Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


व्हीएस न्यूज - चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आय आय एम एस ) मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. फोर्ब्स मोटर्स कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक रामचंद्र होनप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की सचोटी आणि बांधिलकी या तत्वांशी एकनिष्ठ असलेल्या 'यशस्वी' सारख्या संस्थेत शिकण्याची संधी मिळणे ही खूप मोलाची बाब आहे,त्यामुळे विद्यार्थ्यांनीही या संधीचा लाभ घेऊन स्वतःचा विकास करताना आपण आपल्या सभोवतालच्यांचाही विकास करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे असे सांगितले.
यावेळी लष्कराच्या मराठा लाईफ इन्फन्ट्री च्या वाद्यपथकाने केलेले संचलन विशेष आकर्षण ठरले.
याप्रसंगी कार्यक्रमाला 'यशस्वी' संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, संस्थेच्या संचालिका प्रा. बी.एस.कुंटे, ई. आर. मूर्ती,संचालक मकरंद कुलकर्णी, अभिषेक कुलकर्णी,ग्रंथपाल पवन शर्मा यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
...Read More

V. S. News
नागरिकांच्या सहभागाशिवाय शहर स्वच्छतेचे उद्दीष्ट्ये पूर्ण होणार अशक्य – महापौर नितीन काळजे

व्हीएस न्यूज - शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सहभागाशिवाय शहर स्वच्छतेचे उध्दिष्ट पूर्ण होवू शकत नाही तरी सर्व शहरवासियांनी स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत स्वच्छ पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालय, हॉटेल्स, शाळा, गृहनिर्माण संस्था, मोहला मार्केट/मंडई या ठिकाणी स्वच्छ भारत सुदृड भारत या विषयावर स्पर्धा घेवून जनजागृती करण्यात आली. घेण्यात आलेल्या स्वच्छ स्पर्धे मध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धेकांना त्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, अर्चना बारणे, सुवर्णा बुरडे, कमल घोलप, सहआयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, हॉटेल व्यवसायिक, गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, मार्केट कमिटी सदस्य, आदि उपस्थित होते.

यावेळी महापौर नितीन काळजे म्हणाले, शहर स्वच्छ करण्यासाठी सर्व वयोगटातील शहरवासीयांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. शहरवासीयांनी स्वत:हून काळजी घेतली तर शहर स्वच्छ व सुंदर राहिल. स्वच्छ भारत अभियानामध्ये शहराचा क्रमांक अव्वल स्थानी येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पथनाट्य द्वारे जनजागृती करुन स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचवणा-या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.प्रास्तावीक सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले तर सुत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ हॉटेल्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संतोषनगर थेरगाव येथील हार्ड कॅस्टल रेस्टॉरंट, इंदिरानगर येथील पंचशिल हॉटेल, पिंपरी येथील जिंजर हॉटेल, माईंड स्पेस, मोरवाडी येथील बारबेक्यू नेशन्स हॉटेल, एमआयडीसी येथील फर्न रेसेडेन्सी हॉटेल यांनी पटकविला. द्वितीय क्रमांक वाकड येथील सयाजी हॉटेल, कासारवाडी येथील कलासागर हॉटेल, एमआयडीसी पिंपरी येथील शिवाई हॉटेल, मोरवाडी येथील किज हॉटेल यांनी तर तृतीय क्रमांक आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील अन्नपुर्णा इटरिज यांनी मिळवीला.

या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ शाळा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक माळवाडी, पिंपळेगुरव, तळवडे, मोहननगर मुले व कन्या, अजंठानगर मुले व कन्या या शाळांनी पटकविला. द्वितीय क्रमांक पिंपरी महानगरपालिका शाळा निगडी मुले व कन्या, च-होली विद्यानिकेतन यांनी तर तृतीय क्रमांक खराळवाडी मुले व कन्या शाळेनी मिळवीला. या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ हॉस्पीटल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आदित्य बिर्ला हेल्थ सर्व्हीसेस लि. आदित्य बिर्ला मेमो. हॉस्पिटल, यांनी पटकविला. द्वितीय क्रमांक क्रेडल मॅटर्निटी एन्ड वुमन्स केअर यांनी तर तृतीय क्रमांक ओएसिस मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पीटल यांनी मिळवीला.

