Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
भीम अॅप यूजर्सना आजपासून मिळणार कॅशबॅक

व्हीएस न्यूज - आजपासून म्हणजे १४ एप्रिल आंबेडकर जयंती दिवसापासून भीम अॅपचा वापर करणाऱ्यांना कॅश बॅकचा लाभ मिळणार असून आजपासून बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित भीम अॅपवर आकर्षक कॅश बॅक योजनेची सुरुवात होणार आहे. ग्राहकांना भीम अॅपच्या कॅशबॅक ऑफरमध्ये एका महिन्यात ७५० रुपये आणि व्यापाऱ्यांना एका महिन्यात १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकते. BHIM म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी (Bharat Interface For Money) भारत सरकारच्या नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे संचालित केले जाते. केवळ २ एमबीच्या या अॅपला काही सेकंदामध्ये Android किंवा आयफोनमध्ये डाउनलोड केले जाऊ शकते. या अॅपचे असे डिजाईन तयार केले गेले आहे, की पहिल्यांदा वापर करणाराही हे अॅप चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. भीम अॅप वापर करण्यासाठी आवश्यक आहे, तुमचे बँक खाते नंबर तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेले असणे.

...Read More

V. S. News
सुपरमॉम मेरी कोमचा राष्ट्रकुलमध्ये ‘सुवर्ण’पंच

व्हीएस न्यूज - भारतीय बॉक्सर मेरी कोमने ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली असून भारताचे बॉक्सिंगमधील आणि मेरीचे राष्ट्रकुल स्पर्धांमधील हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. काल भारतीय बॉक्सर्सनी कांस्यपदकाची कमाई केल्यानंतर सुवर्णपदक मिळवत मेरी कोमने भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक टाकले आहे. महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने देखील ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील तेजस्विनीचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. तेजस्विनीने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात विक्रमी गुणांची नोंद करत पदकांच्या शर्यतीत भारताचे तिसरे स्थान कायम राखले आहे. ४५७.९ गुणांची कमाई करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तेजस्विनीने मागे सोडले. तेजस्विनीने काल ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती.

...Read More

V. S. News
काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान करण्याची एक संधी सोडली नाही – नरेंद्र मोदी

व्हीएस न्यूज – काँग्रेसने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यात कोणतीच कसर सोडली नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यांनी हे वक्तव्य नवी दिल्लीतील अलीपूर रोडवर डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उद्घाटनावेळी बोलताना केले आहे. इतिहासातून डॉ बाबासाहेब यांच्या सर्व आठवणी पुसल्या जाव्यात यासाठी काँग्रेसने पुरेपूर प्रयत्न केले. हे कठोर सत्य असून बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जिवंत होते तेव्हा काँग्रेसने त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नसल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. त्यांच्याकडे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारने पूर्ण दुर्लक्ष केले, त्याचबरोबर मंत्रिमंडळातून त्यांना राजीनामा द्यायला लावल्याचेही यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात एकाही कॅबिनेट समितीत सहभागी करुन न घेण्यात आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. देशाच्या इतिहासात बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख नसावा यासाठी काँग्रेसने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली. काँग्रेसला माझे आव्हान आहे की, बाबासाहेबांसाठी त्यांनी केलेले एक काम तरी सांगावे. काँग्रेसने त्यांच्या आदरार्थ एक तरी काम केले आहे का ?, असा प्रश्न मोदींनी यावेळी विचारला. मोदींनी पुढे बोलताना सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लोकसभा निवडणूक लढणार होते तेव्हा काँग्रेसने त्यांचा पराभव करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली. बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी जोरात प्रचार केल्याचा आरोपही मोदींनी केला.

...Read More

V. S. News
राज ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार ‘कृष्णकूंज’वर

व्हीएस न्यूज - आज सकाळी ११ च्या सुमारास मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांच्या कृष्णकूंज या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान मागील काही काळापासून राज ठाकरे भारतीय जनता पक्षावर खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले असल्यामुळे भाजप व राज ठाकरे यांच्यात कटुता निर्माण झाली होती. शेलार यांनी त्यामुळे राज यांची आज कशासाठी घेतली याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे. मुंबई भाजपचे नेते कधीकाळी शिवसेनेला शह देण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेला पाठबळ देत होते. खासकरून शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि आशिष शेलार यांचे राज ठाकरेंशी सख्य होते. पण राज यांनी नंतर मोदी-शहांवर हल्लाबोल सुरू केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंपासून अंतर राखले होते. पण आजच्या भेटीचे औचित्य काय आहे हे अद्याप समोर आले नाही. कदाचित याबाबत दोन्ही पक्षाकडून स्पष्टीकरण काही वेळात दिले जाऊ शकते.

