व्हीएसन्युज - पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलवरुन पुन्हा एकदा रण पेटले आहे. पुण्यात सनबर्न फेस्टिव्हल होणार की नाही? याचे उत्तर आज मिळणार आहे.बावधन परिसरातील नागरिकांनी सनबर्नला विरोध केला, तसेच नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलचे संचालक रतन लथ यांनी याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.
थोड्याच वेळात सनबर्नच्या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू खेमकर आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल.
आधी सनबर्न फेस्टिवल पिंपरी चिंचवड परिसरातील मोशीमध्ये होणार होता. मात्र तिथल्या स्थानिकांनी विरोध केल्याने ठिकाण बावधनला हलवण्यात आले.
दरवर्षी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते.
देशातील आघाडीचे गायक आणि डीजे आर्टिस्ट यांच्या लाईव्ह परफॉर्मन्समुळे तरुणाईमध्ये सनबर्नच मोठे आकर्षण आहे. मागील नऊ वर्षे सनबर्न गोव्यामध्ये आयोजित होत होता, त्यानंतर गेल्या वर्षी तो पुण्यातील केसनंद या गावात झाला होता.