या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ गृहनिर्माण संस्था स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वडमुखवाडी च-होली येथील जेनेसीस सोसायटी, दिघी येथील पोलाईट पेनोरमा, आळंदीरोड भोसरी येथील क्षितीज डिस्टीनेशन, पिंपले सौंदागर येथील रोझलॅन्ड रेसिडेन्सी, वेणुनगर येथील पलाश को हौ सोसायटी यांनी पटकविला. द्वितीय क्रमांक पिंपळे निलख येथील ग्लिटराटी अर्पाटमेंट यांनी तर तृतीय क्रमांक जवळकरनगर फेज3 येथील कल्पतरु इस्टेट यांनी मिळवीला. या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ मोहल्ला मार्केट/मंडई संस्था स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक च-होली येथील कै. बाबुराव शंकरराव तापकीर भाजी मंडई यांनी पटकविला. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा 2018 अंतर्गत घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक यमुनानगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील फार्मसिविभागाने पटकविला. द्वितीय क्रमांक पिंपरी येथील डी.वाय.पाटील एस.एस महाविद्यालयांने तर तृतीय क्रमांक चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाने मिळवीला. तर उत्तेजनार्थाचे बक्षिस सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालय व पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाला देण्यात आले.

...Read More

V. S. News
शहर महिला कॉंग्रेसतर्फे महिलांसाठी आरोग्य व कराटे शिबीर

हळदीकुंकू समारंभात वाण

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड माहिला काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 22 जानेवारी ते 24 जानेवारी असे दोन टप्प्यात शहरातील महिलांसाठी हळदीकुंकूवाचे निमित्ताने सौभाग्यचे वाण म्हणून महिलांसाठी आरोग्याचे शिबीर घेण्यात आले. डॉ सविता बाजारे यांनी तपासणी केली. गणेशनगर पिंपरी मधील समाजमंदिरात आयोजित या शिबीराचा 40 महिलांनी लाभ घेतला.

कन्यादिन निमित्ताने शहरातील युवतीसाठी महिला कॉंग्रेसच्या वतीने स्वसंरक्षणासाठी कराटेची एक दिवस कार्यशाळा घेण्यात आली. राजेंद्र सोलोंके यांनी मार्गदर्शन केले. जेष्ठ नागरिक संस्था विरंगुळा केंद्र येथे आयोजित या कार्यक्रमास प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व पिंपरी चिंचवड निरीक्षक रेणू पाटील, युवती सेलच्या सहनिरीक्षक रुपाली कापसे यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी प्रास्ताविक केले. महिला कॉंग्रेस उपाध्यक्ष संगिता काळसकर यांनी आभार मानले. भोसरी ब्लॉक अध्यक्ष उषाताई कळसे, सेक्रेटरी हुरबानो शेख, जनरल सेक्रेटरी मीना गायकवाड, सुनीता कामथे, अलका पाटील यांनी सहभाग घेतला.

