Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

व्हीएस न्यूज - बांधकाम साईटवर दुसऱ्या मजल्यावरून काम करताना मजुराचा तोल गेल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जयलाल बोनेला महतो (वय-38, रा. वाघीरे चाळ, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. राजकुमार लालबाबु पटेल (रा. ओव्हाळ वस्ती, पुनावळे गावठाण) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी हरीकिसान मेहता (वय32) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदार पटेल यांची पुनावळे येथे बांधकाम साईट सुरू आहे. याठिकाणी महतो मजुर म्हणून काम करत होते. बुधवारी ते दुसऱ्या मजल्यावर काम करताना त्यांचा तोल गेल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाला. कामगारांना सुरक्षितेची कोणतीच साधने न पुरविल्याबद्दल ठेकेदारावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
एटीएममध्ये बिघाड करून एसबीआय बॅंकेची दोन लाखांची फसवणूक

व्हीएस न्यूज - एटीएम मशीनच्या वीज पुरवठ्यामध्ये बिघाड करून चोरट्याने पैसे काढले. पैसे न मिळाल्याची ऑनलाईन तक्रार करून स्वतःच्या खात्यात बॅकेला पैसे जमा करण्यास भाग पाडून चोरट्याने भारतीय स्टेट बॅंक पिंपरी शाखेची दोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार बुधवारी उघडकीस आला. जयश्री अय्यर (वय-43, रा. रहाटणी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय स्टेट बॅंकेची पिंपरी येथे शाखा आहे. या शाखेशेजारील एटीएममध्ये एका चोरट्याने मशीनच्या वीज पुरवठ्यात 3 जुलै ते 17 ऑगस्ट 2017 या कालावधीत 18 वेळा तांत्रिक बिघाड केला. त्यानंतर पैसे काढून घेतले. पैसे न मिळाल्याची बॅकेकडे तक्रार करून पुन्हा स्वतःच्या खात्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडून 1 लाख 90 हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
व्यवसायाच्या वादातून टोळक्याने केली व्हिडीओ सेंटरची तोडफोड

व्हीएस न्यूज - शेजारचे व्हिडीओ सेंटरचा चांगला धंदा होत असल्याच्या रागातून दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने व्हिडीओ सेंटरची लाकडी दांडक्याने, तलवारीने तोडफोड केली. हा प्रकार मंगळवारी दुपारी चार वाजता काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

अजित दत्तात्रय मासाळ (वय-23), बालाजी हरिदास कांबळे (वय-35), बळीराम ऊर्फ भैय्या श्रीधर मासाळ (वय22, सर्व रा. रूपीनगर, निगडी यांना अट केली असून त्याचे 7 ते 8 साथीदार फरार आहेत. याप्रकरणी सचिन पोळ (वय-38, रा. हडपसर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपींचे काळेवाडीतील आठवण चौकात व्हिडीओ सेंटर आहेत. फिर्यादीचे व्हिडीओ सेंटर चांगले चालत असून आपला धंदाच होत नसल्याच्या राग आरोपींना होता. या कारणावरून मंगळवारी दुपारी दहा ते अकरा जणाच्या टोळक्याने फिर्यादीच्या व्हिडीओ सेंटरमध्ये घुसून लाकडी दांडक्याने, तलवारीने 10 व्हिडीओ गेम मशिन, सीसीटीव्ही, एलसीडी व काऊंटरची तोडफोड केली. कामगार अशोक माने याला धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्याचे साथीदार फरार आहेत. सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. घोळवे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
महापालिकेच्या स्वच्छता अभियानात ज्येष्ठ नागरिक संघाचा सहभाग

व्हीएस न्यूज – पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित विविध उपक्रमात जेष्ठ नागरिक महासंघ सहभागी होणार आहे. तसेच, स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याबरोबरच स्वच्छता रॅलीतसहभाग घेतली, अशी माहिती पिंपरी- चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कोळी यांनी दिली. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याबाबत जेष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत संत तुकाराम नगर येथील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी “क” क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, डी.सी.एफ. च्या अनुपमा शास्त्री, जेष्ठ नागरिक महासंघाचे सरचिटणीस सुर्यकांत मुथियान, सहाय्यक आरोग्याधिकारी बी.बी.कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक रमेश भोसले यांच्यासह जेष्ठ नागरिक महासंघाचे सुमारे २०० पदाधिकारी सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड शहर हे स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. स्वच्छता अॅप मोबाईलवर डाऊनलोड करून आपल्या भागातील स्वच्छता विषयक समस्या निदर्शनास आणून दिल्यास त्यावर महापालिकेच्या वतीने कार्यवाही केली जाईल. येत्या १६ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या सहकार्याने स्वच्छता विषयक जनजागृती रॅली काढण्यात येणार असून त्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. स्वच्छता अॅप बाबतची माहिती सहाय्यक आरोग्याधिकारी बी.बी. कांबळे व मुख्य आरोग्य निरीक्षक रमेश भोसले यांनी दिली.

