व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया प्रकल्पांअंतर्गत देशभरात विकसित करण्यात आलेल्या ‘क्लस्टर’ मध्ये मागासवर्गिय नव उद्योजकांना व प्रशिक्षणार्थींना आगामी काळात समाविष्ट करुन घेतले जावे असे प्रतिपादन एमएसएमईचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) गिरीराज सिंह यांनी चिंचवड (पुणे) येथे केले. चिंचवड येथील पुणे इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने ‘पुणे व्हेंडेंक्स 2018’अंतर्गत प्रदर्शनाचे उद्घाटन गिरीराज सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, पुणे इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक, अध्यक्ष सागर शिंदे, विजय देशमुख, राजेश चव्हाण, संतोष तिडके, एमएसएमईचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष योगेश बाबर आदी उपस्थित होते.
गिरीराज सिंह म्हणाले की, मागील तीन वर्षात उद्योग व्यवसायास अनुकूल धोरण राबवून त्याची अंमलबजावणी केल्यामुळे भारतात आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीचा ओघ वाढला आहे. यातून प्रत्यक्ष सत्तर लाख रोजगार निर्मिती झाली आहे. एमएसएमईतून एकूण रोजगाराच्या 80 टक्के रोजगार अप्रत्यक्ष निर्माण होतो. त्यामुळे या सरकारने एमएसएमईच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. जाती धर्माच्या राजकारणामुळे यावर प्रतिकूल परिणाम होता. उद्योगांना चालना मिळावी म्हणूनच मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबाजवणी केली. यातून देशाच्या जीडीपीत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात 50 कोटी नागरीकांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. देशाच्या विकासात वाढत्या लोकसंख्येचा देखील अडसर आहे. विकासाची फळे वाढत्या लोकसंख्येमुळे गरीब जनतेला मिळत नाहीत. जे सरकार गरीबांचा विचार करते त्यांनाच सत्तेवर राहण्याचा अधिकार असल्याचेही सिंह म्हणाले. पुणे इंजिनिअरींग क्लस्टरचे काम गुणवत्तापुर्ण आहे. त्यामुळेच येथून प्रशिक्षण घेतलेल्या सर्व युवकांना रोजगार मिळाला आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत या संस्थेला पारितोषिक मिळाले हे अभिनंदणीय आहे असे सिंह म्हणाले.
पुणे इंजिनिअरींग क्लस्टरचे अध्यक्ष सागर शिंदे यांनी सांगितले की, चिंचवड येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सरकारी अध्यादेशानुसार केंद्र व राज्य सरकारच्या अंगीकृत कंपन्यांनी 20 टक्के खरेदी लघुउद्योजकांकडून करावी असे आदेश आहेत. त्यानुसार इंजिनिअरिंग क्लस्टरच्या माध्यमातून सुक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) उद्योजकांसाठी उपलब्ध असणा-या व्यवसायिक संधी याविषयी मार्गदर्शन तसेच संरक्षण खाते, रेल्वे खाते, ऑईल पुरवठा करणा-या कंपन्या तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अंगीकृत इतर कंपन्यांमधून एमएसएमईच्या उद्योजकांना निविदा भरताना आवश्यक असणा-या कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत या चर्चासत्रात नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशी माहिती सागर शिंदे यांनी दिली. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य उद्योग विभागाचे संचालक राजीव गुप्ते, स्वागत सागर शिंदे, सुत्रसंचालन अभय दप्तरदार आणि आभार विजय देशमुख यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा नावलौकिक वाढविण्यात पद्माकर विसपुते यांचे योगदान महत्वपुर्ण आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर गेली 22 वर्षं त्यांनी पीसीईटीच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यक्षमपणे अव्याहतपणे सेवा केली. पीसीईटीचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांचा या संकुलात केजी टू पीएचडी शिक्षण देण्याचा संकल्प होता. हा संकल्प विसपुते यांच्या कार्यकालात पुर्ण झाला. त्यांचे मार्गदर्शन भावी काळात देखील आम्हाला दिशादर्शक ठरेल. तसेच विसपुते यांचा 101 वा वाढदिवस साजरा करण्याचा आम्हाला लाभ मिळावा. विसपुते यांचे भावी आयुष्य आरोग्य संपन्न जावो अशा शुभेच्छा माजी मंत्री व पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या.