...Read More

V. S. News
संशोधन क्षेत्रात तीन वर्षांत 80 पेटंट आणि 150 कॉपीराईट नोंदणीचा विक्रम पीसीसीओईआरच्या नावे – डॉ. हरिष तिवारी

रावेतच्या पीसीसीओईआर मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

व्हीएस न्यूज - पीसीईटीच्या रावेत येथील पीसीसीओईआर महाविद्यालयाची पहिली बॅच नुकतीच पास झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या महाविद्यालयाचा वार्षिक निकाल पहिल्या पाचमध्ये राहिल. तसेच शैक्षणिक, संशोधन, प्लेसमेंट या तीन विभागात लक्षणीय प्रगती केली आहे. संशोधन क्षेत्रात मागील तीन वर्षांत 80 पेटंट आणि 150 कॉपीराईट नोंदणीचा राष्ट्रीय विक्रम नुकताच पीसीसीओईआरच्या नावे नोंदविण्यात आला आहे. यामध्ये पीसीईटीच्या सर्व विश्वस्तांचे मार्गदर्शन आणि प्राध्यापक वृंद व कर्मचा-यांचे योगदान महत्वपुर्ण आहे. पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पीसीसीओईआर महाविद्यालयात आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना संबोधित करताना तिवारी बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रशासन अधिकारी पद्‌माकर विसपुते, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर आदी उपस्थित होते. तसेच प्रसिध्द गायक प्रशांत नासरी, विराग वानखेडे यांनी उत्कृष्ठ गीत सादर केले. ‘एक्सप्रेशन 2018’ या सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत नृत्य, संगीत, गायन सादर करण्यात आले या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनावर आधारीत लघुनाटिका सादर केली. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर आणि प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांच्या हस्ते फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या संघांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रा. प्रिया ओघे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कोथले, नोबल वर्गीस,कौस्तुभ नरवेकर, ओमकार केदार, ऋषभ जैन यांनी आयोजनात सहभाग घेतला. हुसेन पडगावाला, शाश्वीता मुळे, दीपशिखा श्रीवास्तव, कस्तूरी आजगावकर, चिराग शहा यांनी सुत्रसंचालन केले.

...Read More

V. S. News
ISIS च्या संपर्कात आलेल्या पुण्यातील तरुणीला काश्मीरमध्ये बेड्या

व्हीएस न्युज - प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातील एका 18 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. सादिया शेख असं या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी मानवी बॉम्ब बनण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.सादिया शेख बंडगार्डन रोडवरील एका शाळेत शिकत होती. सादियाला दहावीत 90 टक्के मार्क होते. अकरावीला तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आयसिसच्या संपर्कात आली होती. सीरियात मेडिकलला प्रवेश देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.

आयसिससोबत संपर्क करण्याचा प्रयत्न तिने सुरु केला. यासाठी मोहम्मद सिराजुद्दीन नावाच्या व्यक्तीने तिला मदत केली. मूळचा कर्नाटकातील असणारा सिराजुद्दीन हा राजस्थान मधील जयपूरमधे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. मात्र त्याचवेळी तरुणांना कट्टर इस्लामकडे ओढण्याचे त्याचे प्रयत्नही सुरु होते.

तिच्या वागणुकीत आणि पेहरावात बदल झाला होता. जीन्स-टी शर्ट सोडून ती हिजाब घालायला लागली. इतकंच नाही तर ती धार्मिक बाबीतही रुची घेऊ लागली होती.

ही बाब तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने एटीएसशी संपर्क साधला. एटीएसने मौलवीच्या मदतीने तिचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांच्या संपर्कात राहणार नाही, असं तिने त्यावेळी सांगितलं होतं. यानंतर ती सुधारल्याचं समजलं जात होत.एटीएसने ब्रेनवॉशिंग केल्यानंतरही सादिया शेख पुन्हा आयसिसच्या संपर्कात आली. ती काश्मीरमध्ये असल्याची समजल्यानंतर काश्मीर पोलिसांनी याची माहिती 23 जानेवारीला पुणे पोलिसांना पत्राद्वारे दिली होती.

