व्हीएस न्यूज – अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा दोषी असतो. मराठा क्रांती मोर्चासाठी समाजाने एकत्रित यावे. एकजुटीच्या माध्यमातून पुढची पिढी नवीन इतिहास घडविण्याचे काम निर्माण होईल. तेच मोर्चाचे यश असेल, असे प्रतिपादन मावळचे आमदारसंजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत शालेय शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचा 2 नोव्हेंबर स्मृतिदिन आणि 8 नोव्हेंबर जन्मदिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे सोशल फाउंडेशनच्या वतीने देहूगाव येथील श्री शिवाजी चौकात प्रतिवर्ष व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. यंदाच्या 14व्या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प मराठा क्रांती मोर्चा-वाटचाल आणि दिशा या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे होते. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे नगरसेवक प्रवीण भालेकर, पिंपरी-चिंचवड पालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी उपसभापती नाना शिवले, पुणे जिल्हा परीषदेचे माजी सदस्य प्रशांत ढोरे, दिशा सोशल फांऊडेशनचे सचिन साठे, व्याख्यानमाला समितीचे राजेंद्र घावटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाचे राजकीय समीक्षक प्रा. डॉ. प्रकाश पवार, शिलेदार प्रवीण गायकवाड, विकास पासलकर, राजेंद्र कोंढरे यांनी छावा संघटनेचे समन्वयक आबा पाटील, फांऊडेशनचे प्रा. प्रवीण कदम, प्रा. सुनील भसे आणि उपस्थित श्रोत्याच्या प्रश्नांची उत्तरे देतपरिसंवाद साधला. आमदार भेगडे यांनी या व्याख्यानमालेला पूर्णवेळ देत परिसंवादात सहभाग घेतला. आमदार भेगडे यांना मोर्चाच्या सार्थकाबाबत परिसंवादामध्ये प्रश्न विचारले असता ते म्हणाले.अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा दोषी असतो. 30 वर्षाचीतपश्चार्या सहन करीत आलो आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने जनमाणसांत एक मोठी प्रतीमा निर्माण केली आहे. येणाऱ्या काळात आपण सकारात्मक दृष्टीतून पाहू.
आरक्षण किंवा विविध सवलतीचा प्रश्न असेल. मराठा समाजाने एकत्रित यावे. एकजुटीच्या माध्यमातून पुढची पिढी नवीन इतिहास घडविण्याचे काम निर्माण होईल. तेच मोर्चाचे यश असेल, असे प्रतिपादन आमदार भेगडे यांनी व्यक्त केले. दरम्यान लेखक नामेदव पवारयांच्या “मराठी क्रांती मोर्चा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम यांनी केले. संदीप शिंदे यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002