व्हीएस न्यूज - टेलिनॉर इंडियातर्फे आपल्या महाराष्ट्र व गोव्यातील ग्राहकांसाठी नवीन अनलिमिटेड प्लॅन सादर करण्यात आला आहे. एसटीव्ही 143 यामध्ये अनेक वैशिष्टये असून त्यामध्ये अमर्याद लोकल व एसटीडी कॉल्स व 28दिवसांच्या वैधतेसह सर्व हॅंडसेटकरिता 2 जीबी हायस्पीड डेटा सेवा यांचा समावेश आहे. या योजनेमुळे टेलिनॉरच्या ग्राहकांना कॉल रेटची चिंता न करता आपल्या प्रियजनांशी संपर्कात राहता येणार आहे.
यावेळी बोलताना टेलिनॉरचे महाराष्ट्र व गोवा परिमंडलाचे व्यवसाय प्रमुख सुक्रीत मैत्रे म्हणाले की, ग्राहकांना किफायतशीर दरात उत्पादने उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असतो. आमच्या नव्या एसटीव्ही 143 या प्लॅनमुळे व्हॉइस आणि डाटाचे सर्वोत्तम फायदे ग्राहकांना मिळणार आहेत. ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा देण्यासाठी टेलिनॉर कटिबद्ध आहे. ग्राहकांना नव्या ऑफर्सचा लाभ नजीकच्या रिटेल आउटलेटमध्ये किंवा टेलिनॉर इंडियाच्या वेबसाईटद्वारे ऑनलाइन रिचार्ज करून घेता येईल. एसटीव्ही 143 हा प्लॅन टेलिनॉर इंडियाच्या मोबाईल ऍपवर उपलब्ध आहे.