त्यानंतर पोलिसांनी सादियाच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र ती शिक्षणासाठी बाहेरगावी गेली आहे. ती सध्या कुठे आहे हे सांगू शकत नाही, अस तिच्या आईने सांगितल्याचं पुण्याचे सहआयुक्त रवींद्र कदम म्हणाले.
...Read More

V. S. News
घटना बदलण्याचा भाजप, आरएसएसचा घाट .....डॉ. रत्नाकर महाजन

पिंपरी चिंचवड कॉंग्रेसच्या वतीने संविधान बचाव मुकमार्चाचे आयोजन

व्हीएस न्युज - भारताच्या तिरंगा झेंड्यास आरएसएसचा प्रथम पासूनच विरोध होता. भारताचा राष्ट्रीय ध्वज भगवा असावा ही आरएसएसची इच्छा होती. परंतु घटना समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्‍या निर्णयामुळे आरएसएसचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत. भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावे ही आरएसएसची इच्छा धुळीस मिळाली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच बहुमताने भाजपच्या नावाखाली आरएसएस सत्तेवर आली आहे. त्‍यांचा हिंदुत्‍वाचा छुपा अजेंडा संविधानात बदल केल्‍याशिवाय पूर्ण होणे शक्‍य नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणा-या भारतातील सज्ञान जनता हे कदापी होऊ देणार नाही. भाजपाने संविधानात बदलण्याचा प्रयत्‍न केल्‍यास कॉंग्रेस त्‍याला तीव्र विरोध करेल. आरएसएसचा व भाजपचा हिंदुत्‍वाचा अजेंडा भारतात कधीच पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी शुक्रवारी केले.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाजप सरकारच्या विरोधात ‘संविधान बचाव लोकतंत्र बचाव’ या मुकमोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. महाजन बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे, सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महिला प्रदेश कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम अगरवाल, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक विभागाचे चिंचवड ब्लॉक अध्यक्ष फय्याझ शेख, माजी अध्यक्ष भाऊसाहेब मुगूटमल, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, पश्चिम महाराष्ट्र कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष तारीक रिझवी, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल कसबे, सज्जी वर्की, राजन नायर, तसेच कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

डॉ. महाजन पुढे म्हणाले की, कॉंग्रेसने राज्यात संविधान बचाव रॅली काढली आहे. जो भाजप तिरंग्यास विरोध करतो तेच ‘तिरंगा बचाव’ यात्रा काढत आहेत. ही मोठी हास्यासस्पद गोष्ट आहे. सरकार असे उद्योग करुन समाजामध्ये फुट पाडण्याचे काम करीत आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना देखील फसवी आहे. शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसून जनतेच्या कष्टाचा पैसा उद्योगपतींना कर्जमाफी देऊन जनतेची क्रुर थट्‌टा केली आहे. निवडणुकीपूर्वी सत्तेवर येण्यासाठी फसव्या घोषणा केल्या. त्‍यातील एकही घोषणा अद्यापही पूर्ण झाली नाही. कॉंग्रेसने आग्रह धरला म्हणूनच शेतक-यांना एवढी तरी कर्ज माफी मिळाली, असे डॉ. महाजन यांनी ठासून सांगितले, असे डॉ. महाजन यांनी सांगितले.

प्रास्ताविकात शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारावर जोरदार टिका केली. सत्ताधारी पाशवी बहुमताच्या जोरावर चुकीचे निर्णय घेत आहे. भाजप दरोडेखोर आहे आणि त्यांना साथ देणारी शिवसेना वॉचमनचे काम करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. प्रारंभी चिंचवड येथील चापेकर चौकात झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर एचए कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मुक मोर्चास सुरुवात झाली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाची सांगता होऊन तेथे सभा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र बनसोडे यांनी केले. कार्यक्रमास कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...Read More

V. S. News
राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रशांत शितोळे

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही निवड केली असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे व डाॅ. शैलेश मोहीते पाटील आदी उपस्थित होते.

प्रशांत शितोळे हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीत त्यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा ते पक्ष कार्यात सक्रीय झाले होते. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतीलभाजप पदाधिकार्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत शितोळे यांनी आवाज उठवला आहे.

