Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नगरसदस्या अनुराधा गोरखे व सह आयुक्त दिलिप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक आयुक्त आशा देवी दुरगुडे व अण्णा बोदडे यांच्या हस्तेही संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पाजली अर्पण करण्यात आली. या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, संतोष जाधव, आकाश चव्हाण, बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते नंदुभाऊ राठोड, गुलाब राठोड व रवि गोरसिकवाडी कर्मचारी रवि राठोड, बालाजी रोठोड, सीताराम राठोड व रावसाहेब राठोड आदि उपस्थित होते.
...Read More

V. S. News
क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, लहूजी वस्ताद साळवे यांना आदरांजली

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके व लहूजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्तचिंचवड स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्यास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्या अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आले.
यावेळी माजी नगरसदस्य राम पात्रे, सह आयुक्त दिलिप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम.शिंदे सामाजिक कार्यकर्ते नितीन घोलप, भाऊसाहेब अडागळे, अण्णासाहेब कसबे, संदिप जाधव, आबाजी भवाळ, विलास डोलारे, अरुण जगताप, उमेश शिंदे, राजू ओव्हाळ, भरत जगताप, ज्ञानेश्वर पोळ, दादा कसबे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.
...Read More

V. S. News
पाणीपट्टी दरवाढ रद्द करा

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरवासियांवर सत्ताधारी भाजपने अन्यायाकारक पध्दतीने पाणीपट्टीची दरवाढ केली आहे. ही दरवाढ त्वरीत रद्द करावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी महापलिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पाणीपट्टीची अन्यायकारक दरवाढ जनतेवर लादू नका. पवना बंदिस्त पाईप लाईनसाठी जागा ताब्यात नसताना करोडो रूपयांचा खर्च करण्यात आला. ते पैसे तत्कालीन अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणीही तायडे यांच्यासह गुलाब पानपाटील, राजेंद्र साळवे, विष्णु सरपदे, विनोद जाधव, गौतम जगभार आदींनी केली आहे.
...Read More

V. S. News
नॉव्हेल महाविद्यालयामध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा

व्हीएस न्यूज - चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन मेळावा शुक्रवारी पार पडला. बारावीनंतर पुढील क्षेत्र कसे निवडायचे. परदेशात करिअरच्या कोणत्या विविध संधी उपलब्ध होतील. त्यासाठी कोणता शैक्षणिक अभ्यास करणे गरजेचे आहे. याबद्दलचे मोफत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना 11 अमेरिकन युनिर्व्हसिटीच्या प्रतिनिधींनी केले. या करिअर मार्गदर्शन मेळाव्याला विद्यार्थी व पालकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्याला पेनसिल्व्हानिया स्टेटच्या असोसिएट डायरेक्टर सुप्रिया कानेटकर यांच्यासह अबर्न मार्केटिंग मॅनेजर करण ललिल, रिक्रूटमेंट मॅनेजर हर्ष जोशी, अबर्न ऍकॅडमिक कौन्सिलर भाग्यश्री, संचालिका रिबेका बहन, रिद्धी मेहता, कॅसोलिन क्लाप्सी, ग्रॅंड व्हॅली स्टेट युनिव्हर्सिटीचे ख्रिस्तोफर हेंड्री, जॉन्सन कॉलेजचे समन्वयक डर्बन चेस, जॉक्सन मिशीगन, आफरीन नाझ, नुपूर खुराना आदी उपस्थित होते. या करिअर मेळाव्यात अकरावी व बारावी वाणिज्य शाखा व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालकही उपस्थित होते.
संयोजिका सुप्रिया कानिटकर म्हणाल्या की, पुण्याच्या महाविद्यालयात आम्ही प्रथमच अशा करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करीत आहोत. आम्हाला विद्यार्थी व पालकांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतीय विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील कौशल्य व बुद्धिमत्ता लक्षात घेता अमेरिकन युनिर्व्हसिटीज या अशाच उत्तमोत्तम कौशल्य व बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांच्या शोधात असतात. विद्यार्थी आणि पालकांचा मेळाव्यासाठी मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे दरवर्षी, असे मेळावे घेतले जातील. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील क्षेत्रातील दिशा ठरवण्यासाठी योग्य मार्गदर्शन व संधी मिळेल. नॉव्हेल महाविद्यालयाने दिलेल्या पाठींब्यामुळे त्यांनी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांचे आभार मानले. यावेळी नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे व प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे उपस्थित होत्या.