पीसीईटीचे प्रशासन अधिकारी पद्माकर विसपुते यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे विसपुते यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस.काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई, गोरख भालेकर, प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, प्रा. डॉ. हरीश तिवारी, प्राचार्य डॉ. डॅनिअल पेणकर, प्राचार्या डॉ. विद्या बॅकॉड, प्राचार्या मधूबाला गॅरोला, प्राचार्या अनुजा कामठे, व्ही.एम.कड,लेखाधिकारी सुभाष कानेटकर, रजिस्टार योगेश व्हि. भावसार आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - भारताचा औद्योगिक विकास वाढविण्यासाठी कंपन्या, उद्योजक आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे उद्योग व्यावसायिकांना कुशल, अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी-शिक्षण संस्था-उद्योग संस्था जोपर्यंत एकत्र येत नाही; तोपर्यंत उद्योग क्षेत्र मोठे होऊ शकत नाही. इंजिनिअरिंग क्लस्टर सुक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) उद्योजकांसाठी फायदेशीर आहेत, असे मत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी चिंचवड येथे व्यक्त केले.
पुणे, पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने आयोजित केलेल्या नॅशनल व्हेंडर कार्यक्रम आणि प्रदर्शनाचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य उद्योग विभागाचे संचालक राजीव गुप्ते, सहसंचालक विश्वनाथ राजळे, पुणे इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक, अध्यक्ष सागर शिंदे, संचालक अभय दप्तरदार, विजय देशमुख, राजेश चव्हाण, संतोष तिडके, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले की, इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये 'कॉमन फॅसिलिटी सेंटर' सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा छोट्या उद्योजकांनी घ्यावा. महागडी मशिनरी खरेदी करून आर्थिक भार वाढवण्यापेक्षा फॅसिलिटी सेंटरमधून अपेक्षित उत्पादन घेता येईल. उत्पादित वस्तुंची उपयुक्तता, गुणवत्ता, दर्जा आदी बाबी तपासणीच्या सुविधादेखील अशा क्लस्टरमधून दिल्या जातात. त्यामुळे एमएसएमई उद्योजकांच्या उत्पादनांना मोठ्या कंपन्यांकडून तसेच जागतिक बाजारपेठे मधूनही मोठ्याप्रमाणावर मागणी असते, हे राज्यातील 14 क्लस्टरमधून होत असलेल्या कामावरून सिध्द झाले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून उपयोग नाही, तर सॉफ्ट स्किल असणे आवश्यक आहे. तरच चांगल्या रोजगारसंधी उपलब्ध होतील. उद्योग विश्वाला अपेक्षित कार्य पुण्यातील क्लस्टरकडून होत आहे, त्याबद्दल देसाई यांनी कौतुक केले. आज घडीला देशातील औद्योगिक क्षेत्रास विजेच्या समस्येने ग्रासले आहे. मुबलक पाणी उपलब्ध नाही, चांगल्या दर्जाचा कोळसा भारताला आयात करावा लागतो. यासाठी अधिक आर्थिकभार सोसावा लागतो. याचा परिणाम वीज निर्मितीवर होतो. त्याऐवजी आपण सौर, पवन ऊर्जा या अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढविला पाहिजे. परंतु, या ऊर्जा स्त्रोतांच्या वापरासाठी आवश्यक तंत्रज्ञान, साधनसामुग्री यांची निर्मिती भारतामध्ये झाल्यास उत्पादन खर्च कमी होऊन स्वस्त आणि किफायतशीर वीज निर्मिती होऊन देशापुढील समस्या सुटण्यास मदत होईल. देशातील एकुण गुंतवणुकीचा विचार केल्यास 50 टक्क्यांहुन अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात होते. उद्योग क्षेत्रात राज्याचा प्रथम क्रमांक अजुनही आबाधित आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्रालाच प्रथम पसंती देतात. मागील वर्षी मेक इन इंडिया मध्ये 8 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त प्रकल्प कार्यान्वित होण्यास सुरुवात झाली आहे, असे सुभाष देसाई म्हणाले. प्रास्ताविकात पुणे इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक सागर शिंदे म्हणाले की, 2011 मध्ये चिंचवड येथे क्लस्टरची स्थापना होऊन 2014 मध्ये प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात झाली. या क्लस्टरमधील सुविधांचा लाभ तीनशेहुन अधिक लघु उद्योजकांना झाला असून सुमारे 800 कुशल कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. महाराष्ट्रासह देशभरातून उद्योजक आणि कामगार येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत. त्यांच्यासाठी उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून होस्टेलची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी, शिंदे यांनी उद्योगमंत्र्यांकडे केली. यावेळी राजीव गुप्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभय दप्तरदार यांनी केले. कार्यक्रमास इंजिनिअरिंग क्लस्टरचे सदस्य, लघु उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एमएसएमईशी संबंधित हे प्रदर्शन 6फेब्रुवारीपर्यंत विनामुल्य सुरू राहणार आहे.