...Read More

V. S. News
दापोडीतील स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी विभागाची जमिन अतिक्रमणापासून वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – राज्यमंत्री विजय शिवतारे

व्हीएस न्यूज - दापोडी येथील जलसंपदा विभागात स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी, संकल्पनिय, यांत्रिकी इमारत, गुणनियंत्रण व निरिक्षण या चार विभागाची कार्यालये आहेत. त्यातील स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी हा उपविभाग कायम ठेवणे तसेच या विभागाची ७२ एकर जमीनअतिक्रमाणापासून वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी पुढाकार घेऊन याविषयीच्या बैठकीचे आयोजन मंत्रालयात केले होते. विजय शिवतारे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे गटनेते नगरसेवक राहुल कलाटे, मुख्य अभियंता एस. एन. बोडके, अधिक्षक अभियंता पुंढलिक थोटवे,कार्यकारी अभियंता आनंद काळमेघ, महाराष्ट्र राज्य क्रास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रविण धिवार, नागेश घटकांबळे, कैलास पवार, महेंद्र कांबळे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.

आमदार चाबुकस्वार यांनी यावेळी या विभागाची विस्तृत माहिती मंत्र्यासमोर विषद केली. जलसंपदा विभागाचा दापोडी येथे नियोजन व संकल्पचित्र हा उपविभाग कार्यरत आहे. परंतू ‘पुरेसा कार्यभार शिल्लक नाही’ या मतानुसार शासनाने दापोडीतील हा उपविभाग बंद करण्याचानिर्णय घेतला. या ठिकाणी स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी, संकल्पनिय, यांत्रिकी इमारत, गुणनियंत्रण व निरिक्षण या विभागाची चार कार्यालये आहेत. पैकी अब्जावधी रूपये किंमत असलेली ७२ एकर जागेचे संरक्षण व उपाययोजना या बाबी लक्षात घेऊन स्थापत्य बांधकाम वयांत्रिकी हा उपविभाग कायम ठेवण्याचा निर्णय राज्यमंत्र्यांनी घेतला. तसेच मोकळ्या जागेची तातडीने मोजणी करणे, संरक्षण भिंत उभारणे, अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा देणे, जलसंपदाच्या खात्याच्या जागेत उभारलेल्या टपऱ्या, भाजी मंडई, यांचे अतिक्रमण काढणेचा निर्णयघेण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेने जलसंपदा खात्याची काही जागा विकासकामांसाठी घेतली होती. मात्र करारनाम्यानुसार पालिकेने कुठलीच पूर्तता केली नसल्याचे यावेळी स्पष्ट झाल्याने पिंपरी महापालिकेला ही नोटीस देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

...Read More

V. S. News
वाचनसंस्कृती वाढवली तरच मराठी भाषा अधिक समृद्ध होईल – डॉ. लक्ष्मीकांत देशमुख

व्हीएस न्यूज - वाचनसंस्कृती वाढवली तरच मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, त्यासाठी गावोगावी समृद्ध ग्रंथालये उभी राहिली पाहिजेत. मराठी भाषेविषयीचे प्रेम वाढत नाही तोपर्यंत सरकारदेखील भाषेकडे गांभीर्याने पाहणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जामिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन बडोदा येथील ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने अॅटो क्लस्टर सभागृहात डाॅ. देशमुख यांची प्रकट मुलाखत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा.पिंगळे यांनी घेतली. शिंदेशाही पगडी, स्मृतिचिन्ह व पुस्तक देऊन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्तेसन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार उल्हासदादा पवार, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, समन्वयक नाना शिवले, गिरिजादेवी कुदळे, राजन लाखे, पुरुषोत्तम सदाफुले, राजेंद्र घावटे, सुहास पोफळे,आदी मान्यवर उपस्थितहोते.

