व्हीएस न्यूज – मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची आवक 494 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 14 हजार 360 गड्डया एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 61 क्विंटलने घटली; तर पालेभाज्यांची आवक 7 हजार 753 गड्डयांनी वाढली.दिवाळीदरम्यान बाजारात फळभाज्यांची आवक मंदावली होती. आता परिस्थिती हळुहळू पुर्वपदावर येत असतानाच या आठवड्यात आवक मंदावली. मात्र, पालेभाज्यांची आवक अडीच पट वाढली. भाजीपाल्यांचे दर मात्र चांगेलच वधारले आहेत.
या आठवड्यात कांद्याची आवक 10 क्विंटलने घटून, सरासरी भावात 150 रुपयांची घट झाली. बटाट्याची आवक व भावहदेखील स्थिर राहिले. आल्याची आवक दोन क्विंटलने घटूनही भाव मात्र स्थिर राहिले. भेंडीची आवक दोन क्विंटलने वाढली असून, भावात 1000रुपयांची वाढ झाली. गवारीची आवक चार क्विंटलने घटूनही भाव 750 रुपयांनी वाधारले. टोमॅटोची आवक 19 क्विंटलने वाढली असून, भावात किरकोळ 100 रुपयांची वाढ झाली. मटारची आवक तीन क्विंटलने वाढूनही दर आठ हजार रुपयांवर पोचले. घेवड्याची आवक एकक्विंटलने वाढली असून, भाव 250 रुपयांनी वधारले. दोडक्याची आवक तीन क्विंटलने घटून भाव मात्र स्थिर राहिले.
मिरचीची आवक 10 क्विंटलने वाढली असून, भावात 500 रुपयांची घट झाली. दुधी भोपळ्याची आवक स्थिर राहूनही भाव 250 रुपयांनी घटले. काकडीची आवक आठ क्विंटलने घटूनही भावात 100 रुपयांची किरकोळ घट झाली. कारल्याची आवक दोन क्विंटलने घटलीअसून, भाव 250 रुपयांनी वधारले. फ्लॉवरची आवक 66 क्विंटलने वाढून भावात 600 रुपयांची वाढ झाली. कोबीची आवक 16 क्विंटलने वाढूनही भाव350 रुपयांनी वधारले. वांग्यांची आवक एक क्विंटलने घटली असून, भाव मात्र स्थिर राहिले.
व्हीएस न्यूज – अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा दोषी असतो. मराठा क्रांती मोर्चासाठी समाजाने एकत्रित यावे. एकजुटीच्या माध्यमातून पुढची पिढी नवीन इतिहास घडविण्याचे काम निर्माण होईल. तेच मोर्चाचे यश असेल, असे प्रतिपादन मावळचे आमदारसंजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत शालेय शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचा 2 नोव्हेंबर स्मृतिदिन आणि 8 नोव्हेंबर जन्मदिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे सोशल फाउंडेशनच्या वतीने देहूगाव येथील श्री शिवाजी चौकात प्रतिवर्ष व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. यंदाच्या 14व्या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प मराठा क्रांती मोर्चा-वाटचाल आणि दिशा या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे होते. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे नगरसेवक प्रवीण भालेकर, पिंपरी-चिंचवड पालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी उपसभापती नाना शिवले, पुणे जिल्हा परीषदेचे माजी सदस्य प्रशांत ढोरे, दिशा सोशल फांऊडेशनचे सचिन साठे, व्याख्यानमाला समितीचे राजेंद्र घावटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाचे राजकीय समीक्षक प्रा. डॉ. प्रकाश पवार, शिलेदार प्रवीण गायकवाड, विकास पासलकर, राजेंद्र कोंढरे यांनी छावा संघटनेचे समन्वयक आबा पाटील, फांऊडेशनचे प्रा. प्रवीण कदम, प्रा. सुनील भसे आणि उपस्थित श्रोत्याच्या प्रश्नांची उत्तरे देतपरिसंवाद साधला. आमदार भेगडे यांनी या व्याख्यानमालेला पूर्णवेळ देत परिसंवादात सहभाग घेतला. आमदार भेगडे यांना मोर्चाच्या सार्थकाबाबत परिसंवादामध्ये प्रश्न विचारले असता ते म्हणाले.अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा दोषी असतो. 30 वर्षाचीतपश्चार्या सहन करीत आलो आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने जनमाणसांत एक मोठी प्रतीमा निर्माण केली आहे. येणाऱ्या काळात आपण सकारात्मक दृष्टीतून पाहू.