...Read More

V. S. News
राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरीत जल्लोष

व्हीएस न्यूज - राहुल गांधी यांची आखिल भारतीय काँग्रेस समिती च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण पिंपरी विभागाच्यावतीने लाडू वाटप करून जल्लोष करण्यात आला. तसेच कवी आवेश हिन्दुस्तानी द्वारा राहुल गांधी यांच्यावर लिहिलेली कवितेचे वाचन झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे, महासचिव अशोक मंगल, जेष्ठ काँग्रेस नेता बारस्कर, पिं. चिं. काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष उमेश बनसोडे, प्रवक्ता आयुष मंगल, रवी अगरवाल, मिताली चक्रवर्ती, राजेश नायर, अर्जुन शिवाजी गायकवाड, सन्मुख आयगुले, सौ. निंबर्गीकर, पार्वती बनसोडे, शिवलिंगा बनसोडे उपस्थित होते.

...Read More

V. S. News
पुण्यात तरूणीवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

व्हीएस न्यूज - पुण्याच्या कोंढवा परिसरात एका २३ वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही तरूणी येरवडा परिसरात वास्तव्याला होती. घरच्यांशी कडाक्याचे भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात ही तरूणी रात्रीच्यावेळी घरातून बाहेर पडली. यावेळी तिने नातेवाईकांकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. मात्र, रिक्षाचालकाने रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणीही नसल्याचा फायदा घेत तिला निर्जनस्थळी नेले. याठिकाणी त्याने आपल्या दोन मित्रानांही बोलवून घेतले. त्यानंतर या तिघांनी मिळून या मुलीवर बलात्कार केला. या घटनेमुळे कोंढवा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सतीश जयपाल माने (वय २३) आणि मारुती शिंदे (वय ३१) या दोन नराधमांना सिद्धार्थनगर येथून अटक केली. तर आणखी एकजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेऊन दारू पाजली. त्यानंतर बळजबरीने शरीरसंबंध ठेवायला भाग पाडले. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास ठार मारु अशी धमकीही दिली. बलात्कार केल्यानंतर आरोपींना आपल्याला कॅम्प परिसरातील एम जी रोडवर सोडून दिल्याचे तरूणीने तक्रारीत म्हटले आहे.

...Read More

V. S. News
उद्योगांसाठी युवकांना सक्षम बनविणे आवश्यक - शमिम हवा

व्हीएस न्यूज - देशातील युवक हे भारताचे भविष्य आहे. देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी युवकांना सक्षमपणे स्वत:च्या पायावर उभे करणे आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या युवकांना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनाची आणि संसदीय बोर्ड समितीचे अध्यक्ष खासदार चिराग पासवान सारख्या युवा नेतृत्वाची गरज आहे. असे प्रतिपादन लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष शमिम हवा यांनी केले.

लोक जनशक्ती पार्टी (युवा) पिंपरी चिंचवड शाखेचे शहराध्यक्ष धुराजी राणुजी शिंदे यांनी शनिवारी (दि. 9 डिसेंबर) पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शमिम हवा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष धुराजी शिंदे, युवा प्रदेश अध्यक्ष मोहन अनमोलू, प्रदेश सचिव सचिन जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत म्हस्के, कायदा सल्लागार ॲड. सुनिल जामनिक, शहर महिला अध्यक्षा सरिता जामनिक, उपाध्यक्षा शोभा वाळके, कार्याध्यक्ष दत्ता गोडसे, शहर प्रवक्ता चंद्रशेखर गायकवाड, शहर सचिव अरुण मैराळे, दिनकर ओव्हाळ, अनिल मखरे, सुभाष विद्यागर, डॉ. काशीनाथ बामणे, विनु वर्गिस, विनायक ओव्हाळ, कमल पारडे, सुमित बांबळ, कांचन जावळे, राहुल प्रधान, जावेद शेख आदींसह शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शमिम हवा मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला लोक जनशक्ती पार्टी हा पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक अन्न धान्य व वितरण व्यवस्थेमार्फत राज्यातील ग्रामिण गोरगरिब जनतेला सुरळीत स्वस्त धान्य पुरविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. तसेच युवा खासदार चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनखाली सुशिक्षित बेरोजगार युवकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध अर्थ सहाय्य योजनेतून उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मदत करण्यात येत आहे. लोक जनशक्ती पार्टी हा पक्ष राज्यातील गोरगरिब जनतेला, युवकांना, दलित, आदिवासींना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शहरी भागातील सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरातील पहिला कार्यकर्ता मेळावा अध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे. तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन रामविलास पासवान यांचे विचार व धोरणे जनते पर्यंत पोहचविण्यासाठी धुराजी शिंदे प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय युवा आयोगाची स्थापना करावी. याबाबत खासदार चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली देशभर युवकांचे संघटन करुन जनजागृती करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात लोजपा आपले उमेदवार उभे करण्यासाठी संघटना बांधणी करीत आहे. असे शमिम हवा यांनी सांगितले. स्वागत शहराध्यक्ष धुराजी शिंदे, सुत्रसंचालन दिनकर ओव्हाळ आणि आभार अरुण मैराळे यांना मानले.

