व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका हद्दीतील जमिनीवरील सर्व वृक्षांची गणना करण्यात येणार आहे. वृक्षांची सॅटेलाईटद्वारे गणना कामास 6 कोटी 46 लाख 83 हजार 814 रुपये खर्चास स्थायी समितीने 27 सप्टेंबर 2017 मान्यता दिली, मात्र अधिकाऱ्यांनी सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष दाखवून या रकमेत 29 लाख 58 हजार 904 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे वृक्ष गणनेचा एकूण खर्च 6 कोटी 76 लाख 42 हजार 718 रुपये होणारआहे. हा विषय स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व जमिनीवरील वृक्षांची गणना करणार आहे, जीआयएस, ईमेज सर्व्हर ऍप्लिकेशनद्वारे ही गणना होणार आहे. या वृक्ष गणनेला दोन वर्षे अवधी लागणार आहे. तर तीन वर्षेकालावधीत वृक्षांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी टेराकॉन इकोटेक प्रा. लि. संस्थेला 6 कोटी 46 लाख 83 हजार 814 रुपये खर्चाने ठेका देण्यास स्थायी समितीने 27 सप्टेंबरला मंजुरी दिली होती.
दरम्यान, सॉफ्टवेअरचे तांत्रिक दोषामुळे निविदेतील रक्कम फक्त एकाच नगाप्रमाणे दर दर्शविल्यामुळे निविदेच्या प्रत्यक्ष दरामध्ये 29 लाख 58 हजार 904 रुपये इतका फरक प्रत्यक्ष दिसून आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सदरील रकमेत वाढ करून एकूण 6 कोटी 76 लाख 42 हजार 718 रुपये खर्चास मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानुसार दर पाच वर्षांनी वृक्ष गणना करणे बंधनकारक आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने या आदेशाला हरताळ फासला आहे. 2004 नंतर अद्याप वृक्षगणना झालेली नाही. कागदोपत्री घोडे आणिनिविदा प्रक्रियेमध्येच शहरातील वृक्षांची गणना अडकली आहे. तब्बल तेरा वर्षांनी वृक्ष गणनेला मृहूर्त लागत असला तरी त्यालाही वाढीव खर्चाचे ग्रहण लागले आहे. 29 लाख 58 हजार रुपये महापालिकेला जादा मोजावे लागणारअसल्याने करदाते संताप व्यक्त करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002