व्हीएसन्यूज - भाजप नेते एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून अंजली दमानिया या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सतत गैरहजर राहत असल्याने त्यांच्याविरोधात रावेर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान रावेरचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी एकनाथ खडसे आणि भाजपची नाहक बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांविरोधात याचिका दाखल केली होती.