व्हिएस न्युज - मध्यरात्रीत कोंढवा तालाब कंपनीसमोर बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यांवर मोठी सीमाभिंत कोसळली. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. तर मातीच्या ढिगाऱ्याखालून 3 जणांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, घटनास्थळी एनडीआरएफकडून मदत आणि बचाव कार्य सुरू होते. एनडीआरएफने दिलेल्या महितीनुसार, प्रशिक्षित श्वान बोलावून मातीच्या ढिगाऱ्यखाली कोनं आहे का याची तपासणी केल्यानंतर मदतकार्य थांबविले आहे.
पुण्यातील दुर्घटनेची चौकशी करा; मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. दरम्यान, दुर्घटनेबाबत चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नियमानुसार शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही ही त्यांनी सांगितले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मदत कार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.कोंढवा येथील दूर्घटनेवरून प्रथमदर्शनी असे लक्षात येते की बांधकाम मजुरांसाठी जी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ती सुरक्षित नव्हती. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामविषयक सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
कोंढवा दुर्घटना प्रकरणी पोलिसाकडूनही चौकशी करणार- पोलीस आयुक्त
भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची प्रशासन आणि पोलिसाकडूनही चौकशी केली जाणार आहे तसेच, या संपूर्ण घटनेत जबाबदार व्यक्तींला लवकरच अटक करण्यात येणार आहे. असे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत असा आरोप माजी आमदार महादेव बाबर यांनी केला आहे. तर महापौर मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002