...Read More

V. S. News
हातगाडी व पथारी व्यवसायिकांच्या पुनर्वसनासाठी आंदोलन

व्हीएस न्यूज - हातगाडी व पथारीधारकांचे पुर्नवसन करावे मागणीसाठी खडकी येथील कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर गुरुवारी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. समाजवादी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रफिक कुरेशी व खडकी विभाग अध्यक्ष विलास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. रवी यादव, सालार शेख, रामरुप यादव, मोहम्मद खान, रमेश शाहू, लक्ष्मी परदेशी, सलिमा शेख, माधवी पिल्ले, रेखा कांबळे, संतोषी चौधरी, रशिदा इराणी, अस्मिता स्वामी, अमृत पिल्ले आदी व्यावसायिक आंदोलनात सहभागी झाले होते. हातगाडी व पथारीधारकांचे योग्य ठिकाणी योग्य प्रकारे पुर्नवसन केले जावे अशी त्यांची मागणी होती.
मागील वर्षभरापासून कॅंटोन्मेंट बोर्ड वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाडी व पथारी व्यवसायिकांवर कारवाई करीत आहे. यातील बाधित व्यवसायिकांना जुन्या पाण्याच्या टाकीजवळ जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र तेथे व्यवसाय नीट चालत नसल्याने पूर्वीच्याच गोलमार्केट, टिकाराम चौक या ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. कॅंटोन्मेंट सदस्य दुर्योधन भापकर व हातगाडी संघटनेचे अध्यक्ष भरत ठाकूर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन या प्रकरणी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
...Read More

V. S. News
स्थायीच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीचे 21 नगरसेवक इच्छूक

दोन माजी महापौर, एक माजी स्थायी समिती सभापतींचा समावेश

व्हीएस न्यूज - महापालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीमध्ये रिक्त झालेल्या दोन जागांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 38 नगरसेवकांपैकी तब्बल 21 जण इच्छूक आहेत. दोन माजी महापौर, एक माजी स्थायी सभापतीनेही अर्ज केला असून यामधून दोन जणांची निवड करणे राष्ट्रवादीपुढे आव्हान ठरले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये नुकतेच आठ सदस्य चिठ्ठीव्दारे बाहेर पडले आहेत. यामध्ये भाजपाचे सहा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन सदस्यांचा समावेश आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने स्थायी समित सदस्यांसाठी इच्छूकांडून अर्ज मागविले होते. स्थायीच्या आठ सदस्यांची येत्या मंगळवारी पालिकेच्या सर्व साधारण सभेत निवड होणार आहे.
राष्ट्रवादीकडून दोन जागांसाठी माजी महापौर वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, माजी स्थायी समिती सभापती सुमन पवळे यांच्यासह नगरसेविका गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे, निकीता कदम, स्वाती काटे, विनया तापकीर, उषा काळे, संगिता ताम्हाणे, नगरसेवक शाम लांडे, राजू बनसोडे, जावेद शेख, विनोद नढे, संतोष कोकणे, रोहित काटे, पंकज भालेकर, प्रविण भालेकर, राहूल भोसले यांचा समावेश आहे.
स्थायी समितीमध्ये प्रत्येक सदस्याला विकास कामात टक्का मिळतो, त्यामुळे या समितीमध्ये येण्याची प्रत्येक नगरसेवकांची इच्छा असते. तथापि, महापालिकेत राष्ट्रवादीच्या 38 नगरसेवकांपैकी तब्बल 21 नगरसेवकांनी स्थायी समिती सदस्यांसाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत. यामधून कोणत्या दोन सदस्यांना राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार संधी देणार हे पाहणे औत्सक्यचे ठरणार आहे.
...Read More