आरक्षण किंवा विविध सवलतीचा प्रश्न असेल. मराठा समाजाने एकत्रित यावे. एकजुटीच्या माध्यमातून पुढची पिढी नवीन इतिहास घडविण्याचे काम निर्माण होईल. तेच मोर्चाचे यश असेल, असे प्रतिपादन आमदार भेगडे यांनी व्यक्त केले. दरम्यान लेखक नामेदव पवारयांच्या “मराठी क्रांती मोर्चा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम यांनी केले. संदीप शिंदे यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा धुव्वा उडवणारे शहराच्या राजकारणातील “पैलवान’ आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.दुसरीकडे, मावळचा “गड’ तीनदा राखून तब्बल 30 वर्षे भाजपशी निष्ठावंत असलेल्या आमदार बाळा भेगडे यांनीही मंत्रीपदासाठी बाह्या सरसावल्या आहेत. त्यामुळे मंत्रिपदाचे एक “फुल’ त्यावर दावा करणारे “तीन माली’ अशीस्थिती निर्माण झाली आहे. मंत्रिपदाचे हे फुल आता कुण्याच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाचे “गाजर’ दाखवले होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपसोबत गेले आहेत. राणेयांना राज्यात मंत्री करण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मावळात वेगवेगळ्या दोन कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट दिली. यावेळी तावडे आणि उपाध्ये यांनीही आमदार भेगडे यांच्या मंत्रिपदाबाबतनमोल्लेख केला. परिणामी, पिंपरी-चिंचवडमधील मंत्रिपदाचे स्वप्न भंगणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका काबीज करण्यात भाजपला यश मिळाले. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्ष बाकी आहे. त्यातच डिसेंबर2018 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत आमदार जगताप किंवा लांडगे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभाआणि विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला चांगले यश मिळेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे जिल्हयात विजयी घोडदौड करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पिछेहाट झाली आहे. जिल्ह्यात केवळ9 ठिकाणी भाजपचा सरपंच झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आजही राष्ट्रवादी, कॉंग्रेसची पाळेमुळे घट्ट आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला पुणे जिल्हा आणि पर्यायाने राज्यातप्रभावी ठरेल, अशा चेहऱ्याची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणि राज्यात प्रभावशाली ठरेल, अशा आमदारला मंत्रिपदाची संधी देण्यात येईल. त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीत जगताप, लांडगे आणि भेगडे यांच्यापैकी कुणाची वर्णीलागणार की, मंत्रिपदाच्या केवळ वावड्या ठरणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मंत्रिपदासाठी दावेदारांची बलस्थाने :
1) आमदार लक्ष्मण जगताप :
– महापालिका निवडणुकीतील विजय
– पिंपरी-चिंचवडचा शहराध्यक्ष म्हणून प्रभावी नेता
– मावळ लोकसभा मतदार संघात मोठा संपर्क
– पवार कुटुंबियांविरोधात थेट बोलण्याची धमक
– पश्चिम महाराष्ट्रातील सक्षम मराठा नेता
– आगामी निवडणुकांसाठी भाजपचा सक्षम चेहरा
– कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळण्याची अपेक्षा
2) आमदार महेश लांडगे :
– पश्चिम महाष्ट्रातील प्रभावी युवा चेहरा
– बैलगाडा शर्यतीच्या लढ्यामुळे राज्यात परिचित
– आळंदी, खेड, जुन्नरमधील विजयात सिंहाचा वाटा
– पालिका निवडणुकीत भोसरीतून शिवसेना-राष्ट्रवादीचा धुव्वा
– राज्य क्रीडा संघटनांच्या महत्त्वांच्या पदांवर कार्यरत
– “मोदी लाटेत’ अपक्ष मैदान मारणारा आमदार
– मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याशी सलोख्याचे संबंध
– राज्य क्रीडा मंत्रीपदी संधी मिळण्याची अपेक्षा
3) आमदार बाळा भेगडे :
– मावळला भाजपचा बालेकिल्ला केला
– सलग तीनदा भाजपचा आमदार
– जिल्हाध्यक्ष म्हणून ग्रामीण भागात संपर्क
– भाजपचा निष्ठावंत आमदार म्हणून ओळख
– मावळ तालुक्यातील संयमी नेतृत्व
– पक्ष संघटनेत महत्त्वाचे पद, ग्रामीण चेहरा
– ग्रामीण भागाशी संबंधित मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका हद्दीतील जमिनीवरील सर्व वृक्षांची गणना करण्यात येणार आहे. वृक्षांची सॅटेलाईटद्वारे गणना कामास 6 कोटी 46 लाख 83 हजार 814 रुपये खर्चास स्थायी समितीने 27 सप्टेंबर 2017 मान्यता दिली, मात्र अधिकाऱ्यांनी सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष दाखवून या रकमेत 29 लाख 58 हजार 904 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे वृक्ष गणनेचा एकूण खर्च 6 कोटी 76 लाख 42 हजार 718 रुपये होणारआहे. हा विषय स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व जमिनीवरील वृक्षांची गणना करणार आहे, जीआयएस, ईमेज सर्व्हर ऍप्लिकेशनद्वारे ही गणना होणार आहे. या वृक्ष गणनेला दोन वर्षे अवधी लागणार आहे. तर तीन वर्षेकालावधीत वृक्षांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी टेराकॉन इकोटेक प्रा. लि. संस्थेला 6 कोटी 46 लाख 83 हजार 814 रुपये खर्चाने ठेका देण्यास स्थायी समितीने 27 सप्टेंबरला मंजुरी दिली होती.
दरम्यान, सॉफ्टवेअरचे तांत्रिक दोषामुळे निविदेतील रक्कम फक्त एकाच नगाप्रमाणे दर दर्शविल्यामुळे निविदेच्या प्रत्यक्ष दरामध्ये 29 लाख 58 हजार 904 रुपये इतका फरक प्रत्यक्ष दिसून आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सदरील रकमेत वाढ करून एकूण 6 कोटी 76 लाख 42 हजार 718 रुपये खर्चास मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानुसार दर पाच वर्षांनी वृक्ष गणना करणे बंधनकारक आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने या आदेशाला हरताळ फासला आहे. 2004 नंतर अद्याप वृक्षगणना झालेली नाही. कागदोपत्री घोडे आणिनिविदा प्रक्रियेमध्येच शहरातील वृक्षांची गणना अडकली आहे. तब्बल तेरा वर्षांनी वृक्ष गणनेला मृहूर्त लागत असला तरी त्यालाही वाढीव खर्चाचे ग्रहण लागले आहे. 29 लाख 58 हजार रुपये महापालिकेला जादा मोजावे लागणारअसल्याने करदाते संताप व्यक्त करत आहेत.
व्हीएस न्यूज - टेलिनॉर इंडियातर्फे आपल्या महाराष्ट्र व गोव्यातील ग्राहकांसाठी नवीन अनलिमिटेड प्लॅन सादर करण्यात आला आहे. एसटीव्ही 143 यामध्ये अनेक वैशिष्टये असून त्यामध्ये अमर्याद लोकल व एसटीडी कॉल्स व 28दिवसांच्या वैधतेसह सर्व हॅंडसेटकरिता 2 जीबी हायस्पीड डेटा सेवा यांचा समावेश आहे. या योजनेमुळे टेलिनॉरच्या ग्राहकांना कॉल रेटची चिंता न करता आपल्या प्रियजनांशी संपर्कात राहता येणार आहे.
यावेळी बोलताना टेलिनॉरचे महाराष्ट्र व गोवा परिमंडलाचे व्यवसाय प्रमुख सुक्रीत मैत्रे म्हणाले की, ग्राहकांना किफायतशीर दरात उत्पादने उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असतो. आमच्या नव्या एसटीव्ही 143 या प्लॅनमुळे व्हॉइस आणि डाटाचे सर्वोत्तम फायदे ग्राहकांना मिळणार आहेत. ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा देण्यासाठी टेलिनॉर कटिबद्ध आहे. ग्राहकांना नव्या ऑफर्सचा लाभ नजीकच्या रिटेल आउटलेटमध्ये किंवा टेलिनॉर इंडियाच्या वेबसाईटद्वारे ऑनलाइन रिचार्ज करून घेता येईल. एसटीव्ही 143 हा प्लॅन टेलिनॉर इंडियाच्या मोबाईल ऍपवर उपलब्ध आहे.
