण्यातील 16 गुन्ह्यांची उकल झाली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, नितीन ढोरजे, प्रमोद कदम, भैरोबा यादव, विजय गंभीरे, दीपक भोसले, शाम बाबा, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरेश भोसले, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, जावेद पठाण, रमेश गायकवाड यांच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
मोरवाडी: शोर्टसिर्कीट मुळे काचेच्या कंपनीत आग; चार कामगारांची सुखरूप सुटका.

व्हीएस न्युज - मारवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे मोहम्मदिया आर्ट ग्लास या काचेच्या कंपनीत आग लागली .या आगीत अडकलेल्या चार कामगारांची अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली.

ही घटना शनिवारी (दि.६) रात्री उशीरा घडली. इरफान शेख (वय ४५), अखिल मुजावर (वय ४५), आसिफ (वय ३५) आणि शान बाज (वय ३५) असे सुटका करण्यात आलेल्या कामगारांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशीरा मोरवाडीतील मोहम्मदिया आर्ट ग्लास येथे शॉर्टसर्किट होऊन मीटरमध्ये आग लागली होती. यावेळी इरफान, अखिल, आसिफ आणि शान बाज हे चौघे कंपनीमध्ये झोपले होते. मीटरमधून धूर निघत असल्याचे एकाने पाहिले. परंतु, बाहेरून शटर बंद आणि मोठा पाऊस सुरू असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. परिसरात करंट देखील उतरला होता. म्हणून कोणी शटरकडे गेले नाही. आत झोपलेल्या कामगार इरफान शेख याने फोनद्वारे अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच तेथे अग्निशामक दल दाखल झाले. त्यांनी महावितरणला फोन करून वीजप्रवाह बंद करण्यास सांगितला आणि आतील घाबरलेल्या कामगारांना आवाज देऊन शटर उघडण्यास सांगितले. आणि कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही कामगिरी अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, हनुमंत होले, निखिल गोगवले, अमोल चिपळूणकर, संभाजी दराडे, वाहन चालक विशाल बाणेकर यांच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
पिंपरी : इंदिरागांधी उड्डाणपुलाचे ऑडिट करून तत्काळ दुरुस्ती कारवी - गणेश आहेर

व्हीएस न्युज - पिंपरी येथील इंदिरागांधी उड्डाणपुलाच्या दुरावस्थेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते, ही बाब अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनात आणून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

पिंपरी मातोश्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे की " इंदिरागांधी उड्डाणपुलाचे ऑडिट करून तत्काळ दुरुस्ती कारवी अन्यथा सदरील ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्याचे पूर्ण जबाबदार प्रशासन राहील अशी खात्री प्रशासनाने द्यावी".

इंदिरागांधी उड्डाणपुलाचे ऑडिट करून तत्काळ दुरुस्ती कारवी असी मागणी गेले अनेक दिवसांपासून गणेश आहेर प्रशासनाकडे करत आहेत.

...Read More

V. S. News
भोसरी : रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक, १ बनावटी पिस्टल व २ जीवंत काडतूस जप्त; खंडणी दरोडा विरोध पथक गुन्हे शाखा पिंपरी यांची कामगिरी.

व्हिएस न्युज - भोसरी येथील मुंजोबा मित्र मंडळ गणपती मंदिरा सामोर रेकॉर्डवरील गुन्हेगारास २८ जुन रोजी अटक करून भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर साहेबराव शेवते (वय - ३०,रा. घरकूल चखली ) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. सदरील आरोपी कडूून ३०हजार ४०० रू किमतीचे बनावट पिस्तल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

सागर शेवते याच्यावर यापूर्वी भोसरी पोलिस ठाणे येथे शारीरिक दुखापत व निगडी पोलिस ठाणे येथे अग्नीशस्त्र बाळगण्याचे असे एकूण दोन गुन्हे दाखल आहेत.

शांतीनगर भोसरी येथे गस्त घालत असताना पो.ना किरण काटकर यांच्या बतमीदारा काडून मिळालेल्या बातमी नुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुधीर अस्पत यांच्या अधिपत्याखाली पोलीस उप-निरक्षक विठ्ठल बडे यांनी सापा रचून मोठ्या शिताफीने गुन्हेगारास ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड आयुक्तालयचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन,अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे ,सह पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे ,पोलीस कर्मचारी अजय भोसले ,महेश खांडे ,किरण काटकर ,उमेश पुलगम ,किरण खेडकर ,शरीफ मुलाणी, नितीन लोखंडे, शैलेश सुर्वे व सागर शेडगे यांचे पथकाने केली आहे.

...Read More

V. S. News
पुणे- इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू ; 3 जणांना सुखरूप बाहेर काढले

व्हिएस न्युज - मध्यरात्रीत कोंढवा तालाब कंपनीसमोर बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यांवर मोठी सीमाभिंत कोसळली. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. तर मातीच्या ढिगाऱ्याखालून 3 जणांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, घटनास्थळी एनडीआरएफकडून मदत आणि बचाव कार्य सुरू होते. एनडीआरएफने दिलेल्या महितीनुसार, प्रशिक्षित श्वान बोलावून मातीच्या ढिगाऱ्यखाली कोनं आहे का याची तपासणी केल्यानंतर मदतकार्य थांबविले आहे.

पुण्यातील दुर्घटनेची चौकशी करा; मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. दरम्यान, दुर्घटनेबाबत चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नियमानुसार शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही ही त्यांनी सांगितले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मदत कार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.कोंढवा येथील दूर्घटनेवरून प्रथमदर्शनी असे लक्षात येते की बांधकाम मजुरांसाठी जी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ती सुरक्षित नव्हती. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामविषयक सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

कोंढवा दुर्घटना प्रकरणी पोलिसाकडूनही चौकशी करणार- पोलीस आयुक्त

भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची प्रशासन आणि पोलिसाकडूनही चौकशी केली जाणार आहे तसेच, या संपूर्ण घटनेत जबाबदार व्यक्तींला लवकरच अटक करण्यात येणार आहे. असे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत असा आरोप माजी आमदार महादेव बाबर यांनी केला आहे. तर महापौर मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!