V. S. News
टपरीचालकाला मारहाण करून लुबाडणारा गजाआड

व्हीएस न्यूज - गांजाची मागणी करत पानटपरी चालकासह त्याच्या मुलाला मारहाण करून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल असा 20 हजार रूपये किमतीचा ऐवज लुबाडून नेणाऱ्या एकाला वाकड पोलीसांनी गजाआड केले. त्याचा एक साथीदार मात्र, पसार झाला आहे.
विशाल विद्याधर पांडे (वय 26, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रामचरीत पांडे (वय 58, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचरीत यांची वाकड येथील हिडन चौकात पानटपरी आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे टपरी बंद करत होते. यावेळी आरोपी विशाल आणि त्याचा साथीदार तेथे आले आणि रामचरीत यांना गांजाची पुडी मागितली. त्यावर मी गांजा विकत नाही, असे रामचरीत यांनी सांगितले. या कारणावरून दोन्ही आरोपींनी रामचरीत यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील सात हजार रूपयांची रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. रामचरीत यांचा मुलगा अभिषेक हा लुटलेला ऐवज सोडविण्यासाठी आला असता आरोपींनी त्यालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याच्याकडील 1 हजार 900 रूपये आणि मोबाईल असा एकूण 19 हजार 900 रूपयांचा ऐवज लुटला. रामचरीत यांनी त्वरीत पोलीस ठाण्यात धाव घेतली. वाकड पोलीसांनी विशालला अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 7 हजार रूपये किमतीची मोटार आणि सात हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. घोळवे तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
राष्ट्रीय चेस बॉक्सिंग स्पर्धेत राहुल धोत्रेला सुवर्णपदक

व्हीएस न्यूज - तामिळनाडू मधील सेलम येथे नुकत्याच पार पडलेल्या सहाव्या राष्ट्रीय सिनियर (मेन) चेस बॉक्‍सिंग स्पर्धेत शहरातील राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे याने ९० किलो वजनगटात सुवर्णपदक पटकाविले. यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय चेस बॉक्‍सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

आंतरराष्ट्रीय चेस बॉक्‍सिंग स्पर्धा जुलै २०१८ मध्ये होणार असून या स्पर्धांसाठी निवड होणारा राहुल शहरातील राहुल धोत्रे यांनी पहिला खेळाडू आहे. राहुल हा पिंपरीतील दि.सेवा विकास को ऑप बँक पिंपरीमध्ये काम करतो. बँकेचे अध्यक्ष अँड. अमर मुलचंदानी व सर्व संचालक व कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले. क्रीडा प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय चेस बॉक्‍सर कृष्णा सोहनी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल राहुलचे विविध स्तरांमधून कौतुक होत आहे. सुरुवातीपासून खेळाची आवड असल्याने, राहुलने नोकरी करत असताना देखील खेळाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्याला बँकेच्या संचालक मंडळाने प्रोत्साहन देत सहकार्य केले.

...Read More

V. S. News
उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तींना ‘जिवन गौरव पुरस्कार’

व्हीएस न्यूज - मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधुन पनवेल, उरण, खालापुर कर्जत भागातील सामाजिक श्रेत्रातील क्रिडा, वारकरी संप्रदाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पनवेल येथे आद्यक्रांतीकार वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मनोहरशेठ भोईर, किशोरी पेडणेकर, बबन पाटील, रेखा ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीरंग बारणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले मावळ मतदार संघ घाटावर व घाटाखाली असा जोडला आहे. शहरीभागा बरोबरच ग्रामिण आदिवाशी असा असलेला मतदार संघ खासदार बारणे यांनी प्रचंड मेहनतीने संपर्क ठेऊन बांधला आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असुन त्यांनी अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहे. लोकसभेतही त्यांचे काम चांगले असुन प्रत्येक प्रश्नांची माहिती घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न ते करत आले आहे. लोकसभेतील त्यांच्या कामाबद्दल त्यांना पुरस्कार ही देण्यात आला. ही मावळ लोकसभा मतदार संघातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा त्यांनी सन्मान केला. ह.भ.प. मारुती महाराज राणे, जी.एम.म्हात्रे, प्रदिप साहेबराव ठाकरे, बळवंत नारायण शिरधणकर, निलम कदम राजपुत, अपर्णा द्वारकानाथ पाटील/ठोंबरे, सिद्धेश हेमंत शिंदे, मधुकर काळूराम धोंगडे, अशोक नारायण जंगले, मा.वि.म. कापरेकर तथा तात्यासाहेब कापरेकर यांचे सामाजिक काम अतिशय चांगले असल्याचे उद्गगार त्यांनी काढले. हे सर्व व्यक्ती अतिशय चांगले काम करतात, त्यांची प्रेरणा सर्वांनी घेतली पाहिजे. सामाजिक कामातील आपले योगदान म्हणजे त्या अर्थाने त्यांचा जिवनाचा गौरव आसल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