व्हीएस न्यूज - पश्चिम भारतातील बाजारपेठ अधिक मजबूत करण्याकरिता सायकल कंपनी हिरो सायकल्सने अनेक नवीन मॉडेलचे अनावरण केले. वजनाने हलकी असलेली ही मॉडेल मुलींच्या सायकली आहेत. अनावरण करण्यात आलेल्यांमध्ये मिस इंडिया श्रेणीत फ्लोरा आणि रीवा, ऑक्टोन श्रेणीत फायरफ्लाई आणि जाईफर तसेच स्प्रिंट श्रेणीतील एक्सप्लोड आणि झापपर यांचा समावेश आहे. हिरो सायकलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज मुंजाळ म्हणाले, सादर करण्यात आलेली ही सहा मॉडेल्स विक्रीच्या दृष्टीने खूपच आश्वासक आहेत.
डिलर मेळाव्यात बोलताना मुंजाळ पुढे म्हणाले की यापैकी काही मॉडेल्स भरपूर संशोधन आणि नियोजन केल्यानंतरच डिझाइन केले गेले आहे. लॉंच केलेल्या ऑक्टोन श्रेणीमधील बाइकचे वजन सर्वात कमी आहे. आजच्या पिढीच्या गरजा लक्षात घऊन स्पोर्टी आणि आकर्षक लुक ठेवण्यात आला आहे. हिरो साइकिलच्या देशभरातील 2200 वितरकांचे प्रचंड नेटवर्क आहे. या व्यतिरिक्त कंपनीने स्प्रिंट स्टोअर उघडणे देखील सुरू केली आहे.
व्हीएस न्यूज - राहत्या घरी गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. सिद्धार्थ भीमराव जगताप (वय 35, तक्षशिलानगर) अस आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्याला वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, सांगवी पोलीस पुढील तपास सुरू केला आहे.
व्हीएस न्यूज - बीआरटी मार्गावरून पादचारी व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मुंबईच्या आयआयटी संस्थेने उपस्थित केला होता. त्यानुसार शहरात सुरक्षित बीआरटी मार्गासाठी महापालिका सिग्नल व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणार आहे. याकरिता लवकरच एक संस्थेचे नेमणूक करणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपरी महापालिकेने महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, सत्तारुढ पक्षनेते, नगरसेवक, अधिका-यांसह आयुक्त श्रावण हर्डीकर हे शुक्रवारी (दि.3) अहमदाबाद दौऱ्यावरून परतले आहेत. याबाबत आयुक्त हर्डीकर म्हणाले की,अहमदाबाद बीआरटी प्रकल्प चांगला असून आपल्याकडेही जास्तीत जास्त सोयीस्कर बीआरटी राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत, शहरातील प्रमुख चार मार्गावर बीआरटी सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा शहरातील नागरिकांना होणार आहे. निगडी ते दापोडी मार्गावर बीआरटीचा चांगला प्रतिसाद मिळण्याचा विश्वास आहे.
मात्र, प्रवाशी व पादचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यासाठी पालिका वेगळा विचार करत आहे. सुरक्षाविषयक सुधारणा बीआरटी मार्गात करण्यात येणार आहेत. त्यानुसार या बीआरटी मार्गाचे नियोजन सुरू आहे. सुरक्षेच्या मुद्दयावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वर्ल्ड बॅंकेने पालिकेला परवानगी दिली आहे. या मार्गावर प्रवासी, नागरीक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच एक संस्था नेमली जाणार असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे आयुक्त हर्डीकर म्हणाले.
व्हीएस न्यूज - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ व वसुंधरा क्लब पुणे यांच्या वतीने निगडी येथे 11 ते 13 नोव्हेंबर कालावधीत किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पर्यावरण विषयक विविध लघुपट, अनुबोधपट प्रदर्शित केले जाणार आहेत. नदी वाचवा, जीवन वाचवा हा यंदाच्या महोत्सवाचा हेतू असणार आहे. यावेळी जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्वास येवले यांना यंदाचा वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल यांनी दिली.
या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि.11) नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, नगरसेविका शर्मिला बाबर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर लगेच पर्यावरण विषयक विविध लघुपट आणि अनुबोधपट प्रदर्शित केले जाणार आहेत. निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्राशी संबधित असलेल्या समस्या व आव्हानांचा शोध घेऊन, त्यावर कायमस्वरूपाची उपाययोजना व समाधान शोधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारा हा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये संपन्न होणार आहे.