व्हीएस न्यूज - एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली कॅश घेऊन व्हॅनसह फरार चालकाला त्याच्या साथीदारांसह पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून ७४ लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली आहे. गुन्हा घडल्यानंतर पोलीसांनी आपली चक्रे फिरवत या गुन्ह्याचा ७२ तासात छडा लावला आहे.
एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले ७४ लाख रुपये घेऊन व्हॅन चालक व्हॅनसह फरार झाल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि. ३१) रोजी दुपारी दीडच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम शाखेजवळ घडली होती. या प्रकरणातील आरोपींना वाकड पोलिसांनी ७२ तासात जेरबंद केले असून त्यांच्याकडून ७४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.
या कारवाईची माहिती देताना पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, मुख्य आरोपी रणजित धर्मराज कोरेकर (रा. सनशाईन हॉटेलजवळ, माऊलीनगर दिघी मूळ रा. मु.पो. नारेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर), असे या व्हॅन चालकाचे नाव आहे. तर त्रिंबक गणपती नहिराळे (वय ३७, रा. मांडवजाळी, ता. जि. बीड), अमोल लक्ष्मण धुते (वय २७,साई पार्क, माऊलीनगर, दिघी), विठ्ठल रामहरी जाधव (वय ३४, रा. लोळदगाव, ता. गेवराई, जि. बीड), अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर पूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ब्रिक्स इंटरनॅशनल या कंपनीची गाडी (एम. एच.१४, सीएक्स ५७११) रणजित कोरेकर चालवत होता. बुधवारी सकाळी ही गाडी डेक्कन येथून एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघाली. दुपारपर्यंत सात एटीएममध्ये पैसे भरण्यात आले. गाडीमध्ये सुरक्षा रक्षक, दोन कॅशियर आणि चालक असे चौघे होते. दुपारी सव्वाएकच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आल्यानंतर सुरक्षारक्षक आणि कॅशियर एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी उतरले असता चालक रणजित कोरेकर याने गाडी घेऊन धूम ठोकली. यावेळी गाडीमध्ये ७४ लाख रुपयांची रोकड होती.
वरील आरोपी ईटीऑस कार (एम एच ४८, एफ १९८४) मधून पैसे असलेल्या वाहनाचा पाठलाग करीत होते. कॅश वाहन चोरण्याची संधी साधून चौघांनी मिळून भोसरी येथून सर्व कॅश ईटीऑस कारमध्ये ठेवून पळाले. बुधवारी रात्री उशिरा पळवून नेलेली व्हॅन भोसरी एमआयडीसी येथे एका कंपनीजवळ आढळून आली. मात्र, त्यामधील रोख रक्कम घेऊन चालक रणजित कोरेकर फरार झाला होता. गुरुवारी शिक्रापूर हद्दीत ज्या पेटीमध्ये कंपनीने पैसे भरून ठेवले होते, ती पैशांची पेटी सापडली. पण सापडलेली पेटी मोकळी होती. काही वेळेच्या फरकाने एक-एक गोष्टी समोर येत असल्याने हा पूर्वनियोजित कट तर नसेल ना, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यावरून वाकड पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले, व त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हा गुन्हा उघडकीस आला. प्रकरणाचा ७२ तासांमध्ये तपास करत आरोपींना गजाआड करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.
व्हिएस न्युज - चिंचवड येथे भुमकर चौकात वाहतूक पोलीसाने चालकाला बेदम मारहाण केल्याचा विडिओ वायरल झाला असून सोशल मीडिया वर चर्चेत आहे. सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेल्या विडिओमध्ये एमएच 12, एफ डी 6795 हा टेम्पो उभा आहे.त्या व्हिडिओ मागचं पूर्ण सत्य अद्याप स्पष्ट झालं नसून त्यावर लवकरात लवकर तपास करण्यात येईल, असे स्पष्टीकरण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिले.
