इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
चिंचवड
2018-01-27
व्हीएस न्यूज - चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आय आय एम एस ) मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. फोर्ब्स मोटर्स कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक रामचंद्र होनप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की सचोटी आणि बांधिलकी या तत्वांशी एकनिष्ठ असलेल्या 'यशस्वी' सारख्या संस्थेत शिकण्याची संधी मिळणे ही खूप मोलाची बाब आहे,त्यामुळे विद्यार्थ्यांनीही या संधीचा लाभ घेऊन स्वतःचा विकास करताना आपण आपल्या सभोवतालच्यांचाही विकास करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे असे सांगितले.
यावेळी लष्कराच्या मराठा लाईफ इन्फन्ट्री च्या वाद्यपथकाने केलेले संचलन विशेष आकर्षण ठरले.
याप्रसंगी कार्यक्रमाला 'यशस्वी' संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, संस्थेच्या संचालिका प्रा. बी.एस.कुंटे, ई. आर. मूर्ती,संचालक मकरंद कुलकर्णी, अभिषेक कुलकर्णी,ग्रंथपाल पवन शर्मा यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.