...Read More

V. S. News
पुण्यात सनबर्न फेस्टिवलवरुन पुन्हा एकदा रण पेटले

व्हीएस न्युज - पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलवरुन पुन्हा एकदा रण पेटले आहे. पुण्यात सनबर्न फेस्टिव्हल होणार की नाही? याचे उत्तर आज मिळणार आहे.बावधन परिसरातील नागरिकांनी सनबर्नला विरोध केला, तसेच नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलचे संचालक रतन लथ यांनी याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.

थोड्याच वेळात सनबर्नच्या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू खेमकर आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल.
आधी सनबर्न फेस्टिवल पिंपरी चिंचवड परिसरातील मोशीमध्ये होणार होता. मात्र तिथल्या स्थानिकांनी विरोध केल्याने ठिकाण बावधनला हलवण्यात आले.
दरवर्षी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते.
देशातील आघाडीचे गायक आणि डीजे आर्टिस्ट यांच्या लाईव्ह परफॉर्मन्समुळे तरुणाईमध्ये सनबर्नच मोठे आकर्षण आहे. मागील नऊ वर्षे सनबर्न गोव्यामध्ये आयोजित होत होता, त्यानंतर गेल्या वर्षी तो पुण्यातील केसनंद या गावात झाला होता.

...Read More

V. S. News
खासदारांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये,आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच नाशिकफाटा ते चांडोली रस्ता सहापदरीकरण्याची मान्यत - एकनाथ पवार

व्हीएस न्युज - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली (खेड) रस्ता सहापदरीकरण या २९.९३ कि.मी. लांबीच्या १०१३.७८ कोटी रकमेच्या कामास भाजप सरकार आणि आमदार महेश लांडगे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे मान्यता मिळाली आहे. खासदारांनी त्याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, असा पलटवार पिंपरी पालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केला आहे.


पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली(खेड) रस्ता सहापदारीकरण या २९.९३ कि.मी. लांबीच्या १०१३.७८ कोटी रकमेच्या कामास आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाल्याचा, दावा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत केला होता. तसेच काँग्रेस सरकारच्या काळात महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या परवानगी मिळण्याबाबत प्रक्रिया सुरु केली होती, असे सांगितले. त्याला सभागृह नेते एकनाथ पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ पवार म्हणाले, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली(खेड) रस्ता सहापदारीकरण या २९.९३ कि.मी. लांबीच्या १०१३.७८ कोटी रकमेच्या कामास केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. नितीन गडकरी भाजपचे नेते आहेत. आमदार महेश लांडगे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे या कामासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. त्यामुळे नाशिकफाटा ते चांडोली (खेड) रस्ता सहापदारीकरणास महेशदादांच्या पाठपुराव्यामुळेच मान्यता मिळाली आहे. खासदार आढळरावांनी त्याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे ते बिथरले आहेत.

शिवसेना सरकारमध्ये आहे की विरोधात हेच कळत नाही. खासदार आढळराव वारंवार सरकारवर टीका करत असतात. मग, सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय घेण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महापौर नितीन काळजे म्हणाले, “आमदार महेश लांडगे तीन वर्षांपूर्वी स्थायी समितीचे सभापती होते. त्यांनी त्यावेळीच पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावराचा ‘डीपीआर’ तयार केला होता. मात्र, खासदार शिवाजीराव आढळराव यांनी राष्ट्रीय महामार्गाची परवानगी मिळवून दिली नाही. त्यासाठी खो घालण्याचे कामच त्यांनी केले. महेशदादांनी आमदार झाल्यानंतर नाशिकफाटा ते चांडोली या रस्त्याचे सहापदरीकरण व्हावा, यासाठी पाठपुरावा केला”

