व्हीएस न्यूज - बीआरटी मार्गावरून पादचारी व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मुंबईच्या आयआयटी संस्थेने उपस्थित केला होता. त्यानुसार शहरात सुरक्षित बीआरटी मार्गासाठी महापालिका सिग्नल व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणार आहे. याकरिता लवकरच एक संस्थेचे नेमणूक करणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपरी महापालिकेने महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, सत्तारुढ पक्षनेते, नगरसेवक, अधिका-यांसह आयुक्त श्रावण हर्डीकर हे शुक्रवारी (दि.3) अहमदाबाद दौऱ्यावरून परतले आहेत. याबाबत आयुक्त हर्डीकर म्हणाले की,अहमदाबाद बीआरटी प्रकल्प चांगला असून आपल्याकडेही जास्तीत जास्त सोयीस्कर बीआरटी राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत, शहरातील प्रमुख चार मार्गावर बीआरटी सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा शहरातील नागरिकांना होणार आहे. निगडी ते दापोडी मार्गावर बीआरटीचा चांगला प्रतिसाद मिळण्याचा विश्वास आहे.
मात्र, प्रवाशी व पादचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यासाठी पालिका वेगळा विचार करत आहे. सुरक्षाविषयक सुधारणा बीआरटी मार्गात करण्यात येणार आहेत. त्यानुसार या बीआरटी मार्गाचे नियोजन सुरू आहे. सुरक्षेच्या मुद्दयावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वर्ल्ड बॅंकेने पालिकेला परवानगी दिली आहे. या मार्गावर प्रवासी, नागरीक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच एक संस्था नेमली जाणार असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे आयुक्त हर्डीकर म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002