वाहतूक पोलीसाने चालकाला बेदम मारहाण केल्याचा आणि चालक वाहतूक पोलीसाची मरू नये म्हणून हाथ जोडून विनंती करत असल्याचे विडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ रस्त्याने जाणा-या एका वटसरूने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्यावरून सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. वर्दीची ताकद, पोलिसी खाक्या, अशोभनीय, निंदनीय, कदाचित पैशांची मागणी पूर्ण केली नसणार म्हणून मारहाण करण्यात येत आहे. अशा एक ना अनेक चर्चा सध्या सुरू आहेत.
याबाबत बोलताना परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, या प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येईल. नेमका प्रकार काय आहे हे तपासणे महत्वाचे आहे. ज्याची चूक असेल त्याला शिक्षा नक्की होणार. नागरिकांनी नको त्या चर्चा सोशल मीडियावर पसरवू नये. व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तसेच व्हिडिओ संपल्यानंतर नेमका काय प्रकार झाला आहे, हे देखील तपासण्यात येईल.
वाहतूक पोलीसांची दादागिरी आणि अरेरावी वाढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत पार पाडण्या पेक्षा पावती फाडण्यात जास्त मग्न आहेत असे नागरिकांचे मत आहे.
व्हिएस न्युज - रविवार दिनांक ४/५/२०१८ रोजी महाराष्ट्रातील शिवसेना सोशल टिमचा मेळावा मंगलसेन बहल सभागृह नेहरूनगर या ठिकाणी शिवसेना पिंपरी विधानसभा संपर्क प्रमुख गिरीशजी सावंत व पिंपरी विधानसभा आमदार अॕड गौतम चाबुस्कवार यांच्या प्रमुख उपस्थित उत्सहात पार पाडला.
व्हीएस न्यूज - जीवनात सकारत्मकतेची ताकद येण्यासाठी अध्यात्मिक योग, ध्यानधारणा गरजेची आहे. चांगले विचार आचरण, संवाद संस्कार यातूनच प्रेम आपुलकी वाढते. चांगले कर्म चांगली दिशा देऊ शकतात. डॉक्टर ताण तणाव, क्रोध, अहंकार, स्वार्थ दूर करूनच रुग्णांच्या वेदना दूर करू शकतात यासाठी मनशक्ती जागरूक ठेवण्याची गरज आहे त्यासाठी स्वतःला वेळ द्यावा, असे मत बी के शिवानी दीदी यांनी व्यक्त केले. डॉ. डी. वाय पाटील मेडिकल महाविद्यालय व संशोधन केंद्रात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयच्या बी के शिवानी दीदी यांनी 'आत्मविश्वास व सकारत्मकता' या विषयी व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्ष भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ पी. एन राजदान तसेच विद्यार्थी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्यानी उपस्थित होते....Read More
व्हीएस न्युज - पिडीत वंचित वर्गाचा विकास करण्यासाठी मला काम करायचे आहे. उत्कृष्ठ लोकनेता होणे हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न होते. ते पुर्ण करण्यासाठी मी भविष्यात काम करील. लोकप्रतिनिधी घडविणारे त्यांचे व्यक्तीमत्वं होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणा-यांवर मी अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन ग्रामविकास, महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रहाटणी, पुणे येथे केले.
व्हीएस न्यूज - संकेतस्थळावर हॉटेलमध्ये नोकरीची जाहिरात पाहून दोन उच्च शिक्षित तरूणांची 60 हजार रूपयांची फसवणूक सराईत गुन्हेगाराने केली. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी उघडकीस आली. दिपेश सोनी (रा. पिंपरी) असे फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर भोसरीसह चतुःश्रृगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपी सोनी हा चतुःश्रृगी पोलीसांच्या कोठडीत आहे. याप्रकरणी नदिन गंवडी (वय-25, रा. कर्वेनगर) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. 6 ते 26 सप्टेंबर 2017 या कालावधीत घडला. फौजदार आर. बी. सोडनवर यांनी माहिती दिली. फिर्यादी गंवडी हा बीई इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेत आहे. तो व त्याचा अभिजीत बाबासाहेब पाटील पार्टटाईम नोकरीच्या शोधात होते. लिंक इन या संकेतस्थळावर त्यांनी चिंचवड येथील रिव्हर व्हयु हॉटेलमध्ये नोकरी लावण्याची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही जाहिरात पाहून फिर्यादी व त्याच्या मित्राने आरोपी सोनीशी संपर्क साधला. नोकरी लावण्याचे अमिष दाखवून सोनीने दोघांकडून प्रत्येकी 30 हजार असे 60 हजार रूपये घेतले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002