डॉ. देशमुख यांनी संमेलनासाठी शासनाची २५ लाखाची मदत खूपच अपुरी असून त्यात वाढ होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. आपण इतर कामांसाठी भरपूर खर्च करतो, मात्र स्वभाषेसाठी करत नाही. इतर राज्यांत भाषेवर प्रेम करणारे राज्यकर्ते आणि नागरिक असल्यानेभाषेसाठी ते भरीव काम करत असतात. मराठी भाषेसाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे. शासनाबरोबर आपली सर्वांचीच ती जबाबदारी आहे. केवळ बोलण्यापुरते मराठीवर प्रेम नको तर ते कृतीत उतरले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, माझ्या साहित्यिक प्रवासात माझ्या आईवडिलांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक लेखक आधी चांगला वाचक असतो. वाचता वाचता त्याच्या जाणीवा समृद्ध होत असतात. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथालये महत्वाची आहेत. अशी समृद्ध ग्रंथालये प्रत्येक गावात,प्रत्येक शाळेत निर्माण झाली पाहिजेत. महाराष्ट्रात मराठी शाळांना अधिक समृद्ध करण्याची गरज आहे. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. नवनवे तंत्रज्ञान मराठीत यायला हवे. मराठी विद्यापीठ व्हायला हवे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी टाळण्यासाठी सरकारबरोबर कलावंत,साहित्यिकांनी पुढे यायला हवे. मराठी भाषेच्या बाबतीत शासनाबरोबरच आपणही उदासीन आणि करंटे आहोत. ही वृत्ती बदलली पाहिजे, मी कार्यकर्ता लेखक म्हणूनच काम करणार. साहित्य संमेलनाच्या निधी वाढ व्हावी. ई-मराठी धोरण आणले जावे. मराठीतील चांगले साहित्यअन्य भाषांमध्ये अनुवादित व्हावे. अशा अनेक अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, लेखकाची लोकप्रियता ही मानवी जीवनाला पुढे नेणारी मूल्य नावाच्या गोष्टीतून साहित्यामध्ये प्रकट होत असते. समाज कसा असावा. समाजातील मूल्यांची जपणूक कशी व्हावी. आदर कसा राखला जावा. याविषयीची भूमिका लेखक मांडतच असतो. त्यांनीमांडलीच पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. सूत्रसंचालन डाॅ.अविनाश वाळुंज यांनी केले व नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले. अविनाश ववले, गणेश लंगोटे, संतोष बाबर, बाजीराव लोखंडे, महेंद्र चिंचवडे, विजय कांबळे, प्रविण कुदळे, राजेंद्र करपे,गुरुदास भोंडवे, रोहित खर्गे, सचिन काटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

...Read More

V. S. News
पिंपरीत प्रजासत्ताक दिनी देशातील सर्वाधिक उंच राष्ट्रध्वजाचे होणार अनावरण

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक ( १०७ मिटर) उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण शुक्रवार दि.२६ जानेवारी २०१८ (प्रजासत्ताक दिनी) रोजी सकाळी १०.०० वा. होणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली भक्ती शक्ती चौक, निगडी येथे होणा-या या कार्यक्रमास पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती तर खासदार शिवाजीराव आढळरावपाटील, श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, कॅन्टोनमेंट बोर्डाचे स्पेशल कमांडंट, प्रेसिडंट, ब्रिगेडीयर ओ.पी.वैष्णवी, विरचक्र सन्मानित, महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेते निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीसभापती सिमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तसेच विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाईफुगे, फ प्रभाग अध्यक्षा साधना मळेकर, ग प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या शर्मिला बाबर, कमल घोलप, सुमन पवळे, नगरसदस्य राजू मिसाळ, अमित गावडे, उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सह. आयुक्तदिलीप गावडे यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत. भारताच्या राष्ट्रध्वजाबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात एक वेगळे आदराचे स्थान आहे ही भावना नविन पिढीच्या मनात रुजत राहण्याच्या दृष्टीने तसेच देशा प्रती प्रेम व्यक्तकरण्याकरीता भक्ती शक्ती उद्यानाच्या आवारात १०७ मिटर उंचीवर दिवस रात्र फडकणा-या राष्ट्रध्वजाच्या (Monumental Flag) कापडाचे मोजमाप १२० फुट X ८० फुट आहे. या पूर्वी १०५ मिटर उंचीचा राष्ट्रध्वज अटारी येथील वाघा सिमेजवळ उभारण्यात आलेला आहे. भक्ती शक्ती चौक, निगडी येथे सकाळी १०.०० वा ध्वजारोहण, सामुहिक संविधान वाचन व राष्ट्रगान होणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे. या कामास केंद्रीय गृह खात्याची परवानगी ११ जुलै २०१७रोजी प्राप्त झाली आहे. तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे यांनी या प्रकल्पाच्या फाऊंडेशनच्या डिझाईनला मंजुरी दिली आहे.

