...अन् कारवाईला घाबरून दारूडा दुचाकीसोडून पळून गेला
भोसरी
2018-02-03
व्हिएस न्यूज - ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह कारवाईला घाबरून दारूड्या दुचाकीस्वाराने पळून जाण्याच्या प्रयत्नात वाहतूक पोलीसाला जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले. घाबरलेला दुचाकीस्वार दुचाकी सोडून पळून गेला. ही घटना गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास भोसरीतील इंद्रायणीनगर येथे घडली. नाथाराम काळे असे जखमी झालेल्या वाहतूक पोलीसाचे नाव आहे. याप्रकरणी (एमएच क्रमांक 14, सीए-397) या दुचाकीचालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक फौजदार बी. जी. केदार यांनी माहिती दिली. फिर्यादी हे भोसरी वाहतूक विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ते सहकाऱ्यांसमवेत गुरूवारी रात्री इंद्रायणीनगर येथील राकेश स्वीट मार्ट समोर ड्रंक ऍण्ड ड्राईव्हची कारवाई करत होते. आरोपी दुचाकीस्वाराला काळे यांनी थांबण्याची सुचना केली. दुचाकीस्वार थांबला नाही. दुचाकीस्वाराने काळे यांना जोरदार धडक दिली. यामुळे घाबरलेला दारूडा दुचाकीस्वार दुचाकी घटनास्थळी सोडून पळून गेला. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.