“गेल्या चार वर्षांपासून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे ते पाठपुरावा करत होते. याबाबत गडकरी साहेबांकडे वारंवार बैठका झाल्या. गडकरी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अथक पाठपुराव्यानंतर १४ जानेवारी २०१६ रोजी या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला आहे. आढळराव केवळ खोटे-नाटे आरोप करण्यात दंग आहेत.”
...Read More

V. S. News
दुस-याच्या नावाचा पासपोर्ट वापरुन भारतात वास्तव्य करणारा नायजेरीअन तरुण ताब्यात

व्हीएस न्युज - दुस-या व्यक्तीच्या नावाने पासपोर्टद्वारे भारतात वास्तव्य करणा-या नायजेरीयन तरुणा विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


ओकुबा किंगस्ले एबुका असे या तरुणाचे नाव असून तो पिंपळे गुरव येथे वास्तव्य करत होता. त्याने 6 ते 13 डिसेंबरच्या दरम्यान मायदेशी जाण्यास प्रयत्न सुरु केले. यावेळी केल्या जाणा-या पोलीस चौकशी व प़डताळणीच्या वेळी तो दुस-याच कोणाच्या तरी नावाचा पासपोर्ट वापरत असल्याचे समोर आले. तसेच त्याच्या व्हीजाची तारीख ही संपली होती.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या मैत्रीणीच्या वैद्यकीय उपचारासाठी भारतात आल्याचे त्याने सांगितले. यावेळी त्याच्या मैत्रीणीचा पासपोर्ट व व्हीजा पात्र असल्याने तिला नायजेरीयाला जाण्यास परवानगी देण्यात आली. मात्र संबंधीत तरुणाला सांगवी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सध्या पुणे परिसरातही गुन्हेगारी क्षेत्रात नायजेरीया, बांग्लादेश, इराण सारख्या देशातील तरुणांचा मोठा हात असल्याचे उघड होत असताना प्रशासनाने अशा परकीय नागरिकांचे वास्तव्य, पासपोर्ट आदीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
...Read More

V. S. News
भारतीय सैन्याला सलाम करण्यासाठी 'मराठा वॉरियर्स टीम’ची पुणे ते वाघा बॉर्डर सायकल मोहीम

व्हीएस न्युज - भारतीय सैन्याला सलाम करण्यासाठी ‘मराठा वॉरियर्स’ची सायकलवारी पुणे ते वाघा बॉर्डरला रवाना झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत या दहा धाडसी तरूणांच्या टीमचा आज सकाळी सायकल प्रवास सुरू झाला.


‘मराठा वारियर्स’मध्ये राम फुगे, निलेश धावडे, विश्वास काशिद, प्रज्ञेश मोळक, प्रशांत जाधव, संतोष दरेकर, बजरंग मोळक, विजय हरगुडे, संदीप शिंदे व आठ वर्षीय अंशुमन धावडे अशा या ध्येयवेड्या तरुणांचा मोहिमेत सहभाग आहे.

भोसरीतील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथून या सायकलवारीचा शुभारंभ झाला. खासदार छत्रपती संभाजीराजे, महापौर नितीन काळजे, माजी आमदार विलास लांडे, शेकापचे नेते प्रविण गायकवाड, पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेविका भीमाताई फुगे, विनया तापकीर, उद्योजक कार्तिक लांडगे, पवना सहकारी बँकेचे संचालक शामराव फुगे, कामगार नेते हनुमंत बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठा वॉरियर्सचे प्रमुख राम फुगे म्हणाले की, प्रत्येक वेळी काही तरी नवीन करायचं ठरवलं होत. ३ वर्षापूर्वी पुणे ते सिंगापूर बाईकवर प्रवास केलाय. तसेच पुणे ते लेह लद्दाख प्रवास केलाय. ध्येय गाठतोय त्याचं खूप समाधान आहे. मराठी माणसं सैन्यात मोठ्या पदावर पोहचली पाहिजेत त्यासाठी या प्रवासा दरम्यान संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे. तब्बल २ हजार किलो मीटरचा २१ दिवसांचा हा प्रवास आहे. या मोहिमेसाठी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी चालू होती. त्यात फिटनेसवर विशेष लक्ष दिले.

मराठा वारियर्स या समुहाने सीमेवर लढा देणाऱ्या भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व पंजाब अशा ४ राज्यातून १८ दिवस प्रवास करुन हे १० सायकलस्वार २ हजार किमी अंतर पूर्ण करणार आहेत. या तरुणांच्या मार्गावर येणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील तरुणांना ‘भारतीय लष्कारामधील संधी’ यावर प्रबोधन कराणार आहेत. याच बरोबर सायकल व आरोग्याचे महत्त्व पटवून देणार आहेत.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!