...Read More

V. S. News
फसवी आहे एअरटेलची जाहिरात, उच्च न्यायालयाचा निर्णय

व्हीएस न्यूज - दिल्ली उच्च न्यायालयाने एअरटेल कंपनीला चपराक लगावली असून एक विशिष्ठ प्लॅन एअरटेलच्या ग्राहकांना घेतल्यामुळे आयपीएलचे सामने मोबाईलवर मोफत पाहता येतील, अशी जाहिरात करणे चुकीचे असल्याहा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. जिओने एअरटेलच्या या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यावर जिओच्या बाजूने निर्णय दिला असून आता एअरटेल त्यांच्या जाहिरातीत बदल करणार आहे. क्रिकेट सीझन पॅकबाबत एअरटेलची दिशाभूल करणारी जाहिरात असून प्लॅन घेतल्यावर आयपीएलचे सामने मोफत पाहता येतील असे या जाहिरातीत सांगण्यात आले आहे. पण पण डेटाचे पैसे भरावेच लागतील, हे जाहिरातीत सांगितले गेले नाही. जिओने ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली.

...Read More

V. S. News
जगातील सर्वात महागडी स्कूटी भारतात होणार लॉन्च

व्हीएस न्यूज - आता भारतामध्ये ब्रिटनमधील प्रसिद्ध कंपनी स्कोमादी पाऊल ठेवणार असून आपली टू-व्हीलर स्कूटी स्कोमादी भारतात लाँच करणार आहे. ही कंपनी लम्ब्रेटा जीपी स्टाईल मॉडल बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध असून ही कंपनी टीएल २००, टीएल२००i, टीएल५०, टीएल१२५ आणि टीटी१२५ या स्कूटींचे उत्पादन करत आहे. पुण्यातील एजे डिस्टीब्यूटर्ससोबत कंपनीने करार केला असून कंपनी त्यांच्यासोबत स्कूटीची विक्री करणार आहे. सध्या भारतात टीटी१२५ स्कूटीची विक्री केली जाणार आहे. जगातील सर्वात महागडी स्कूटी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. २ लाख रुपये एवढी या स्कूटीची किंमत आहे. वर्षाभरापूर्वी येणाऱ्या लेम्ब्रेटा स्कूटी सारखे स्कूटीचे डिझाईन आहे. मॉडर्न लूकसह एलईडी हेडलाईट आणि टेललाईट स्कूटीला देण्यात आले आहेत. डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. यामध्ये १२ इंचाची अॅलॉय व्हीलसोबतच ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. १०० किलो वजनाच्या या स्कूटीमध्ये ११ लीटरची पेट्रोलची टाकी देण्यात आली आहे. अप्रिलियाचे १२५सीसीचे इंजिन टीटी१२५ मध्ये असणार आहे.

...Read More

V. S. News
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची विरोधकांना दमबाजी

व्हीएस न्यूज - पुन्हा एकदा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक आणि संतापलेले पाहायला मिळाले. माझ्यावर केलेले आरोप मी खपवून घेणार नाही, त्याचबरोबर आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचेन असा सज्जड दमच त्यांनी विरोधकांना भरला. त्यांनी यावेळी आरोप केल्याने प्रसिद्धी मिळते अशी टीकाही केली. कोल्हापूरातील तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण काढण्याला गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील आडकाठी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ज्यांनी गेल्या २० वर्षात शासकीय जमिनीवर आरक्षणे लाटली आणि हॉटेल्स, शिक्षणसंस्था आणि मंगलकार्यालये थाटली आहेत. मी त्या सर्व प्रकरणाची यादी मागवली आहेच. या सर्व प्रकरणांमुळापर्यंत जाऊन चौकशी करणार आहे. जे कोणी चौकशीत दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आरोप करण्याआधी मी राज्याचा नंबर दोनचा मंत्री आणि पक्षाचा बलाढ्य नेता आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.

...Read More

V. S. News
३ लाख कोटींचा नाणार प्रकल्प गुजरातला जाऊ शकतो – फडणवीस

व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाणार प्रकल्पाला जर असाच विरोध होत राहिला तर अखेर नाणारचा प्रकल्प गुजरातला जाईल असा सुचक इशारा दिला आहे. नाणारच्या प्रकल्पाला कोकणातील राजकीय नेते विरोध करत आहेत. सिंधुदुर्गमधील नाणार येथे तेल काढण्याचा मोठा प्रकल्प आणण्याचा सरकारचा मनसुबा आहे. सरकारमधील मित्रपक्ष शिवसेना आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे या प्रकल्पाला विरोध करत आहेत. १ लाख रोजगारांची या प्रकल्पामुळे निर्मिती होणार आहे. पण त्यामुळेच कोकणाच्या निसर्गाचे, मासेमारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्र्यांनी हा सूचक इशारा याविरोधाच्या पार्श्वभूमीवरच दिला आहे. भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या हद्दीतच ऑईल रिफायनरीचा प्रकल्प अराम्को कंपनी टाकू इच्छिते. राज्य सरकारने म्हणूनच त्यांना नाणारचा प्रस्तावही दिला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पण या प्रकल्पाला असाच विरोध वाढत कायम राहिला तर ३ लाख कोटींचा हा प्रकल्प कदाचित गुजरातलाही जाऊ शकतो, तसेही गुजरात सरकारने यापूर्वीच संबंधीत कंपनीला आमंत्रित केले आहे. असा थेट संदेशच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. देशातील विविध राज्यातील प्रकल्प याआधीही गुजरातने असेच ओढले आहे. कोकणाचा औद्योगिक विकास या प्रकल्पामुळे शक्य असल्याचे सरकारचे मत असल्यामुळे कोकणाच्या निसर्गाची हानी होईल अशी विरोधकांची भूमिका आहे. नाणार प्रकल्पातील बऱ्याच जमिनी नापीक आहेत.

