काँग्रेसचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याच्या याचिकेवर १८ एप्रिलला सुनावणी
नवी दिल्ली
2018-04-14
व्हीएस न्यूज –भारतीय निवडणूक आयोग येत्या १८ तारखेला काँग्रेसचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची मागणी करणाऱ्या भाजपचे नेते अश्विन उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.
१८ एप्रिलला दुपारी ३ वाजता निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार या याचिकेवर सुनावणी करतील. आपल्या याचिकेत उपाध्याय यांनी दावा केला आहे, की हात हा शरीराचा भाग असल्याने हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. उपाध्याय यांनी आपल्या एका पत्रात म्हटले आहे, की आदर्श आचारसंहितेनुसार मतदानाच्या २ दिवस आधीच निवडणूक प्रचार थांबवणे अपेक्षित असते. मात्र काँग्रेसचे निवडणूक चिन्ह हाताचा पंजा असल्याने त्यांना तो मतदान केंद्रासह सर्वत्र घेऊन जाता येतो.