व्हीएस न्यूज - शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सहभागाशिवाय शहर स्वच्छतेचे उध्दिष्ट पूर्ण होवू शकत नाही तरी सर्व शहरवासियांनी स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत स्वच्छ पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालय, हॉटेल्स, शाळा, गृहनिर्माण संस्था, मोहला मार्केट/मंडई या ठिकाणी स्वच्छ भारत सुदृड भारत या विषयावर स्पर्धा घेवून जनजागृती करण्यात आली. घेण्यात आलेल्या स्वच्छ स्पर्धे मध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धेकांना त्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, अर्चना बारणे, सुवर्णा बुरडे, कमल घोलप, सहआयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, हॉटेल व्यवसायिक, गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, मार्केट कमिटी सदस्य, आदि उपस्थित होते.
यावेळी महापौर नितीन काळजे म्हणाले, शहर स्वच्छ करण्यासाठी सर्व वयोगटातील शहरवासीयांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. शहरवासीयांनी स्वत:हून काळजी घेतली तर शहर स्वच्छ व सुंदर राहिल. स्वच्छ भारत अभियानामध्ये शहराचा क्रमांक अव्वल स्थानी येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पथनाट्य द्वारे जनजागृती करुन स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचवणा-या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.प्रास्तावीक सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले तर सुत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.
या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ हॉटेल्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संतोषनगर थेरगाव येथील हार्ड कॅस्टल रेस्टॉरंट, इंदिरानगर येथील पंचशिल हॉटेल, पिंपरी येथील जिंजर हॉटेल, माईंड स्पेस, मोरवाडी येथील बारबेक्यू नेशन्स हॉटेल, एमआयडीसी येथील फर्न रेसेडेन्सी हॉटेल यांनी पटकविला. द्वितीय क्रमांक वाकड येथील सयाजी हॉटेल, कासारवाडी येथील कलासागर हॉटेल, एमआयडीसी पिंपरी येथील शिवाई हॉटेल, मोरवाडी येथील किज हॉटेल यांनी तर तृतीय क्रमांक आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील अन्नपुर्णा इटरिज यांनी मिळवीला.
या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ शाळा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक माळवाडी, पिंपळेगुरव, तळवडे, मोहननगर मुले व कन्या, अजंठानगर मुले व कन्या या शाळांनी पटकविला. द्वितीय क्रमांक पिंपरी महानगरपालिका शाळा निगडी मुले व कन्या, च-होली विद्यानिकेतन यांनी तर तृतीय क्रमांक खराळवाडी मुले व कन्या शाळेनी मिळवीला. या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ हॉस्पीटल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आदित्य बिर्ला हेल्थ सर्व्हीसेस लि. आदित्य बिर्ला मेमो. हॉस्पिटल, यांनी पटकविला. द्वितीय क्रमांक क्रेडल मॅटर्निटी एन्ड वुमन्स केअर यांनी तर तृतीय क्रमांक ओएसिस मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पीटल यांनी मिळवीला.
या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ गृहनिर्माण संस्था स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वडमुखवाडी च-होली येथील जेनेसीस सोसायटी, दिघी येथील पोलाईट पेनोरमा, आळंदीरोड भोसरी येथील क्षितीज डिस्टीनेशन, पिंपले सौंदागर येथील रोझलॅन्ड रेसिडेन्सी, वेणुनगर येथील पलाश को हौ सोसायटी यांनी पटकविला. द्वितीय क्रमांक पिंपळे निलख येथील ग्लिटराटी अर्पाटमेंट यांनी तर तृतीय क्रमांक जवळकरनगर फेज3 येथील कल्पतरु इस्टेट यांनी मिळवीला. या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ मोहल्ला मार्केट/मंडई संस्था स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक च-होली येथील कै. बाबुराव शंकरराव तापकीर भाजी मंडई यांनी पटकविला. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा 2018 अंतर्गत घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक यमुनानगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील फार्मसिविभागाने पटकविला. द्वितीय क्रमांक पिंपरी येथील डी.वाय.पाटील एस.एस महाविद्यालयांने तर तृतीय क्रमांक चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाने मिळवीला. तर उत्तेजनार्थाचे बक्षिस सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालय व पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाला देण्यात आले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002