व्हीएस न्युज - पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार आहे. पुणे मेट्रोचे काम निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी, आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे आमदार लांडगे यांनी सांगितले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती केली. याबाबतच्या मागणीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिले.
महाराष्ट्र राज्य डेन्टल असोसिएशनच्या राज्य परिषदेचा चिंचवडमध्ये समारोप
व्हीएस न्यूज - 'पल्प स्टेमसेल्स'चा वापर ज्या पध्दतीने वैद्यक शास्त्रात होतो. त्याच प्रमाणे 'डेन्टल पल्प स्टेमसेल्स' चा वापर डायबेटीस, न्युरॉलॉजी अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी होऊ शकतो. या उपचार पध्दतीला अद्याप शासनाची मान्यता मिळालेली नाही. आयडीए आणि त्यांच्या संलग्न संस्थांनी या उपचार पध्दतीस मान्यता मिळविण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही डॉ. एस. शंकरनारयणन यांनी व्यक्त केली.
चिंचवड येथे आयोजित केलेल्या इंडियन डेन्टल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य डेन्टल असोसिएशनच्या 56 व्या राज्य परिषदेच्या समारोप सत्रात 'टिश्यू इंजिनिअरिंग ॲण्ड सेल बेस थेरपी इन डेन्टिस्ट्री' या विषयावर डॉ. शंकरनारायणन यांची वायसीएम रुग्णालयाचे दंत विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे व डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालयाच्या डॉ. सुप्रिया खेऊर यांनी प्रकट मुलाखत घेतली. डॉ. शंकरनारायणन यांनी दंतवैद्यकीय शास्त्रामध्ये नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून नवीन उपचार पध्दती विकसित केली आहे. सामान्यपणे दातांवरील शस्त्रक्रिया करत असताना अजूनही काही पारंपरिक पध्दतींचा वापर केला जातो. ज्या पध्दतीने अन्य वैद्यकीय क्षेत्रांमध्ये नवीन संशोधन करून उपचार पध्दतींमध्ये 'मेडी-इंजिनिअरिंग' चा वापर करून अवघड शस्त्रक्रिया कमी वेळेत व कमी खर्चात केल्या जातात. अशाच पध्दतीने दंत वैद्यकीय शास्त्रातील उपचार पध्दतींमध्ये देखील संशोधनाव्दारे नाविन्यपूर्ण कल्पना, उपचार पध्दती विकसित करण्याची गरज असल्याचे डॉ. शंकरनारायणन यांनी स्पष्ट केले.
मनुष्यावर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करताना आवश्यकता असल्यास आपली त्वचा, रक्तपेशी, केस आदींचा वापर केला जातो. दंतवैद्यक शास्त्रामध्ये रुग्णांच्या दातांवर शस्त्रक्रिये वेळी दाताच्या गाभ्यातील पेशी तयार करण्यासाठी'डेन्टल पल्प स्टेमसेल्स'चा वापर करता येऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ दंत वैद्य प्रा. डॉ. एस. शंकरनारायणन यांनी व्यक्त केले. या नव्याने विकसित केलेल्या उपचार पध्दतीस शासनाने लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी इंडियन डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक, सचिव डॉ. अशोक ढोबळे, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील, सचिव डॉ. नितीन बर्वे, ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर माऊली फरांदे, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद वाघमारे, सचिव डॉ. मनिषा गरुड, डॉ. राकेश प्रसाद, डॉ. अभिजीत फरांदे, डॉ. मनिष फरांदे, डॉ. श्रीकांत गर्जे, डॉ. संदीप भिरूड, डॉ. निखिल दिवाण, डॉ. जुई तुपे, डॉ. दिपाली पटेकर, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. अमित पाटणकर, डॉ. सचिन कोचेकर आदींसह राज्यभरातून आलेले शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – अखिल भारतीय सफाई मजदुर कॉंग्रेस कामगार संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. सुधाकरन पणीकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर व संबंधित अधिकारी यांच्या समवेत सोमवार दि.११ डिसेंबर २०१७ रोजी आढावा बैठक घेतली.
आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस आरोग्य कार्यकारी अधिकारी विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कार्यकारी अभियंता देवाअण्णा गट्टुवार, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, रमेश वस्ते, सहाय्यक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे, कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, अखिल भारतीय सफाई मझदूर कॉग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष संतोषकुमार नायडू, उपाध्यक्ष प्रेमचंद चनाल, राजू परदेशी, कार्याध्यक्ष राजू खैरे, सरचिटणीस दिलीप मोटा, कायदा सल्लागार अँन्थोनी बनसोडे, सदस्य राजेश टक्कले, सुरेश जाधव, रमेश विटकर, बबन छजलाने, रेखा सरपटा, शांताराम बाल्मिकी, अजय चव्हाण, भारत
आवडे आदी उपस्थित होते. या बैठकीत लाड समितीच्या शिफारसीनुसार मिळणा-या सुविधा व त्यांची अंमलबजावणीबाबत, सफाई कामगारांची रिक्त पदे भरणेबाबत, सफाई कर्मचारी यांना शासकीय सुट्टीच्या दिवशी काम केल्याबद्दल दिडपट वेतन अदा करणेबाबत, सुधारीत आश्वासित प्रगती योजने अंतर्गत पहिला व दुसरा लाभ मंजुर करताना शैक्षणिक अहर्ता व जात पडताळणी अट शिथिल करणेबाबत, सफाई कर्मचारी यांना घरे बांधून देणेबाबत, वैद्यकीय विभागातील कर्मचारी यांना शनिवारचे दिवशीचे कामकाज वेळेबाबत,आजारी असलेल्या कर्मचारी यांचे बदली बाबत, सफाई कर्मचारी तक्रार निवारण समितीचे पुनर्गठन करण्याबाबत तसेच तदअनुषंगिकमहानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत माडण्यात आलेल्या सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत लवकर कार्यवाही करणेबाबत डॉ. सुधाकरन पणीकर यांनी मागणी केली. तसेच महापालिकेने सफाई कर्मचा-यासंबंधी केलेल्या इतर कामांबाबत समाधान व्यक्त केले.
व्हीएस न्यूज - कर्तव्य रजा मंजूर केली नाही म्हणून विशेष कार्य अधिकार्याने वायसीएम रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकाला धमकी दिल्याच्या निषेधार्थ कर्मचा-यांनी आज रुग्णालयासमोर आंदोलन केले.
कर्तव्य रजा मंजूर केली नाही म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. पद्माकर पंडित यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांना शुक्रवारी (दि.८) धमकी दिली होती. ‘माझी पोहोच खूप वरपर्यंत आहे, मी तुम्हा सगळ्यांना बघून घेईल’. माझ्या नादाला लागाल तर मी सगळ्यांची वाट लावीन, अशी धमकी दिली होती. याबाबत डॉ. देशमुख यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच डॉ. पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. दोन दिवस महापालिकेला सुट्टी होती. त्यामुळे धमकी प्रकरण शांत होते. सोमवारी कामकाज सुरु होताच वायसीएमएचच्या रुग्णालयातील डॉक्टर,कर्मचा-यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर काही काळ आंदोलन केले.
व्हीएस न्यूज - चिंचवड येथील औद्योगिक शिक्षण मंडळ संचलित कॉलेज ऑफ कॉमर्स-सायन्स ॲन्ड इंफर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (सीएसआयटी) वतीने आयोजित केलेल्या “रन फॉर पिस ॲन्ड युनिटी ऑफ इंडिया” या मिनी मॅरेथॉनमध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पावणेपाच किलोमीटरच्या या स्पर्धेत रोहित मगदूम याने प्रथम क्रमांक पटकविला.तर सचिन शिंगोडे, गजानन पाल हे अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांकावर राहिले.
कार्यक्रमाचे उदघाटनप्रसंगी नगरसेवक नामदेव ढाके, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस निरीक्षक डी.के म्हसे, प्राचार्य डॉ. के.एम जाधव, क्रीडा शिक्षक सावित्री मांढरे आदी उपस्थित होते. यावेळी उपनिरीक्षक अंतरकर यांनी विद्यार्थ्यांना शांतता व एकात्मतेविषयी शपथ दिली.