शनिवारी (दि.11) सकाळी सहा वाजता एम्प्रेस गार्डन येथे निसर्ग अभ्यास सहलीचे ही आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता संभाजीनगर येथील नोव्हेल ज्युनिअर कॉलेजमध्ये गिर्यारोहण प्रात्यक्षिके, उपकरणांची माहिती दिली जाणार आहे. दुपारी चार वाजता सावरकर सभागृहात पर्यावरण बाजार (पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री) व निसर्ग विषयक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक लघुपटाचे प्रक्षेपण होणार आहे. सायंकाळी सहा वाजता घरातील ओल्या कच-यापासून बायोगॅस व खत निर्मिती या विषयावर कार्यशाळा होणार आहे.
दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा व वसुंधरा सन्मान पुरस्काराचे वितरण सोमवार सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. यावेळी खासदार अमर साबळे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी उपस्थित राहणार आहेत. जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्वास येवले यांना वसुंधरा सन्मान तर व्यंकटेश भताने, सोमनाथ म्हसुडगे देहूगाव यांना वसुंधरा मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे लाभ घेण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे. यावेळी श्रीकांत मापारी, नरहरी वाघ, राजेश देशमुख,विजय सातपुते, भास्कर रिकामे आदी उपस्थित होते.
पवना नदी अभ्यास वर्ग…
रविवारी (दि.12) सकाळी आठ वाजता चिंचवड येथील पवना नदी घाटावर भावसर व्हिजनच्या वतीने पवना नदी अभ्यास वर्गाचे आयोजन केले आहे. सकाळी दहा वाजता कदम सभागृहात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक लघुपट प्रक्षेपण होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता सायकल फॉर रिव्हर नदी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारी सायकल फेरी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ येथून सुरु होऊन पवना नदी घाटावर शपथ ग्रहण करण्यात येईल.
25हून अधिक शाळांमध्ये प्रबोधन…
सोमवारी (दि.13) सकाळी सात वाजता देहूरोड येथील घोरावडेश्वर मंदिरावर निसर्ग सहल जाणार आहे. सकाळी दहा वाजता सावरकर सदनातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी चित्रपट व फोटो प्रदर्शनाला भेट देणार आहेत. या महोत्सवात शहरातील 25 पेक्षा जास्त शाळांमधून पर्यावरण प्रबोधन करणारे विषयक लघुपट दाखविले जाणार आहेत. नदी वाचवा जीवन वाचवा या विषयाशी संबधित निबंध स्पर्धा आयोजित केल्या असून दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
व्हीएस न्यूज - राज्य शासनाने विविध अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन पंचायतराज संस्थांचे अधिक सक्षमीकरण करावे. ग्रामीण पंचायतराज संस्था अधिक सक्षम झाल्या तरच आपला देश गतिमान प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
राज्य निवडणूक आयोग, राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग, मुंबई विद्यापीठ आणि पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेमार्फत ‘73 व 74 व्या घटना दुरुस्तीची 25 वर्षे : प्रगती आणि भावी वाटचाल’ या विषयावर मुंबई विद्यापीठात परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे आज राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते उद्घाटन व पिंपरी चिंचवड महानगरापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृती विषयक माहिती व निवडणूक कार्यप्रणालीच्या पुस्तिकांचे प्रकाशन आज त्यांच्या हस्ते मुंबई विद्यापिठात झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ग्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, आयुक्त श्रावण हर्डीकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदे, केंद्रीय पंचायतराज विभागाचे निवृत्त सहसचिव टि. आर. रघुनंदन, ग्राम विकास खात्याचे सचिव असिम गुप्ता, निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चेन्ने, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जगदीश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल सी. विद्यासागर राव राव म्हणाले, 73 व 74 व्या घटना दुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार दिले. ग्रामिण व शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था अधिक संक्षम करण्यासाठी त्यांना आणखी