व्हीएस न्यूज - भारतीय बॉक्सर मेरी कोमने ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली असून भारताचे बॉक्सिंगमधील आणि मेरीचे राष्ट्रकुल स्पर्धांमधील हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. काल भारतीय बॉक्सर्सनी कांस्यपदकाची कमाई केल्यानंतर सुवर्णपदक मिळवत मेरी कोमने भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक टाकले आहे. महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने देखील ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील तेजस्विनीचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. तेजस्विनीने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात विक्रमी गुणांची नोंद करत पदकांच्या शर्यतीत भारताचे तिसरे स्थान कायम राखले आहे. ४५७.९ गुणांची कमाई करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तेजस्विनीने मागे सोडले. तेजस्विनीने काल ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002