नामदेव ढाके म्हणाले कि, युवक हे देशाचे भविष्य आहे. युवकांनी देशाच्या विकासात योगदान द्यावेत. देशांत युवकच परिवर्तन घडवून आणू शकतात. क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून समाजात एकात्मता टिकविण्याचे कार्य होत आहे. क्रीडा उपक्रमातून विकास घडावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आयबीएमआरचे प्रवेशद्वार ते मोरवाडी कोर्ट-आयुक्त बंगाला पुन्हा आयबीएमआर कॉलेज या मार्गाने विद्यार्थी धावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूरी भाटीया तर आभार प्रिया जंजलवार यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महामेट्रोचे दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना, अडथळा ठरणारे वृक्ष काढणे भाग पडत आहे. या वृक्षांचे नुकसान होऊ नये, या करिता वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. परंतू या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची जबाबदारी महामेट्रोच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतली आहे. प्रायोगिक तत्वावर वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. या ठिकाणी ४० वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे उपव्यवस्थापक भानुदास माने यांनी दिली.
एसटी आगाराच्या आवारात सकाळी प्रायोगिक तत्वावर दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. सर्वसाधारणपणे केले जाणारे पुनर्रोपण आणि जागतिक स्तरावर मान्य केलेले वृक्ष पुनर्रोपण अशा दोन पद्धतीचा अवलंब केला आहे. पुनर्रोपण केलेले वृक्ष १०० टक्के जगतील याची दक्षता घेतली जाणार आहे. पिंपरी चिंचवड परिसरात किमान तीन आणि पुणे परिसरात किमान ३ हजार वृक्षांचे रोपण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. आळंदी-दिघी येथेही वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. पिंपरी ते हॅरिस पुलापर्यंत १३५ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे. प्राधिकरणाने आकुर्डी येथे पाच एकर क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे. तेथे १२५ वृक्षलागवड केली जाईल. एकूण ६०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. मेट्रो मार्गावर तीन ते चार वर्षापूर्वीची २०० झाडे आहेत. त्यातील मार्गात अडथळा ठरणाऱ्या ६० वृक्षांचे पिंपरीतील गुलाबपुष्प वाटिकेत पुनर्रोपण केले आहे.
जिल्हा प्रशासनाला यूआयडीएआयकडून ५० यंत्रे
व्हीएस न्यूज – पुढील आठवडय़ापासून केवळ आधारकार्डमधील दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी अपडेट क्लायंट लाइफ किट (यूसीएल) वापरण्याकरिता जिल्हा प्रशासनाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ही ५० यंत्रे दोन-तीन दिवसांत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडीएआय) जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहेत. ही सर्व यंत्रे महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बसवण्यात येणार आहेत. या यंत्रांद्वारे केवळ एका बोटांच्या ठशावरून पाच मिनिटांत आधारकार्डमधील दुरुस्ती करण्यात येणार आहे.
गेल्या चार महिन्यांपासून आधार केंद्रांचा गोंधळ सुरू झाल्यामुळे आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शहर आणि जिल्ह्यातील आधार केंद्रांवर येणारे बहुतांश नागरिक आधारकार्डात जन्म दिनांक, मोबाईल क्रमांक, निवास पत्ता, छायाचित्र याबाबत दुरुस्ती करण्यासाठी गर्दी करत आहेत. एका आधार यंत्रावर एका व्यक्तीची आधार नोंदणी किंवा दुरुस्तीचे काम करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यानुसार सकाळी दहा ते सहा या वेळेत केवळ २० ते २५ आधारची कामे होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आधार दुरुस्तीकरिता यूआयडीएआयकडे यूसीएल यंत्रांची मागणी प्रस्ताव पाठवून केली होती. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून ५० यूसीएल यंत्र तीन दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे येणार आहेत.
या यंत्रांद्वारे एका बोटाचा ठसा घेऊन पाच मिनिटांमध्ये दुरुस्ती करता येते. एका यंत्राद्वारे प्रतिदिन ७० ते ८० आधार दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बुब्बुळांचे स्कॅनिंग होत नसल्यास संबंधित नागरिकांची नोंद करून त्याबाबतची पावती यूआयडीएआयकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आधारचे नोडल अधिकारी आणि तहसीलदार विकास भालेराव यांनी दिली.
यूसीएल डिव्हाइस काय आहे?
अपडेट क्लायंट लाइफ (यूसीएल किट) हे एक बायोमॅट्रिक डिव्हाइस आहे. या डिव्हाइसला लॅपटॉप आणि प्रिंटर जोडावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात पन्नास यूसीएल यंत्र येणार असून महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात पाच यंत्र बसविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. आधारची दुरुस्ती करताना छायाचित्राचे ओळखपत्र आणि पत्ता पुरावा आवश्यक आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002