पिंपरी : इंदिरागांधी उड्डाणपुलाचे ऑडिट करून तत्काळ दुरुस्ती कारवी - गणेश आहेर
पिंपरी
2019-07-08
व्हीएस न्युज - पिंपरी येथील इंदिरागांधी उड्डाणपुलाच्या दुरावस्थेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते, ही बाब अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनात आणून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
पिंपरी मातोश्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे की " इंदिरागांधी उड्डाणपुलाचे ऑडिट करून तत्काळ दुरुस्ती कारवी अन्यथा सदरील ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्याचे पूर्ण जबाबदार प्रशासन राहील अशी खात्री प्रशासनाने द्यावी".
इंदिरागांधी उड्डाणपुलाचे ऑडिट करून तत्काळ दुरुस्ती कारवी असी मागणी गेले अनेक दिवसांपासून गणेश आहेर प्रशासनाकडे करत आहेत.