व्हीएस न्यूज - ज्ञानदीप इंग्लिश स्कुलचे वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन उत्साहात विविध उपक्रमांनी पार पडले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ज्ञानदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे, माजी अध्यक्ष राहुल चिताळकर, प्रशांत पाटील, परशु केकाण, पूजा ठवरे, यशस्वी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते, अंकुश पांढरे, भागवत काटकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सागर भोसले, संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे यांनी मनोगत व्यक्त केले. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांसह शालेय वैयक्तिक व सामाहिक स्पर्धा, खेळ, मनोरंजनात्मत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाले. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी पल्लवी जाधव, हेमांगी शिंदे, शीतल जगताप, पूजा ठवरे, हेमलता राऊत, रुपाली गजरमल आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मारुती बोन्द्रे यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे यांनी तर आभार अनिल नाटेकर यांनी मानले. ...Read More
व्हीएस न्यूज - धार्मिक व सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याची ताकद महिलांच्या सामूहिक नेतृत्वात असून त्यास प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या कविता बहल यांनी नुकतेच केले. श्री जगद्गुरु प्रतिष्ठानच्या वतीने कर्तृत्वान महीलांचा व उत्कृष्ट महीला बचतगटांचा सत्कार समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. नगरसेविका सुलक्षणा धर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. लक्ष्मण रानवडे, ऍड. सुनिता रानवडे आदी मान्यवर उपस्थित होते. एच. ए. कॉलनीतील स्वरांजली महिला बचत गट, छाया सिनलकर, रंजना मुळिक, सुरेखा कामठे, संस्कृती महिला बचत गट वनमाला वाघमारे यांना जिजाऊ सावित्री उत्कृष्ठ कार्य पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात आले. तर सायुजता दोडके यांना आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बहल पुढे म्हणाल्या, गेली एकवीस वर्षे महिलांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ऍड. रानवडे हे पुरस्कार देऊन करत असलेले कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या समाजरुपी कार्याची दखल राज्य शासनानेही नुकतीच घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला सुमारे एक हजार महिला उपस्थित होत्या. यावेळी सुलक्षणा धर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. लक्ष्मण रानवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजिता ऍड. सुनिता रानवडे यांनी आभार मानले. चॉंद शेख, देवेंद्र गावंडे, सुधीर कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले....Read More
व्हीएस न्यूज - ज्येष्ठ नागरिक हे या वयातही तरुणांना लाजवतील अशा उत्साहात सामाजिक कार्य करतात, ही बाब निश्चितच भूषणावह आहे. तरीदेखील महापालिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी तरतूद करून मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरला जात नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. याबाबत जागरूकता दाखवून निधीचा योग्य विनियोग करावा, असे आवाहन माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांनी येथे केले. आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, गोलांडे इस्टेट, सुदर्शननगर यांनी आयोजित केलेल्या वर्धापनदिन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गोलांडे बोलत होते. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाला स्वतःची वास्तू मिळाली; तसेच त्याची अधिकृत शासकीय नोंदणी झाली याबद्दल गोलांडे यांनी समाधान व्यक्त केले. उद्योजक स्वानंद राजपाठक यांनी, "अध्यात्माबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाची शिदोरी तरुण पिढीला द्यावी. कारण त्या ज्ञानाचा उपयोग अनेक विधायक कामांसाठी होऊ शकतो" असे विचार मांडले. रवींद्र कुलकर्णी यांनी अहवालवाचन केले. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर यांनी कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त करून स्वरचित कविता सादर केली. याप्रसंगी आशा कुलकर्णी, शालिनी कुलकर्णी आणि रवींद्र कुलकर्णी यांनी भक्तिरचना सादर केल्या. विजय राजपाठक, सच्चिदानंद दिवेकर, कविता कोल्हापुरे, दत्तात्रय पुजार यांनी संयोजनात सहकार्य केले. अशोक कपोले यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा चाफे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली....Read More
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने पाणी दरवाढ मोठ्या प्रमाणात करून फक्त सहा हजार लिटर पाणी मोफत देण्याचे शहरवासियांना अमिष दाखविले आहे. परंतू, मोफत पाणी फक्त पाच दिवसात संपणार असून सत्ताधारी भाजपाने त्याआडून मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक अरूण बकाल यांनी केला आहे. बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चार जणांच्या कुटूंबाला यापुर्वी सरासरी महिन्याला 75 रूपये मासिक बिल येत होते. परंतू, सत्ताधारी भाजपाने पाण्याची मोठ्या प्रमाणात दरवाढ प्रस्तावित केली आहे. दरवाढ केल्यानंतर जनतेमध्ये रोष निर्माण होऊ नये यासाठी सहा हजार लीटर पाणी मोफत देण्याचे आमिष दाखविले आहे. परंतू, हे सहा हजार लीटर पाणी अवघ्या चार ते पाच दिवसात संपणार आहे. त्यामुळे ही योजना फसवी असून पाणी दरवाढ मागे घेण्याची मागणी बकाल यांनी केली आहे. यापुर्वीही तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने पाण्याची मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्याचे नियोजन केले. परंतू, जनतेने पाणी दरवाढ मागे घेण्यास भाग पाडले होते. त्याचप्रमाणे भाजपलाही दरवाढ मागे घेण्यास भाग पाडणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ...Read More