अधिकार देण्याची आवश्यकता आहे. दोन दिवसीय या परिषदेमध्ये त्यावर विचार विमर्ष करुन शासनाला शिफारशी कराव्यात. राज्यात ग्रामीण पंचायतराज संस्थांकडे 29 पैकी 14 तर शहरी पंचायतराज संस्थांकडे 18 पैकी 10 विषयाचे हस्तांतरण करण्यात आले आहे. उर्वरीत विषय तथा अधिकारांचे हस्तांतरण करण्यासाठी टाइम बाउंड कार्यक्रम आखण्यात यावा. केरळ राज्यात याबाबतीत प्रभावी काम झाले आहे. त्याचा अभ्यास करण्यात यावा. पंचायतराज संस्थांचे सक्षमीकरण झाल्याशिवाय देशाचा विकास गतिमान होणार नाही, असे ते म्हणाले. आदिवासी भागातील ग्रामपंचायतीना 5 टक्के टिएसपी निधी थेट देण्याबाबत आपण अधिसूचना काढली. त्याचा परिणाम म्हणून 2016-17 मध्ये 5हजार 800 आदिवासी ग्रामपंचायतींना साधारण 214 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या ग्रामपंचायतींना 10 ते 80 लाख रुपयापर्यंत निधी मिळाला ज्याचा या गावाच्या विकासकार्यात मोठा उपयोग होऊ शकला. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ (ता. आकर्णी) या गावाला तर 83 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकला. अशा पद्धतीने पंचायतराज संस्थांकडे अधिकार, निधी आणि साधनसामृगीचे विकेंद्रीकरण केल्यास आपण विकसीत भारत देशाचे स्वप्न लवकरात लवकर साकार करु, असे त्यांनी सांगितले. मतदार नोंदणी, जनजागृती करण्याबरोबरच राज्यात विविध निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे यावेळी राज्यपालांनी कौतूक केले. पिंपरी चिचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती करण्यात आली होती. सन २०१२ च्या सार्वत्रिक निवडणूकी मध्ये ५४ टक्के मतदान झाले होते. तर सन २०१७ च्या निवडणूकीत त्यामध्ये वाढ होऊन ६५.३५ टक्के मतदान झाले. त्याची मार्गदर्शक पुस्तिका करण्याच्या सुचना निवडणूक आयोगातर्फे देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मतदार जनजागृती व निवडणूक कार्यप्रणालीच्या पुस्तिका तयार केल्या. त्या पुस्तिकांचे प्रकाशन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्य़ात आले.
ग्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामीण पंचायतराज संस्था अधिक सक्षम करु राज्यात ग्रामीण पंचायत राज संस्थांना महत्वपूर्ण अधिकारांचे 14 विषय, 102 योजना आणि 15 हजार 408 इतका कर्मचारी वर्ग हस्तांतरीत करण्यात आला आहे. उर्वरीत अधिकारांचे हस्तांतरण करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. हे हस्तांतरण लवकरात लवकर करुन राज्यातील ग्रामीण पंचायतराज संस्थांचे संपूर्ण सक्षमीकरण केले जाईल. राज्यातील 27हजार 900 ग्रामपंचायतींचे विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत. वित्त आयोगाचा 15 हजार कोटी रुपयांचा निधी राज्यातील ग्रामपंचायतींना थेट उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अशा विविध निर्णयातून ग्रामीण पंचायतराज संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया म्हणाले, शांत, पारदर्शक निवडणुका लोकशाहीच्या सक्षमीकरणास पुरक पंचायतराज संस्थांच्या निवडणुका शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यात राज्य निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या माध्यमातून पंचायतराज व्यवस्था अधिक बळकट होण्याबरोबरच आपली लोकशाही अधिक सक्षम होण्यास मदत झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदार नोंदणीचे प्रमाण मागच्या तुलनेत 70 टक्क्याने तर मतदानाचे सरासरी प्रमाण 11 टक्क्याने वाढले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या तसेच पंचायतराज विषयक विविध पुस्तकांचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
व्हीएस न्यूज - केंद्र सरकारने राष्ट्रीय युवा आयोगाची स्थापना करावी. याबाबत खासदार चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली देशभर युवकांचे संघटन करुन जनजागृती करण्यात येत आहे. या आयोगाच्या माध्यमातून देशभरातील युवकांना विशेषता मागासवर्गीय, दलित, आदिवासी समाजातील युवकांना उच्चशिक्षण, उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जावे. यासाठी सोशल मिडीयातून देखील चळवळ उभारण्यात येत आहे. अशी माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा समितीचे सदस्य आणि लोक जन शक्ती पार्टीचे प्रदेश युवा अध्यक्ष मोहन अनमोलू यांनी दिली.