...Read More

V. S. News
 ‘कच्चा लिंबू’ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

व्हीएस न्यूज - संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनातील पीआयबी कॉन्फरन्स रुम येथून करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी नेमण्यात आलेल्या परिक्षकांच्या ज्युरीचं नेतृत्व दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केलं होतं.

६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांच्या खात्यातही काही पुरस्कार आले आहेत. मृत्यूभोगया मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, सुयश शिंदेच्या मयतला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रसाद ओकच्या कच्चा लिंबूया चित्रपटाला जाहीर झाला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रवी जाधव यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांसोबतच राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींचीही मनं जिंकली असं म्हणायला हरकत नाही. तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकर यांचा न्यूटनहा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनाही राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. म्होरक्याया मराठी चित्रपटाला विशेष कामगिरी पुरस्कार मिळाला आहे. सुयश शिंदे दिग्दर्शित मयतया शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. नागराज मंजुळेंच्या पावसाचा निबंधया लघुपटाचा यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. ३ मे २०१८ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

मराठी चित्रपट

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कच्चा लिंबू

सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्होरक्या (मराठी चित्रपट)

स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) म्होरक्या यशराज कऱ्हाडे

सर्वोत्कृष्ट संकलन मृत्युभोग

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (लघुपट) पावसाचा निबंध नागराज मंजुळे

सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फीचर) मयत सुयश शिंदे

सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट चंदेरीनामा- राजेंद्र जंगले

बॉलिवूडमधील पुरस्कार

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट न्यूटन (निर्माता अमित मसुरकर)

सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं अब्बास अली मोगल – (बाहुबली 2)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली 2

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य (गोरी तू लठ मार टॉयलेट एक प्रेम कथा)

स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)

...Read More

V. S. News
काँग्रेसचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याच्या याचिकेवर १८ एप्रिलला सुनावणी

व्हीएस न्यूज भारतीय निवडणूक आयोग येत्या १८ तारखेला काँग्रेसचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची मागणी करणाऱ्या भाजपचे नेते अश्विन उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.

१८ एप्रिलला दुपारी ३ वाजता निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार या याचिकेवर सुनावणी करतील. आपल्या याचिकेत उपाध्याय यांनी दावा केला आहे, की हात हा शरीराचा भाग असल्याने हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. उपाध्याय यांनी आपल्या एका पत्रात म्हटले आहे, की आदर्श आचारसंहितेनुसार मतदानाच्या २ दिवस आधीच निवडणूक प्रचार थांबवणे अपेक्षित असते. मात्र काँग्रेसचे निवडणूक चिन्ह हाताचा पंजा असल्याने त्यांना तो मतदान केंद्रासह सर्वत्र घेऊन जाता येतो.

...Read More

V. S. News
बांगलादेशने हटवले सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण

व्हीएस न्यूज सरकारी नोक-यांमधील आरक्षण हटवणार असल्याचे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी जाहीर केले आहे. हजारो विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी सरकारी नोक-यांमध्ये विशेष गटांसाठी असलेल्या आरक्षण योजनेविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. शेख हसीना यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या आंदोलनाचा विजय मानला जात आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या कार्यकाळात झालेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन होते. हजारोंच्या संख्येने लोकांनी ढाका येथील रस्त्यावर जमा होऊन आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती. अनेकजण पोलिसांनी केलेल्या कारवाईत जखमीही झाले होते.

बांगलादेश सरकारच्या आरक्षण योजनेनुसार, स्वातंत्र्यसैनिकांची मुले, महिला, पारंपारिक अल्पसंख्यांक, अपंग आणि मागासलेल्या जिल्ह्यांमधील लोकांसाठी सार्वजनिक विभागातील ५६ टक्के नोक-या राखीव होत्या. आंदोलनकर्ते हे आरक्षण १० टक्क्यांवर आणण्याची मागणी करत होते. यासोबतच नोकरीसाठी अर्ज करणा-याला आरक्षणाची संधी किंवा हक्क फक्त एकदाच देण्यात यावा अशीही त्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांनी ढाका येथे घोषणाबाजी करत महत्वाचे रस्ते अडवून धरले होते. शहरातील वाहतूक व्यवस्था आंदोलनाचा फटका बसल्याने विस्कळीत झाली होती. काहीजणांनी आंदोलनादरम्यान तोडफोड आणि लूट केली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!