खासदार बारणे म्हणाले की, रायगड या भागातील नागरीकांनी मला खूप प्रेम दिले. त्यांच्या पाठबळावरच मी लोकसभेत चांगले काम करू शकलो. मी घाटावर असुनही कधीही या भागाकडे दुर्लक्ष केले नाही आणि करणारही नाही. माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या सर्व मान्यवरांनी सत्कार स्विकारला. हिच प्रेरणा मला माझ्या राजकीय कारकिर्दिला प्रोत्सान देईल. एकनाथ शिंदे यांनी माझा सन्मान केला असुन तो संपुर्ण मावळ लोकसभेतील जनतेचा सन्मान केला असल्याचे उद्गगार त्यांनी काढले. या प्रसंगी मनोहर भोईर, संजय मोरे, किशोरी पेडणेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नरेश रहाळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

...Read More

V. S. News
पिंपरीत राष्ट्रवादीकडून ‘गाजर डे’केला साजरा

व्हीएस न्यूज - केंद्र आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने आश्वासनांची खैरात केली होती. आता त्यांना त्यांचा विसर पडलायं. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या नेत्यांनी जनतेला केवळ आश्वासनांची ‘गाजरं’ दिली होती. त्याचाच निषेध म्हणून पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज ‘गाजर डे’ साजरा केला असल्याचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले.

पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आज युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भाजप सरकारच्या निषेधार्थ ‘गाजर डे’ साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, निकीता कदम, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक पंकज भालेकर, फजल शेख, प्रदेश सरचिटणीस लाला चिंचवडे, विशाल काळभोर, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे, उपाध्यक्ष हर्षवर्धन भोईर, कुणाल थोपटे, सागर तापकीर तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपने सत्तेेत येण्यापूर्वी अनेक खोट्या घोषणांची ‘गाजरं’ या जनतेला दाखवली होती. तरूणांना नोकरी असेल, किंवा व्यापार्यांचा रोजगार, शेतकरी, विद्यार्थी या सर्वांनाच खोटी आश्वासन दिली होती. पिंपरी चिंचवडबाबत बोलायचं म्हटलं तर मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचं या भाजप सरकारनं ‘गाजरचं’ दाखवलयं, रिंगरोडच्या बाबतीतही भाजपवाल्यांनी गरिब जनतेची फसवणूकच केली. अनधिकृत बांधकामांचा प्रशेन तर १०० दिवसांत सोडवू असं ‘गाजरचं’ दाखवलं होतं. शास्तीकराचा तर या सत्तेत मस्त झालेल्या भाजपच्या मंडळींना विसरच पडलायं. पाणी फुकट देणार असं ‘गाजर’ दाखवून तिप्पट पाणीकर महापालिकेतील पदाधिकार्यांनी वाढवण्याचा घाट घातलायं. सत्तेत येऊन या भाजपच्या मंडळींनी केवळ आश्वासनांची ‘गाजरचं’ दिली आहेत. खोट्या घोषणांचा केवळ पाऊस पाडलायं म्हणून आज राष्ट्रवादीने या फसव्या सत्ताधार्यांचा निषेध करण्यासाठी ‘गाजर डे’साजरा केला असल्याचे ते म्हणाले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!