व्हीएस न्यूज – सरकारी नोक-यांमधील आरक्षण हटवणार असल्याचे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी जाहीर केले आहे. हजारो विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी सरकारी नोक-यांमध्ये विशेष गटांसाठी असलेल्या आरक्षण योजनेविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. शेख हसीना यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या आंदोलनाचा विजय मानला जात आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या कार्यकाळात झालेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन होते. हजारोंच्या संख्येने लोकांनी ढाका येथील रस्त्यावर जमा होऊन आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती. अनेकजण पोलिसांनी केलेल्या कारवाईत जखमीही झाले होते.
बांगलादेश सरकारच्या आरक्षण योजनेनुसार, स्वातंत्र्यसैनिकांची मुले, महिला, पारंपारिक अल्पसंख्यांक, अपंग आणि मागासलेल्या जिल्ह्यांमधील लोकांसाठी सार्वजनिक विभागातील ५६ टक्के नोक-या राखीव होत्या. आंदोलनकर्ते हे आरक्षण १० टक्क्यांवर आणण्याची मागणी करत होते. यासोबतच नोकरीसाठी अर्ज करणा-याला आरक्षणाची संधी किंवा हक्क फक्त एकदाच देण्यात यावा अशीही त्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांनी ढाका येथे घोषणाबाजी करत महत्वाचे रस्ते अडवून धरले होते. शहरातील वाहतूक व्यवस्था आंदोलनाचा फटका बसल्याने विस्कळीत झाली होती. काहीजणांनी आंदोलनादरम्यान तोडफोड आणि लूट केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002