'आज तुम्हारी गेम बजाके ए रोजका किस्साच खतम कर डालता'
खडकी
2018-02-03
व्हीएस न्यूज - सांडपाणी दारात येत असल्याच्या कारणावरून आई व चुलतीमध्ये झालेल्या भांडणातून 'तुम्हारा रोजकाच नाटक हुएला है, आज तुम्हारी गेम बजाके ए रोजका किस्साच खतम कर डालता, एक जान जाने से मुझको फरक नही गिरता' असे म्हणत चुलत्यावर व चुलत भावावर भावानेच कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना खडकीतील महादेववाडी येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.
शाहबाज कुरेशी (वय-19, रा. खडकी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. अरबाज हनिफ कुरेशी, शाहरूख हनिफ कुरेशी, हनिफ गफुर कुरेशी, तायरा हनिफ कुरेशी (सर्व. रा. महादेववाडी, खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची आई आणि चुलती तायरा हनिफ कुरेशी शेजारी राहतात. यांच्यामध्ये सांडपाणी दारात येत असल्याच्या कारणावरून भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्याचा शाहबाजचा भाऊ मुसेफ कुरेशी आणि त्याचे वडील प्रयत्न करत होते. आरोपी अरबाज कुरेशीने घरात जावून लोखंडी कोयता आणून फिर्यादीला ' तुम्हारा रोजकाच नाटक हुएला है, आज तुम्हारी गेम बजाके ए रोजका किस्साच खतम कर डालता, एक जान जाने से मुझको फरक नही गिरता' असे म्हणत चुलत भावावर व चुलत्यावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. शाहरूख कुरेशीने रॉडने तर हनिफ कुरेशी याने फिर्यादी व त्याच्या वडिलांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. फौजदार व्हि. एस. आजगेकर अधिक तपास करत आहेत.