पिंपरी येथे लोक जन शक्ती पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा समितीचे अध्यक्ष धुराजी शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना अनमोलू बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव सचिन जाधव, शहर महिला अध्यक्षा सरिता जामनिक, पुणे शहर सल्लागार सुनिल जामनिक, पिंपरी चिंचवड सचिव अरुण मैराळे, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष दत्ता गोडपे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष दिनकर ओव्हाळ, अतुल जगताप, राहूल गागडे, अभिषेक वानखेडे,लक्ष्मण शिंदे, आकाश शिंदे, राजेश इंगळे, ज्ञानेश्वर बोरकर आदी उपस्थित होते.
अनमोलू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, लोक जन शक्ती पार्टीचे संस्थापक आणि अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यकर्ते सर्व गरीब घटकांना अन्न पुरवठा सुरळीत व्हावा. तसेच सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केंद्र सरकारकडून दिला जाणारा निधी वापरला जावा यासाठी काम करीत आहेत. संसदीय बोर्ड समितीचे अध्यक्ष खासदार चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना त्यांच्या हक्काबाबत जागृत करण्याचे काम करीत आहे. सर्व शिक्षा अभियानासाठी केंद्र सरकारकडून दिला जाणारा निधी अनेक जिल्ह्यात वापरला जात नाही. तसेच पुणे, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातून स्वस्त धान्य दुकानदारांकडून गरीबांची पिळवणुक केली जाते. याबाबत अनेक तक्रारी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा समितीकडे आल्या आहेत. ग्रामिण भागातील स्वस्त धान्य दुकानदार शासनाकडून मिळालेले अन्नधान्य मद्य व वाईनरी उत्पादकांना, हॉटेल, ढाबा व्यवसायीकांना काळ्या बाजाराने विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत चौकशी करुन कारवाई करावी. अशी मागणी अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्याकडे केली आहे. लोक जन शक्ती पार्टी एनडीएतील उत्तर भारतातील मुख्य घटक पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची बैठक झाली. त्यानुसार लोक जन शक्ती पार्टीला देशभरातून लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी साठ जागा देण्याचे निश्चित झाले आहे. त्या अनुशंगाने महाराष्ट्रात पक्ष संघटना कामाला लागली आहे. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातून लोकसभेला युवा उमेदवार उभे करण्याचा पक्षाचा मानस आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मधून पक्ष बांधणीचे काम धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगाने सुरु आहे. असेही अनमोलू म्हणाले. स्वागत शहराध्यक्ष धुराजी शिंदे, सुत्रसंचालन सचिन जाधव आणि आभार अरुण मैराळे यांना मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड पॉलिटेक्नीक महाविद्यालयाला ‘सर्वेाकृष्ट विद्यार्थी चॅप्टर’ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
रिजनल इन्स्टिट्युट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि युएसटी मेघालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुवाहाटी, आसाम येथे घेण्यात आलेल्या 20 व्या आयएसटीई राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेत महाराष्ट्र आणि गोवा विभागातून पिंपरी चिंचवड पॉलिटेक्नीक विद्यालयाची प्रथम क्रमाकांसाठी निवड करण्यात आली.
नवी दिल्ली आयएसटीईचे अध्यक्ष प्रा. प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पॉलिटेक्नीक विद्यालयाच्या प्राचार्या व्ही.एस.ब्यकॉड आणि प्रा. व्ही.एस. खरोटे चव्हाण यांनी पारितोषिक स्विकारले. यावेळी प्रमुख पाहुणे युएसटीएम विद्यापीठाचे कुलगुरु एम. हक, उपकुलगुरु प्राध्यापक अमरज्योती चौधरी, आयएसटीईचे उपाध्यक्ष डॉ. बाबारंजन शर्मा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सचिव व्हि.डी. वैद्य, एआयसीटीईचे सल्लागार प्रा. डी. एन. मालखेडे आदी उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष 2016 - 17 मध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल महाराष्ट्र आणि गोवा विभागातून ‘सर्वेाकृष्ट विद्यार्थी चॅप्टर’हा पुरस्कार विद्यालयाला प्रथमच मिळाला आहे. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ.गिरीश देसाई, प्रशासकीय अधिकारी पद्माकर विसपुते यांनी विद्यालयाच्या प्राचार्या व्ही.एस.ब्यकॉड यांचे व प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002