व्हीएस न्यूज - बाबुरावजी घोलप यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी घोलप महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मेळाव्यात भाग घेतला. या मेळाव्यास राहुल जवळकर आणि माजी नगरसेविका वैशाली जवळकर, राम जांभूलकर, महविद्यालय विकास समिती सदस्य अभिजित शिर्के, प्रसाद जाधव, अपर्णा भालेराव यांच्यासह माजी विद्यार्थी हजार होते. प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा प्रकाश पांगारे यांनी तर आभार प्रा. जितेंद्र वडशिंगकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विजय घारे व प्रा. जितेंद्र वडशिंगकर यांनी योगदान दिले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. ढगे, डॉ.एल. के. निकम उपस्थित होते....Read More
व्हीएस न्यूज - निगडीतील अमृता विद्यालयाच्या 9 विद्यार्थिनींनी सह्याद्री पर्वतरांगेतील 1013 मीटर उंचीचा तैलबैला हा अवघड कातळकडा प्रस्तरारोहण करून नुकताच सर केला. विद्यालयात इयत्ता 6 वी ते 9 वी मधील चेलुवी ढोकले, वैदेही भोंगे, श्रेया भदे, मानसी मगर, मृणाल ठाकर, आकांक्षा पवार, सई भालघरे, वैष्णवी गवळी, तनिष्का पवार या विद्यार्थिनींनी हे साहस केले. या सर्व 12 ते 15 वयोगटातील आहेत. गिर्यारोहक कृष्णा ढोकले यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले....Read More
व्हीएस न्यूज - हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या एका 19 वर्षीय युवकाचा इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून खाली जलतरण तलावात पडून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हिंजवडीतील फेज 1 मध्ये घडली. महेंद्रसिंग आनसिंग बोरे (वय-19, रा. ब्ल्यू रिच सोसायटी, हिंजवडी, मुळ. उत्तराखंड) असे मृत युवकाचे नाव आहे. तो हिंजवडीतील ब्लु रिच या हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. हिंजवडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंग हा चार दिवसांपूर्वीच ब्लु रिच हॉटेलमध्ये कामासाठी आला होता. तो गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता. त्याला चक्कर येत होती. दुपारी चारच्या सुमारास तो इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून गेला. तेथून त्याचा खाली असलेल्या जलतरण तलावात पडून मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या इसामाला हत्याराचा धाक दाखवून जबरदस्तीने मोबाईल घेण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीन आरोपीला पिंपरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरूवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गांधीनगर येथील मंहिद्रा ऍन्थीया सोसायटीसमोर घडली. समिल शेख (वय-25, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी 17 वर्षीय़ अल्पवयीन आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. फौजदार घुगे अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील 18 हजार रूपये किंमतीचा मोबाईल व आधार कार्ड चोरून पळून जाणारा चोरट्याला पिंपरी पोलीसांनी जेरबंद केले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता पिंपरीतील गोकुळ हॉटेलसमोर घडली. तुळाराम रंगराव जाधव (वय-18, रा. भेंदीदांडा, ता. किनवट, जि. नांदेड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोकुळ हॉटेलसमोरून पिंपरी रेल्वे स्टेशनकडे जात होती. आरोपीने त्याच्या हातातील 18 हजार रूपये किंमतीचा मोबाईल व आधार कार्ड जबरदस्तीने हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर नागरिकांनी चोरट्याला पकडून पोलीसांच्या हवाली केले. फौजदार निमगीरे अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - दिल्लीतील एनसीआर कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका तरूणाला वेळोवेळी बॅंक खात्यावर तीन लाख रूपये भरण्यास सांगून नोकरी न लावता त्याची फसवणूक केली. हा प्रकार नुकताच वाकड येथे उघडकीस आला आहे. अजय मिश्रा (वय-30, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुदिप श्रीवास्तव जॉन्सन, जवाहर तिवारी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय मिश्रा नोकरीच्या शोधात होते. त्यांना आरोपी जॉन्सन व तिवारी यांनी संपर्क साधला. दिल्लीतील एनसीआर कंपनीत उच्च पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी आरोपीने मिश्रा यांना विविध बॅंक खात्यात वेळोवेळी तीन लाख 12 हजार 459 रूपये भरण्यास सांगितले. परंतू, मिश्रा यांना नोकरी लावली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. घोळवे अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला मोटारीने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी नऊ वाजता पाषाण येथील सुतारवाडी येथे घडली. याप्रकरणी मोटार चालकाला हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे. मोतीलाल खेदरू राय (वय-50, रा. रणपिसे शाळेसमोर सुतारवाडी, पाषाण) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. त्यांचा पुतण्या कृष्णा राय (वय-22) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटार चालक दिपेन शांतीलाल शेठीया (वय-38, रा. 703 नम्रता बिल्डींग, घाटकोपर, मुंबई) याला पोलीसांनी अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीलाल राय गुरूवारी सकाळी नऊ वाजता सुतारवाडी येथे मुंबई-बेंगलोर महामार्ग ओलांडत होते. भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या राय याचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोटार चालक दिपेन शेठीयाला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002