...Read More

V. S. News
डी.एस. कुलकर्णी यांना ५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा

व्हीएस न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाने ठेवीदारांची देणी परत करण्यासाठीची २५ टक्के रक्कम म्हणजेच ५० कोटी रुपये न्यायालयात गुरुवारी जमा करण्यात अपयशी ठरलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णींना खडे बोल सुनावले. तसेच डीएसकेंना या प्रकरणात उच्चन्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सध्या अडचणीत आले आहेत. गुरुवारी उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. डीएसकेंना ठेवीदारांची देणी परत करण्यासाठी उच्च न्यायालयात ५० कोटी रुपये जमाकरायचे आहेत. डीएसके गुरुवारी देखील ही रक्कम जमा करण्यात अपयशी ठरले. ५० कोटी रुपये बँकेत जमा होणार आहे. हे पैसे परकीय चलनात म्हणजे डॉलर्समध्ये आल्याने सध्या आरबीआय पडताळणी करत आहे. १ फेब्रुवारीपर्यंत हे पैसे जमा करु, अशी माहितीडीएसकेंच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली. परदेशातील डीएसकेंच्या मालकीच्या कंपनीच्या माध्यमातून या ५० कोटी रुपयांची तजवीज करण्यात आल्याने ही रक्कम परकीय चलनात आली आहे. उच्च न्यायालयाने डीएसकेंची बाजू ऐकून घेतल्यावर डीएसकेंना ५फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिला. तसेच २ फेब्रुवारीपर्यंत लिलावासाठी मालमत्तेची योग्य यादी सादर करावी, असेही उच्च न्यायालयाने सांगितल्याचे समजते. सुप्रीम कोर्टाने डीएसकेंना पैसे जमा करण्यासाठी मुदत देत त्यांना अटकेपासून दिलासा दिला.

...Read More

V. S. News
मौजमजेसाठी चोरी करणारे त्रिकुट गजाआड

व्हीएस न्यूज - मौजमजेसाठी मोबाईल व दागिन्यांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांनी निगडी पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून तीन लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

आनंद त्र्यंबक इंदुकाने (वय 21 रा. निगडी प्राधिकरण), ऋषिकेश चांदुप्रसाद काटे (वय 20 रा. धारडी, परभणी) अतुल सोमनाथ काटे (वय 20 रा. धारडी, परभणी) अशी या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस गस्त घालत असताना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राधिकरण येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या होंडा डिओ दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ महागड्या किंमतीचे मोबाईल आढळून आले. त्यांच्याकडे विचारणा केल्यांनतर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल, पर्स, दागिने चोरले असल्याचे कबुली दिली. त्यांच्याकडून सात महागडे मोबाईल, 71 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, एक लाख 62 हजार रुपयांचे नेकलेस, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, दोन हजार 300 रुपये रोख असा तीन लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, तात्या तापकीर, प्रकाश कांगळे, कबीर पिंजारी, बाळासाहेब शेलार, मंच्छिद्र घनवट, स्वामीनाथ जाधव, रमेश मावसकर, किरण खेडकर, किशोर पढेर यांनी केली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!